एक्स्प्लोर

Rahul Gandhi : राहुल गांधींनी उल्लेख केलेल्या राजुरा मतदारसंघात निकाल काय लागला, कोण जिंकलं, कोण हरलं, किती मतदारसंख्या?

Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील 'राजुरा' विधानसभा मतदारसंघात मतचोरीचे गंभीर आरोप केले आहेत.

Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील 'राजुरा' विधानसभा मतदारसंघात (Rajura Assembly Constituency) मतचोरीचे गंभीर आरोप करत पुरावे सादर केले आहेत. त्यांनी दावा केला की, या मतदारसंघात हजारो मतदारांची नावे वगळण्यात आली असून 6,850 नवीन नावे भरली गेली आहेत. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून राजुरा विधानसभा मतदारसंघात कोण जिंकलं, कोण हरलं, मतदारसंख्या किती? याबाबत जाणून घेऊयात..

राजुरा मतदारसंघात काय निकाल लागला?

2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राजुरा (चंद्रपूर) मतदारसंघ भाजपने जिंकला. भाजपचे देवराव विठोबा भोंगळे यांनी काँग्रेसचे जेष्ठ आमदार सुभाष रामचंद्रराव धोटे यांचा 3,054 मतांनी पराभव करून विजय मिळवला. हा निकाल तुलनात्मकदृष्ट्या कमी मताधिक्याने लागल्याने राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या "मतांमध्ये छेडछाड" आणि "हजारो नावे हटवणे व नव्याने नोंदवणे" या आरोपांकडे आता गांभीर्याने पाहिले जात आहे.

राजुरा मतदारसंघातील एकूण मतदारसंख्या व मतदान केंद्रे

नोंदणीकृत मतदार : 3,15,073

पुरुष मतदार : 1,59,821

महिला मतदार : 1,55,252

मतदान केंद्रे : 344

राजुरा मतदारसंघ हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा भाग असून, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. राजकीय दृष्टिकोनातून संवेदनशील आणि चुरशीचा मतदारसंघ म्हणून त्याकडे पाहिले जाते.

राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 

राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “राजुरा मतदारसंघात हजारो नावे वगळण्यात आली आणि नव्याने 6,850 नावे वाढवण्यात आली. मतांची चोरी केल्याचे स्पष्ट पुरावे आमच्याकडे आहेत. हाच प्रकार महाराष्ट्रासह कर्नाटक आणि हरियाणामध्ये घडला आहे.” त्यांनी आणखी एक उदाहरण देताना सांगितले की, कर्नाटकमधील एका विधानसभा मतदारसंघात 6,018 मते हटवली गेली, जेव्हा एका बीएलओने (Booth Level Officer) आपल्याचा काकांचे नाव वगळल्याचे लक्षात आले तेव्हा हा प्रकार उघडकीस आल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

राजुरा विधानसभा निकाल 

2024 = देवराव भोंगले (भाजप) विजयी एकूण मते = 72,882 वि. सुभाष धोटे (काँग्रेस)  पराभूत = एकूण मते - 69,828

2019 = सुभाष धोटे (काँग्रेस) विजयी एकूण मते =. 60,228 वि.  वामनराव चटप (स्वतंत्र भारत पक्ष)  = एकूण मते - 57,727 

2014 =  संजय धोटे (भाजप) विजयी एकूण मते =. 66,223 वि. सुभाष धोटे (काँग्रेस) पराभूत  = एकूण मते - 63,945 

सुभाष धोटे यांचा गंभीर आरोप 

दरम्यान, राजुरा मतदार संघाचे माजी आमदार आणि काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुभाष धोटे यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेतली होती. पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटले होते की, राजुरा मतदार संघात निवडणुकीपूर्वी मी बोगस मतदार नोंदणी झाल्याची जिल्हाधिकारी आणि एसडीएम यांच्याकडे तक्रार केली होती. माझ्या तक्रारीनुसार त्यांनी 6853 मत कमी देखील केली. त्यानंतर देखील दहा-बारा हजार मतं अशी होती मात्र आमचं निवडणुकीच्या धामधुमीत त्याकडे लक्ष गेलं नाही, मात्र राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपानंतर आम्ही सतर्क झालो आणि आम्ही देखील गावागावात अशी चौकशी केली, तेव्हा आम्हाला गडचांदूर आणि राजुरामध्ये जास्तीचे मतदार आढळले. त्याची आम्ही चौकशी करत आहोत. मात्र, जी 6853 नाव बोगस आढळली, ती ज्यांनी एनरोल (enroll) केली त्यांच्यावर निवडणूक आयोगाने अजूनही कुठलीही कारवाई केलेली नाही. आम्ही निवडणूक आयोगासोबत वारंवार पत्रव्यवहार करतोय मात्र काही झालेलं नाही, असे त्यांनी म्हटले होते.

कोण आहेत भाजपचे देवराव भोंगळे?

देवराव भोंगळे हे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचे निकटवर्तीय आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदार संघातून देवराव भोंगळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. देवराव भोंगळे हे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांची लढत काँग्रेसचे जेष्ठ आमदार सुभाष धोटे यांच्यासोबत झाली होती. देवराव भोंगळे यांच्या रूपाने भाजपने या मतदारसंघात एक तरुण आणि नवीन चेहरा दिला होता. या निवडणुकीत देवराम भोंगळे हे विजयी झाले. 

आणखी वाचा 

Rahul Gandhi: पहाटे चारलाच 36 सेकंदात नाव डिलीट, 14 मिनिटात 12 डिलिशनचे अर्ज, काॅल सेंटर, साॅफ्टवेअरचा वापर करत मध्यवर्ती पद्धतीनं हजारो नाव मतदार यादीतून डिलीट; राहुल गांधींचा नवा बाॅम्ब!

महत्त्वाच्या बातम्या

सुनिल तटकरे संधीचा दुरुपयोग करत लोकांना हिणवतात, महेंद्र दळवींचा निशाणा, म्हणाले, अनिकेत तटकरेंना सगळं फुकटचं मिळालं
सुनिल तटकरे संधीचा दुरुपयोग करत लोकांना हिणवतात, महेंद्र दळवींचा निशाणा, म्हणाले, अनिकेत तटकरेंना सगळं फुकटचं मिळालं
Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
Gokul Election 2026 : कोल्हापूरच्या 'गोकुळ'ची निवडणूक जाहीर! 18 ऑक्टोबरला मतदान तर 19 ला निकाल; सतेज पाटील विरुद्ध महायुती असा सामना
कोल्हापूरच्या 'गोकुळ'ची निवडणूक जाहीर! 18 ऑक्टोबरला मतदान तर 19 ला निकाल; सतेज पाटील विरुद्ध महायुती असा सामना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार

व्हिडीओ

Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
Embed widget