पुणे: पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी करण्यासाठी गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (MNS) अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचा दौरा चांगलाच चर्चेत आला. याठिकाणी अमित ठाकरे मुख्याधापकांच्या कार्यालयात उभे असताना एका विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या शेजारी नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) फोटो लावण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तेव्हा अमित ठाकरे यांनी शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला नरेंद्र मोदी यांचा फोटो कशाला, असे मुख्याधापकांना विचारले. एवढेच नव्हे तर पुढच्याच क्षणाला मनसेच्या प्रशांत कनोजिया, विक्रांत भिलारे या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा फोटो तिथून खाली उतरवला. त्यानंतर आता या दोन्ही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत कनोजिया आणि विक्रांत भिलारे या दोन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. चतुःश्रृंगी पोलीसांनी अमित ठाकरेंसोबत मनसेच्या या कार्यकर्त्यांनी मोदींचा फोटो हटवला होता. काल अमित ठाकरे यांच्यासह 20 ते 25 जणांवर पुण्यातील चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर रात्रीच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना (MNS) पुणे पोलिसांनी रात्री उशिरा दोघांना अटक केली आहे.
PM Modi and Amit Thackeray Pune : पुण्यात नेमकं काय घडलं?
पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी करण्यासाठी गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (MNS) अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचा दौरा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अमित ठाकरे सोमवारी शिवाजीनगर येथील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयात गेले होते. याठिकाणी अमित ठाकरे यांनी कँटिनमधील जेवण आणि स्पोर्टस कोट्यातली खेळाडूंसाठी प्रशिक्षक नसल्याबद्दल महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना जाब विचारला. अमित ठाकरे मुख्याधापकांच्या कार्यालयात उभे असताना एका विद्यार्थ्याने याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या शेजारी नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) फोटो लावण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तेव्हा अमित ठाकरे यांनी शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला नरेंद्र मोदी यांचा फोटो कशाला, असे मुख्याधापकांना विचारले. एवढेच नव्हे तर पुढच्याच क्षणाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा फोटो तिथून खाली उतरवला. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन आता पुण्यातील भाजप नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे.
अमित ठाकरे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना पंतप्रधान मोदींचा फोटो काढण्याच्या कृतीचे समर्थन केले. एका विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला मोदींचा फोटो लावल्याचे माझ्या लक्षात आणून दिले. मोदींना एवढ्या थराला नेऊन ठेऊ नका. नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी होऊ शकत नाही. शासकीय महाविद्यालयात पंतप्रधानांचा फोटो लावण्याचा प्रोटोकॉल असेल पण मग मोदींचा फोटो दुसरीकडे लावा. तो फोटो छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूला नको. भाजपचे नेते याचा निषेध करत असतील तर त्यांना विचारा की, तुम्हाला छत्रपती शिवराय आणि मोदींची तुलना मान्य आहे का? आम्ही महाराजांचा अपमान सहन करणार नाही. उद्या तुम्ही देवघरात मोदींचा फोटो लावाल, मोदी आणि शिवरायांचा फोटो बाजूला लावण्याच्या निर्णयाचे समर्थन भाजपचे नेते तरी करणार आहेत का, असा प्रतिसवाल अमित ठाकरे यांनी विचारला.
