Radhakrishna Vikhe Patil on Maratha Reservation : ⁠मराठाआरक्षणसंदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे, मागच्या वेळी हैद्राबाद गॅजेटची अंमलबजावणी, ⁠शहीद झालेल्यांना नोकरी आणि ⁠ज्या काही उणिवा आहे, त्याबाबत आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याशी चर्चा करणार आहोत. याभेटीदरम्यान, ⁠काही गैरसमज असतील तर तेही दूर करू. माझा ⁠जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून संवाद नाही. ⁠मात्र जे काही निर्णय घेतले ते कागदोपत्री व्यवहार जरांगे पाटील यांच्याशी केलेली आहे. ⁠आम्ही अंमलबजावणी प्रभावीपणे केलेली आहे. काही कायदेशीरबाबी उपस्थित होतात. त्यामुळे विलंब होतो. मात्र त्यातही प्रयत्न सुरू आहे. ⁠मनोज जरांगे पाटील यांना काही गैरसमज झाला आहे, मी आज भेटून त्यांना वस्तुस्थिती सांगेन. शिवाय ⁠माझाशी चर्चा केल्यानंतर मला वाटत नाही ते उपोषणाला बसतील. असाविश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री तथा मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)  यांनीबोलतानाव्यक्तकेलाआहे.

Continues below advertisement

Radhakrishna Vikhe Patil: ⁠काही अडचण सांगितल्यानंतर मला वाटत नाही, ते सातारा गॅजेटसाठी आग्रही राहतील

राज्यात ⁠58 लाख कुणबी नोंदी निघाल्या, ⁠अडीच लाखांपेक्षा जास्त दाखले दिलेले आहेत. ⁠नंबर प्रमाणे वंशावळ नोंदलेले नाही, ⁠काही अधिकाऱ्यांनी ती नोंदवलेली नाही. ⁠जुन्या लिपी, मोडी लिपी समजण्यासाठी आपण अभ्यासक घेतले आहेत. ⁠जरांगेपाटील यांना काही गैरसमज झाला आहे, मी आज भेटून त्यांना वस्तुस्थिती सांगेन. ⁠माझाशी चर्चाकेल्यानंतर मला वाटत नाही ते उपोषणाला बसतील. ⁠सातारा गॅजेटबाबत काही अडचणी आहेत. ⁠काही अडचण सांगितल्यानंतर मला वाटत नाही, ते सातारा गॅजेटसाठी आग्रही राहतील. असेही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

Continues below advertisement

Radhakrishna Vikhe Patil: ....पण ते आमच्या हातात नाही

दरम्यान, ⁠2014 ते 2019 मध्ये जे मोर्चे निघाले तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. ⁠आरक्षण देण्याची भूमिका त्यांची होती. मधल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने काही केलं नाही. आमच्या सरकारने आरक्षण दिले. ⁠जरांगे पाटील यांची मराठा समाजाबाबतची भावना त्याचा आदर आहे. 961 गुन्हे आहेत, यातील बहुतांश गुन्हे मागे घेतलेले आहेत. ⁠64 गुन्हे फक्त राहिलेले आहेत. त्यात जरांगे पाटील म्हणाले की कलमं कमी करा, पण ते आमच्या हातात नाही, असेही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.