पुणे शिक्षक आणि पदवीधर भाजपकडे; आता एकनाथ शिंदेंच्या आरोग्यदूतांची आणि उदय सामंतांच्या माजी OSD ची तलवार म्यान होणार की बंड करणार?
पुणे शिक्षक मतदारसंघा'वरुन भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु होती. मात्र, चर्चेनंतर पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्याच वाट्याला गेल्याची माहिती मिळतेय.
Pune Teachers Constituency Election News : विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटला आहे. गेल्या काही दिवसांपासून अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या पुणे शिक्षक मतदारसंघा'वरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र, वरिष्ठ पातळीवरील दीर्घ चर्चेनंतर पुणे शिक्षक मतदारसंघ अखेर भाजपच्याच वाट्याला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीकडून मंत्री उदय सामंत निकटवर्गीय व त्यांचे माझी ओएसडी सचिन सानप हे इच्छुक आहेत.पुणे शिक्षक मतदारसंघातून उभे राहणारच अशी ठाम भूमिका सानप यांनी मांडली आहे. पक्ष नाही तर अपक्ष म्हणून तरी ही लढाई लढणार आहे असे सानप म्हणाले. दरम्यान, दुसऱ्या बाजुला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे हे देखील इच्छुक आहेत.
महायुतीकडून मला उमदेवारी हवी आहे मी त्यासाठी प्रयत्न करतोय
सानप हे पुणे वाडिया कॉलेजला राज्यशास्त्र या विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यामुळं हा तिढा कधी सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. मी निवडणूक लढवणार आहे, मी अपक्ष उमदेवारी अर्ज दाखल करणार आहे असे सानप म्हणाले. शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच होणार असल्याचे सानप म्हणाले. महायुतीकडून मला उमदेवारी हवी आहे मी त्यासाठी प्रयत्न पण करत असल्याचे सानप म्हणाले. पण जर उमेदवारी नाही मिळाली तरी मी अर्ज भरणार असल्याची भूमिका सानप यांनी मांडली.
महायुतीचे मतदारसंघनिहाय जागावाटप
विधान परिषदेच्या विविध जागांवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये पुढीलप्रमाणे जागावाटप ठरल्याचे समोर आले आहे.
पुणे शिक्षक : भारतीय जनता पक्ष (BJP)
पुणे पदवीधर : भारतीय जनता पक्ष (BJP)
नागपूर पदवीधर : भारतीय जनता पक्ष (BJP)
अमरावती : शिवसेना (शिंदे गट)
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
रवींद्र चव्हाण यांच्याकडून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना तिन्ही मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावाची यादी सुपूर्द
दरम्यान, पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा भाजपला मिळताच पक्षांतर्गत हालचालींना प्रचंड वेग आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेऊन तिन्ही मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावाची यादी सुपूर्द केली आहे. भाजपने प्रत्येक जागेसाठी 5 संभाव्य उमेदवारांचे पर्याय ठेवले असून, 3 मतदारसंघांसाठी एकूण 15 नावं केंद्रीय नेतृत्वाकडे सोपवण्यात आली आहेत. यामध्ये पुण्याच्या जागेवरील प्रमुख दावेदारांचाही समावेश असून, केंद्रीय निवडणूक समितीकडून लवकरच अधिकृत उमेदवाराच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
Before You Go
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha






















