Raj Thackeray And Uddhav Thackeray Mumbai Shivaji Park Sabha मुंबई: तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र आलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवतीर्थवर काल जोरदार तोफ धडाडली. मोदी सरकार फक्त अदानींवरच मेहरबान का असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी 2014 पासूनचे अदानींचे वाढते उद्योग दाखवत मुंबईकरांना जागं होण्याचं आवाहन केलं. तसेच राज ठाकरेंनी भारत, महाराष्ट्र आणि मुंबईतील अदानी समूहाच्या उद्योगाबाबत तीन व्हिडीओ दाखवले. राज ठाकरेंनी दाखवलेल्या या तीन व्हिडीओची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. 

Continues below advertisement

1. राज ठाकरेंनी दाखवलेला पहिल्या व्हिडीओमध्ये काय?

2014 ते 2025 या फक्त 11 वर्षांच्या काळात, सरकारच्या आशीर्वादाने अदानी समूह ज्या वेगाने देशात पसरला आणि अनेक क्षेत्रात एकाधिकारशाही निर्माण करत चालला आहे. त्याची झलक दाखवणारी चित्रफीत राज ठाकरेंनी दाखवली. 

2. राज ठाकरेंनी दाखवलेला दुसऱ्या व्हिडीओमध्ये काय?

गेल्या काही वर्षांत अदानी समूह ज्या पद्धतीने पसरत आहे, वीज क्षेत्र असू दे, बंदर असू दे, विमानतळ असू दे, राज्यात जवळपास प्रत्येक क्षेत्र अदानी समूहाच्या हातात दिलं जात आहे...आज मराठी म्हणून आपण या एका उद्योग समूहाच्या विस्ताराकडे गांभीर्याने बघितलं नाही तर या राज्यातील इंच आणि इंच जमीन या एकाच उद्योगसमूहाकडे जाईल. अदानी समूहाच्या महाराष्ट्रातील अविश्वसनीय विस्ताराचा पट मांडणारी चित्रफीत राज ठाकरेंनी दाखवली. 

3.  राज ठाकरेंनी दाखवलेला तिसऱ्या व्हिडीओमध्ये काय? (Raj Thackeray And Uddhav Thackeray)

एमएमआर परिसरात अदानी समूहाचा सुरु असलेला विस्तार जरूर पहा. मुंबई गुजरातला न मिळता महाराष्ट्राला मिळाली याचा अजून राग असलेल्या काही शक्ती आता या उद्योगसमूहाला हाताला धरून मुंबईवर आणि एमएमआरवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत... अदानी समुहाचा एमएमआर परिसरातील विस्ताराची चित्रफीत राज ठाकरेंनी दाखवली. 

संबंधित बातमी:

Raj Thackeray And Uddhav Thackeray Mumbai Shivaji Park Sabha: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील सभेला गर्दी किती?; पाहा टॉप 20 PHOTO