एक्स्प्लोर

Pune MPSC protest: पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी

Pune MPSC protest: दोन्ही बाजूने एक-एक पाऊल मागे अन् तिढा सुटला. सरकारने पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली? मध्यरात्री एस.एम. जोशी पुलाजवळ काय घडलं?

Pune MPSC protest: पुण्यात  MPSC च्या विद्यार्थ्यांची तीन वेगवगेळी आंदोलनं सुरु होती . रोहित पवारांच्या नेतृत्वात एस एम जोशी पुलावर सुरु असलेल्या आंदोलनात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार (Vivek Bhimanwar) यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्य मागणी होती. शास्त्री रस्त्यावरील आंदोलनात परीक्षा (MPSC exam) ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने घेण्यात यावी ही मुख्य मागणी होती . तर अलका चौकात सुरु झालेल्या आंदोलनात परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनं घेण्यात यावी ही मुख्य मागणी होती . याशिवाय, या तिन्ही ठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनातील आंदोलकांच्या काही सामान मागण्या होत्या . ज्यामध्ये सत्तर हजार जागांची पदभरती करणं , गट - ब आणि गट क पदाच्या जागा दुप्पट करणं , सर्व परीक्षांसाठी एकच स्मार्ट कार्ड लागू करण्यात यावं या तिन्ही आंदोलकांच्या सामान मागण्या होत्या ज्या 30 सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या शिष्टमंडळाच्या बैठकीत मान्य करण्यात आल्या होत्या. (Pune news)

 मात्र, 12 दिवस आंदोलन केल्यानंतर तिन्हीपैकी एकाही आंदोलनातील आंदोलकांची मागणी थेटपणे मान्य झालेली नाही असच म्हणावं लागेल .  एमपीएससीच्या पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी माजी न्यायमूर्ती दिलीप शिंदे अध्यक्ष असलेली आणि तूआक्रम मुंडे सचिव असलेली समिती नेमण्यात आलीय . या समितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत भीमनवारांनी स्वतःहून रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

एमपीएससीची परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने घेण्यात यावी आणि एम पी एस सी ची परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने घेण्यात यावी यासाठी सुरु असलेल्या दोन आंदोलनातील आंदोलकांची तर सरकारसोबत चर्चा करू, या आश्वासनावर बोळवण करण्यात आली आहे. 12 दिवस चाललेल्या आंदोलनानंतर भीमनवारांच्या राजीनाम्याची मागणी थेट मान्य झालेली नसली तरी आंदोलनाच्या दबावामुळे भीमनवारांना स्वतःहून रजेवर जावं लागलंय हे स्पष्ट आहे . राज्य सरकारमधील मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे रोहित पवारांसोबत आंदोलकांची भेट घेण्यासाठी आंदोलनस्थळी आले आणि त्यानंतर विवेक भीमनवार यांनी ते रजेवर जात असल्याचं ट्विट केलं. यामुळं आंदोलक आणि सरकार ...   एक एक पाऊल मागे आले आणि वीन वीन सिच्युएशनमध्ये या आंदोलनाचा शेवट करण्याचा प्रयत्न झाला .

Pune news: एमपीएससी आंदोलकांच्या कोणत्या मागण्या सरकारने मान्य केल्या?

* आंदोलकांचा राजीनाम्यासाठी आग्रह,पण सरकारनं चौकशी समिती नेमली
* चौकशी होईपर्यंत अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर
* भीमनवार यांच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समितीस दोन महिन्यांचा वेळ
* दिलीप भोसले चौकशी समितीचे अध्यक्ष, तुकाराम मुंडेही समितीवर
* एमपीएससीतील आजी-माजी अध्यक्षांपासून शिपायांपर्यंतच्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार
* आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन 
* तीन वर्षात 70 हजार रिक्त पदे भरु असं आश्वासन
* 2027 मध्ये होणाऱ्या गट क च्या पदांमध्ये वाढ करणार
* मागण्या मान्य करत असलेल्या पत्रावर मुख्य सचिवांची सही
* तहसीलदार भरतीत 60-40 ऐवजी 50-50 चा रेश्यो
* आयोगाची सदस्य संख्या 11 पर्यंत वाढवली जाणार
* एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार
* पोलीस भरतीसाठी एकच अभ्यासक्रम ठेवण्याचेही मान्य

आणखी वाचा

Vivekanand Patil and Navnath Ban: नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला

Vivekanand Patil MPSC Protest Pune: आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
Satej Patil: गोकुळची मतमोजणी पूर्ण होत नव्हती, शरद पवारसाहेबांचा फोन आला आणि त्यांनी एक सल्ला दिला...,सतेज पाटील म्हणाले... 
गोकुळच्या मतमोजणीवेळी शरद पवारांचा फोन, सतेज पाटील यांना कोणता सल्ला दिलेला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
Advertisement

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
Hardik Pandya : हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगच्या ट्रेडमध्ये सर्वाधिक फायदा कोणाचा? मुंबई नव्हे पंजाबच फायद्यात, मोहम्मद कैफ म्हणाला...
हार्दिक आणि अर्शदीपच्या ट्रेडमध्ये फायदा कोणाचा? पंजाबचं नाव घेत मोहम्मद कैफ म्हणाला...
Nagpur Accident Parinay Fuke Son: मध्य प्रदेशातील अभयारण्यात अपघात, एकाने जीव गमावला; आमदार परिणय फुकेंच्या मुलाबाबत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचा खुलासा
मध्य प्रदेशातील अभयारण्यात अपघात, एकाने जीव गमावला; आमदार परिणय फुकेंच्या मुलाबाबत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचा खुलासा
Embed widget