पुणे: पुण्यातील ऐतिहासिक आणि पुरोगामी विचारांचे केंद्र असलेल्या 'महात्मा फुले वाड्या'मध्ये भाजप खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी वटपौर्णिमा साजरी केल्याने एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या वाड्यात वटपौर्णिमा साजरी करणे ही कृती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांशी विसंगत आणि त्यांच्या विचारांच्या विरोधात जाणारी आहे, असा दावा करत विविध स्तरांतून यावर तीव्र आक्षेप घेतला जात आहे.(Pune News Medha Kulkarni) २९ जून रोजी वटपौर्णिमेच्या दिवशी खासदार मेधा कुलकर्णी यांनी या ठिकाणी हजेरी लावली आणि वडाची पूजा केली. 

Sushma andhare on Medha Kulkarni :  सुषमा अंधारेंचा थेट हल्ला; पोस्ट शेअर करत व्यक्त केला संताप

या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर मेधा कुलकर्णी यांच्या पूजेचे फोटो शेअर करत आपल्या अधिकृत पोस्टद्वारे तीव्र संताप व्यक्त केला आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा आणि कर्मकांडाच्या विरोधात लढा दिला. ज्या वास्तूतून त्यांनी सत्यशोधक विचारांचा प्रसार केला, त्याच वाड्यात सरकारी बंदोबस्तात पारंपरिक धार्मिक पूजा अर्चा करणे पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना आणि विचारवंतांना रुचलेले नाही. यामुळे या प्रकरणी पुण्यात आगामी काळात राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

Sushma andhare on Medha Kulkarni :  सुषमा अंधारेंनी पोस्टमध्ये काय म्हटलं?

मेधा कुलकर्णींनी जाणीवपूर्वक कोथरूड मधले सगळे वड सोडून ठरवून फुले वाड्यात येणे हा आचरटपणा नाही तो शुद्ध हलकटपणा होता. त्याहीपेक्षा एका ऐतिहासिक वास्तूमध्ये आता तरीपणा दरवर्षी ठरवून हेतूपुरस्सर चालवला जातो तरीसुद्धा त्यावर राज्याचे गृहमंत्री ठरवून दुर्लक्ष करतात हे सुनियोजित कटकारस्थान आहे. सध्या आमदार आणि खासदार अशा लोकांना केलं जात आहे जे जास्तीत जास्त गलिच्छ भाषा वापरू शकतात, जास्तीत जास्त दोन जातीमध्ये आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करू शकतात, व खूप नसताना वाटेल त्याच्यावर वर तोंड करून भुंकू शकतात.. ज्यांचा आणि विवेकाचा अजिबातच संबंध नाही आणि ज्यांचं कर्तृत्व शून्य आहे... 

बोलघेवडे पणा आणि आक्रस्ताळेपणा ही जणू एक खास पद्धतीची पात्रता ठरलेली आहे. मेधा कुलकर्णी आणि तत्सम सुमार बुद्धिमत्तेच्या महिलांना, आणि एकूणच आमदार खासदारांना आक्रमकता आणि आक्रस्ताळेपणा यातला फरक ज्या दिवशी कळेल तो सुदिन समजावा...! सध्या तरी मेधा कुलकर्णीचं हे वागणं मी जरा सकारात्मक घ्यायचं ठरवलं आहे. कदाचित हिंदुत्ववाद हिंदुत्ववाद म्हणणारे हिंदू मुलींवर बलात्कार व्हायला लागले तरी जात आणि धर्म बघून गप्प बसतात. नीट परीक्षा फुटी नंतर लाखो हिंदू विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागलं तरी त्यावर चकार शब्द काढू शकत नाहीत.... हिंदू तरुण लोकलमध्ये मारला गेला तरी त्यावर ते बोलू शकत नाही.... हिंदू पत्रकारांना कुणी शिव्या घातल्या तरी त्यांची जीभ उचकटत नाही...

राम मंदिरात चोरी झाली तरी हे स्वयंघोषित हिंदुत्ववादी त्यावर सोयीस्कर म्हणून बाळगतात...कदाचित असा नकली हिंदुत्ववादी असण्यापेक्षा क्रांतीबा ज्योतिबा फुलें सारखा महिलांचा सन्मान करणारा पत्नीला आदराचे स्थान देणारा आणि पावलोपावली तिची साथ देणारा आयुष्याचा जोडीदार आपल्याला मिळायला हवा किंबहुना ते गुण आपल्या वर्तमान जोडीदारां मध्ये यावेत यासाठी कोथरूड मधले सगळे वड सोडून  फुले वाड्या तला वड मेधा कुलकर्णींना अधिक महत्त्वाचा वाटत असेल...! मेधा कुलकर्णी जी तुमच्या यजमाना मध्ये ज्योतिबांचे गुण यावे त्याने तुम्हाला मा सावित्रीचा विवेक समजावून सांगावा, असंही सुषमा अंधारेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.