Pune Graduate Constituency News : विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या  पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघावरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र, वरिष्ठ पातळीवरील दीर्घ चर्चेनंतर पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ अखेर भाजपच्याच वाट्याला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुनिल टिंगरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच ही जागा लढवणार असल्याची भूमिका सुनिल टिंगरेंनी जाहीर केली. 

Continues below advertisement

पदवीधर मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी भूमिका जाहीर केली आहे. पदवीधर मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच सदर जागा लढवणार असल्याचे टिंगरे म्हणाले. माजी आमदार सुनील टिंगरे यांची सोशल मीडियातून भूमिका जाहीर केली. अजित पवारांच्या निधनानंतर पहिलीच निवडणूक असल्यामुळे महायुतीतील नेत्यांनी देखील संबंधित जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडावी असे मत टिंगरे यांनी व्यक्त केले. भाजप पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची जागा लढवणार असल्याची बाब समोर येत असल्यामुळे टिंगरे यांची व्हिडिओच्या माध्यमातून पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. 

महायुतीचे मतदारसंघनिहाय जागावाटप झाल्याची माहिती

विधान परिषदेच्या विविध जागांवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये पुढीलप्रमाणे जागावाटप ठरल्याचे समोर आले आहे.

Continues below advertisement

पुणे शिक्षक : भारतीय जनता पक्ष (BJP)

पुणे पदवीधर : भारतीय जनता पक्ष (BJP)

नागपूर पदवीधर : भारतीय जनता पक्ष (BJP)

अमरावती : शिवसेना (शिंदे गट)

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

राष्ट्रवादीचे नेते भैय्या माने अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीत मोठा पेच निर्माण झाला असून, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते प्रताप उर्फ भैय्या माने यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. णे पदवीधर मतदारसंघाची जागा महायुतीमध्ये भाजपकडे जाण्याचे निश्चित झाल्याने, राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले भैय्या माने नाराज झाले. त्यांनी आपल्या भविष्याचा विचार करून स्वबळावर मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. भैय्या माने यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर मुश्रीफ यांनी "आजपासून माझा आणि भैय्या माने यांचा संबंध संपला," असे जाहीर करत महायुती धर्म पाळत आपण भाजपसोबत असल्याचे स्पष्ट केले.