एक्स्प्लोर

Raigad ZP Elections Results 2026: रायगड जिल्हा परिषदेत गोगावले गड राखणार की भाजपचं कमळ फुलणार का? कोणाची सत्ता येणार?

Raigad ZP election results 2026: रायगड जिल्ह्यात भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात तीव्र संघर्ष पाहायला मिळाला. भाजपनेही रायगड जिल्हा परिषदेसाठी ताकद पणाला लावली होती.

Raigad ZP Elections Results 2026: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी पार पडलेल्या मतदानाचा निकाल (Maharashtra Elections 2026) आज जाहीर होणार आहे.  जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1,462  जागांसाठी ही निवडणूक झाली होती. यामध्ये कोकणातील रायगड जिल्हा परिषदेत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. रायगड जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता असलेल्या शेतकरी कामगार पक्षाची (Shetkari Kamgar party) प्रतिष्ठा यंदा पणाला लागली. शेतकरी कामगार पक्ष यंदा महाविकास आघाडीतून निवडणूक लढत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढाई आहे.  शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांचा बालेकिल्ला असणाऱ्या रायगडमध्ये जिल्हा परिषदेची सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपने यावेळी पूर्ण ताकद पणाला लावली होती. रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष 100 टक्के भाजपचाच बसणार, असा विश्वास भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला होता.  रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 69.91 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे आजच्या निकालात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. रायगड जिल्ह्यात यावेळी तटकरे विरुद्ध गोगावले यांच्यातील संघर्ष पाहायला मिळाला होता. रायगड जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 118 जागांचा निकाल आज जाहीर होणार आहे.

Raigad News: रायगड जिल्ह्यात एकूण 69.91 टक्के मतदान 

रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी मतदान पार पडले. या निवडणुकीत जिल्हा परिषद करिता 59 जागा तर पंचायत समिती करिता 118 जागांसाठी लढत होती. या निवडणुकीत 11 लाख 88 हजार 804 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत 69.91 टक्के मतदान झाले होते. सर्वाधिक मतदान कर्जत आणि उरण मध्ये तर त्या खालोखाल खालापूर, पेण आणि अलिबाग मध्ये झाल्याची नोंद आहे. 

1) पनवेल - 69.98 
2) कर्जत - 76.60
3) खालापूर - 75.97
4) सुधागड - 66.16
5) पेण - 75.39
6) उरण - 76.54
7) अलिबाग - 75.17
8) मुरूड- 71.44
9) रोहा - 68.16
10) तळा - 51.83
11) माणगाव - 61.51
12) म्हसळा - 51.36
13) श्रीवर्धन - 55.63
14) महाड - 67.08
15) पोलादपूर - 63.15

एकूण - 69.91 % मतदान

झालेले मतदान 
पुरुष- 604896
महिला - 583904
इतर - 4 
एकूण - 11 लाख 88 हजार 804

Mahayuti ZP Election Resulst 2026: कोकणात महायुतीचे 27 उमेदवार बिनविरोध

कोकणात महायुतीच्या तब्बल 27 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 8, तर पंचायत समितीच्या 17 जागा महायुतीने बिनविरोध जिंकल्या आहेत.50 सदस्यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे 7 आणि शिंदे गटाचा 1 सदस्य बिनविरोध विजयी झाला आहे. तर 100 सदस्यसंख्या असलेल्या पंचायत समितीमध्ये भाजपचे 16 आणि शिंदे शिवसेनेचा 1 सदस्य बिनविरोध विजयी झाल्याचं समोर आलं आहे. 

रायगड आणि रत्नागिरीतून शिवसेनेचे दोन उमेदवार बिनविरोध जिंकले आहेत. महाड पंचायत समिती निवडणुकीत सवाने धामणे पंचायत समिती गणातून उभे असलेले अनिल जाधव यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघारी घेतल्याने अनिल जाधव हे बिनविरोध निवडून आले आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज पंचायत समिती गणातून शिंदे शिवसेनेच्या उमेदवार डॉ. पद्मजा कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. 

Sindhudurg ZP Election 2026: महायुतीच्या बिनविरोध विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग(8 बिनविरोध )
१) खारेपाटण; प्राची इस्वालकर(भाजप)
२)बांदा; प्रमोद कामत (भाजप)
३)जाणवली; रुहिता राजेश तांबे ( भाजची कार्यकर्ती उमेदवार शिवसेना)
४)पडेल ;सुयोगी रविंद्र घाडी (भाजप)
५)बापर्डे ;अवनी अमोल तेली (भाजप)
६) पोंगुर्ले; अनुराधा महेश नारकर (भाजप)
७)किंजवडे-सावी गंगाराम लोके (भाजप)
८) कोळपे; प्रमोद पुंडलिक रावराणे (भाजप)


पंचायत समिती कणकवली(6 बिनविरोध)
१)वरवडे ; सोनू सावंत (भाजपा)
२)नांदगाव; हर्षदा हनुमंत वाळके (भाजप)
३) जाणवली महेश्वरी महेश चव्हाण (भाजप)
४) बिडवाडी; संजना संतोष राणे (भाजप)
५) हरकुळ बुद्रुक; दिव्या दिनकर पेडणेकर (भाजप)
६) नाटळ ; सायली संजय कृपाळ (भाजप)


देवगड तालुक्यातील पंचायत समिती(6 बिनविरोध)
१)पडेल –अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप)
२)नाडण –गणेश सदाशिव राणे (भाजप)
३)बापर्डे – संजना संजय लाड (भाजप)
४) फणसगाव – समृद्धी संतोष चव्हाण (भाजप)
५) शिरगाव – शितल सुरेश तावडे (भाजप)
६) कोटकामते -ऋतुजा राकेश खाजनवाडकर (भाजप)

पंचायत समिती वैभववाडी(1 बिनविरोध)
१) कोकिसरे; सौ.साधना सुधीर नकाशे (भाजप)
पंचायत समिती वेंगुर्ले (1 बिनविरोध)
१)आसोली; संकेत धुरी (भाजप)

मालवण पंचायत समिती (1 बिनविरोध)
१)अडवली मालडी; सीमा सतीश परुळेकर (भाजप)

सावंतवाडी पंचायत समिती (1 बिनविरोध)
१)शेरले; महेश धुरी (भाजप)

दोडामार्ग पंचायत समिती (1 बिनविरोध)
१)कोलझर; गणेश प्रसाद गवस (शिंदे सेना)

आणखी वाचा

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार, मिनी मंत्रालयावर कोणाची सत्ता येणार?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
Embed widget