पुणे : काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधीपक्षनेते राहुल गांधींच्या (Rahul gandhi) छात्रों की गूंज कार्यक्रमाकडे राज्याचे लक्ष लागले होते. पुण्यातील (Pune) या कार्यक्रमावरुन भाजप आणि काँग्रेस समर्थक आमने-सामने आल्याचंही पाहायला मिळालं. तर, राज्यातील काँग्रेस नेत्यांनी आजच्या कार्यक्रमासाठी जंगी तयारी केली होती. राज्यभरातील विविध कॉलेजमधून हजारो मुली पुण्यातील या कार्यक्रमासाठी एकत्र आल्या. राहुल गांधींनी विद्यार्थीनी आणि मुलींच्या समस्या ऐकून घेत त्यांच्याशी संवाद साधला. त्यामध्ये, पुणे, पालघर, गडचिरोलीतील विद्यार्थीनींनीही आपल्या अडचणी राहुल गांधींसमोर मांडल्या. यावेळी, नेहा राठोड नावाच्या युवतीने केवळ प्रश्न विचारते, सरकारविरोधात बोलते म्हणून मला गेल्या 5 वर्षांपासून शिव्या दिल्या जात असल्याचं म्हटलं. त्यावर, राहुल गांधींनी देखील मजेशीर उत्तर दिलं. 

Continues below advertisement

राहुल गांधींनी महिलांवरील अन्याय, अत्याचार, त्यांच्यावर असलेले सामाजिक, आर्थिक दवाबासह विविध समस्यांवर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून भाष्य केलं. तसेच, काही मुलींना व्यासपीठावर बोलावून त्यांच्याशी संवादही साधला, त्यांच्याकडूनच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी, पालघरमधील एका तरुणीने आदिवासी भागातील, महिलांच्या वसतीगृहातील समस्यांचा पाढाही वाचला. त्यावर, तुम्ही मला तुमच्याकडे बोलवा, मी आवर्जून येईल, असे आश्वासन राहुल गांधींनी दिली. 

राहुल गांधींच्या आजच्या छात्रों की गूंज कार्यक्रमात नेहा राठोड नामक एक भोजपुरी गायक आणि आंदोलक युवतीनेही सहभाग घेतला होता. भोजपुरी लोकगीत लिहणाऱ्या नेहाने आपबिती सांगितली. मी सरकारला प्रश्न विचारते, जे त्यांना पसंत नाहीत. त्यामुळे, मला कित्येक शिव्या दिल्या जातात, आणि गुन्हे दाखल केले जातात. महिलांना ही कुठली इज्जत आहे? लोकशाहीत पंतप्रधानांना प्रश्न विचारल्यावर शिव्या मिळत असतील तर ही कुठली इज्जत आहे? असा सवाल नेहाने राहुल गांधींना विचारला. तसेच, एका गाण्यावरुन आपल्याला पोलिसांकडून, गावातील लोकांकडून त्रास झाल्याचंही तिने सांगितलं. 

Continues below advertisement

एक महिला असूनही तुम्ही सामाजिक मुद्द्यावर भाष्य करू इच्छिता, सामाजिक प्रश्न मांडता, तेव्हा महिलांना टार्गेट केलं जातं. महिलांना टार्गेट करताना केवळ, हीचं चरित्र खराब आहे, एवढंच बोलायचं असतं. मी थोडी धीट मुलगी आहे, त्यामुळे मी घाबरत नाही. मला गेल्या 5 वर्षांपासून शिव्या दिल्या जात आहेत. तसेच, तूला 5 वर्षांपासून शिव्या दिल्या जात आहेत, तू अजून सुधरली नाही का, असा सवालही केला जात असल्याचं नेहाने म्हटले. त्यावर, मी त्यांना सांगू इच्छिते की, मै नही सुधरणेवाली असे नेहाने म्हटले. त्याचवेळी, राहुल गांधींनीही नेहाची री ओढली... मुझे भी सालों से गालीया दे रहे है... मी भी नही सुधरणेवाला... असे राहुल गांधींनी म्हटले. त्यावर, नेहाने हात उंचावत दाद दिली. 

हेही वाचा

महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले