Rahul Gandhi Viral Video  नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काँग्रेस खासदारांसह नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या (PM Modi) निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. यावेळी सव्वा तीन तासांनंतर राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर दिल्ली पोलिसांनी प्रियांका गांधी यांना मंदिरमार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर दोन तासानंतर सोनिया गांधी मंदिरमार्ग पोलीस स्टेशनला पोहोचल्या. दुपारी साडेतीन वाजल्यापासून पंतप्रधान निवासस्थानाबाहेर राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह ठिय्या आंदोलन केलं होतं.

Continues below advertisement

दरम्यान, तीन तासानंतर पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममधील पायऱ्यांवर बसलेले दिसत आहेत. त्यांनी एका पायात बूट घातला आहे, तर दुसरा पाय उघडा आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी विद्यार्थी प्रश्न, शिक्षण व्यवस्था आणि सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. (Rahul Gandhi Viral Video)

Rahul Gandhi Viral Video : व्हिडिओमध्ये राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

Continues below advertisement

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी म्हणाले की, विद्यार्थी प्रश्न आणि देशाच्या शिक्षण व्यवस्थेच्या ढासळलेल्या स्थितीवर संसदेत चर्चा करण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु सरकारने त्यावर चर्चेला परवानगी दिली नाही. त्यांनी आरोप केला की विद्यार्थ्यांशी संबंधित इतका गंभीर मुद्दा संसदेत टाळण्यात आला. राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ तीन प्रमुख मागण्याही मांडल्या. त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची, विद्यार्थ्यांचा कथित छळ करणाऱ्यांवर कारवाई करण्याची आणि आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवरील खटले मागे घेण्याची मागणी केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील तरुणांची माफी मागण्याचे आणि शिक्षण व परीक्षा पद्धतीत तातडीने सुधारणा सुरू करण्याचे आवाहनही केले.

Congress Protest: पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर अटकेची कारवाई

यापूर्वी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस खासदारांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पंतप्रधानांच्या निवासस्थान, ७ लोक कल्याण मार्ग, येथे आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान, दिल्ली पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी राहुल गांधी, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह अनेक काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तर काही नेत्यांना पोलीस ठाण्यात, तर काहींना नजरकैद केंद्रात नेण्यात आले.

दरम्यान, अटक केल्यानंतर, काही नेत्यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले, तर राहुल गांधी आणि इतरांना छत्रसाल स्टेडियम येथील नजरकैद केंद्रात नेण्यात आले. येथूनच राहुल गांधींचा एक व्हिडिओ समोर आला, जो आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. दरम्यान,अटक केल्यानंतर काही तासांनी, राहुल गांधी आणि इतर अटकेत असलेल्या नेत्यांची छत्रसाल स्टेडियममधून सुटका करण्यात आली. दरम्यान, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधीही अटकेत असलेल्या नेत्यांना भेटण्यासाठी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचल्या.

इतरमहत्वाच्याबातम्या