नवी दिल्ली : एकीकडे बिहारमध्ये प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी भाजपला धक्का देत पोटनिवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या होमग्राऊंडवरच त्यांनी त्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला. त्याचवेळी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे एक ट्वीट चांगलंच चर्चेत आलं आहे. 'जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा', अशा आशयाचं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे. 

Continues below advertisement

नुकतंच झालेल्या दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनामुळे विद्यार्थ्यांची ताकद देशाला दिसून आली. आता त्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन राहुल गांधीही मैदानात उतरले आहेत. येत्या 8 ऑगस्ट रोजी राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी आंदोलन करणार आहेत. रोजगाराच्या मुद्द्यावर ते आंदोलन करणार असून या मध्ये तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. त्याचवेळी 'जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा' असा इशारा त्यांनी उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारला दिला आहे. 

राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "कोटा, देहराडून नंतर आता प्रयागराजमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोनल करण्यात येईल. दरवर्षी लाखो युवक परीक्षांचे फॉर्म भरतात, त्याची फी देतात आणि निकालाची वाट पाहतात. पण पेपरफुटीमध्ये त्यांचे नुकसान झालं आहे. थांबलेल्या भरती प्रक्रियेमुळे त्यांच्या भविष्य धोक्यात आलं आहे. विद्यार्थी त्यांच्या अधिकारांची मागणी करतात म्हणून दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला, त्यांच्यावर पेलेटगनचा हल्ला केला. या प्रश्नावर आम्ही सातत्याने आवाज उठवू आणि विद्यार्थ्यांना न्याय देऊ. जबाबदारी घ्या किंवा सत्ता सोडा."

Continues below advertisement

Prashant Kishor Bankipur Result : प्रशांत किशोर यांचा मोठा विजय

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर आल्यानंतर त्यांच्या होम पीचवर म्हणजेच त्यांच्या स्वतःच्या विधानसभा मतदारसंघात, बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाने जोरदार लढत दिली. प्रशांत किशोर यांचा जवळपास 19 हजार मतांनी विजय झाला आहे.

गेल्या वर्षी झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला भोपळाही फोडता आला नव्हता. मात्र या पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांनी बाजी मारली आहे. भाजप अध्यक्षांच्या हायप्रोफाईल मतदारसंघात जेन झी गेमचेंजर ठरल्याचं दिसून आलं. प्रशांत किशोर यांचा विजय म्हणजे भाजपच्या प्रतिष्ठेला धक्का मानला जात आहे.

पोटनिवडणुकीतील मतदान

  • प्रशांत किशोर (जनसुराज पार्टी)- 63,203
  • नीरज सिन्हा (भारतीय जनता पार्टी)- 44,250
  • रेखा गुप्ता (राष्ट्रीय जनता दल)- 14,085

ही बातमी वाचा: