एक्स्प्लोर

Pune MNS : पिट्या भाईने भाजपमध्ये जाताना मनसेची चित्रपट सेना फोडली, राज ठाकरेंनी आक्रमक शिलेदार पुण्यात पाठवला

Pune MNS: पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आता पुण्यात मनसेला मोठं खिंडार पडल्याचं दिसतंय. असे असताना आता मनसेकडून पुण्यात नव्यानं मोर्चेबांधणी केली जात असल्याचे चित्र आहे.

Pune MNS: 'मुळशी पॅटर्न' चित्रपटफेम पिट्या भाई अर्थात अभिनेते रमेश परदेशी (Ramesh Pardeshi)  यांनी नुकतेच मनसे प्रमुख राज ठाकरेंची साथ सोडत भाजपचे कमळ हाती घेतले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavanआणि भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत रमेश परदेशी (Ramesh Pardeshi)  यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. या पक्षप्रवेशाने ऐन निवडणुकीच्या काळात पुण्यात मनसेला भाजपने धक्का दिलाय. महत्त्वाची बाब म्हणजे, पिट्या भाईसोबतच पुण्यातील (Pune) मनसेच्या पदाधिकाऱ्यांन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आता पुण्यात मनसेला मोठं खिंडार पडल्याचं दिसतंय. 

दरम्यान, असे असताना आता मनसेकडून देखील पुण्यात नव्यानं मोर्चेबांधणी केली जात असल्याचे चित्र आहे. अभिनेते रमेश परदेशी यांच्या भाजप प्रवेशानंतर मनसे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) आज पुण्यात दाखल झाले आहे. पुण्यात मनसे चित्रपट सेनची आज महत्वाची बैठक पार पडणार असून अनेकांचा मनसेत पक्षप्रवेश होणार असल्याचीही माहिती आहे.

Pune MNS: राज ठाकरेंनी आक्रमक शिलेदार पुण्यात पाठवला; अनेकांचा मनसेत पक्षप्रवेश

दरम्यान, पुण्यात आज मनसे शहर कार्यालयात चित्रपट सेनेची महत्वाची बैठक पार पडणार आहे. अभिनेते रमेश परदेशी यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनतर आता आज अमेय खोपकर पुण्यातील चित्रपट सेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत संवाद साधणार आहेत. तर अनेकांचा पक्ष प्रवेश सोहळा देखील आज पार पडणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे पुण्यात एकीकडे पिट्या भाईने भाजपमध्ये जाताना मनसेची चित्रपट सेना फोडली असताना राज ठाकरेंनी आक्रमक शिलेदार पुण्यात पाठवत पक्षाची पुनर्बांधणी करत असल्याचे चित्र आहे.

Ameya Khopkar : आम्ही आणखी जोमाने काम करू, रमेश परदेशी यांना माझ्या शुभेच्छा

दरम्यान, यावेळी बोलताना स्वतः मनसे नेते अमेय खोपकर यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले कि, कार्यकर्त्यांना कोणताही कानमंत्र दिला नाही. चित्रपट सेनेचे पदाधिकारी गेले 18 वर्षांपासून राज साहेबांच्या सोबत आहेत. पक्षासोबत आहेत. त्यांनी आज आम्ही कुठेही जाणार नाही, शेवटपर्यंत राज साहेबांच्या सोबतच आहोत आणि काम करू, अशी ग्वाही दिली. रमेश परदेशी यांनी का पक्ष सोडला हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांना शुभेच्छा आहेत. आम्ही आणखी जोमाने काम करू. याआधी देखील अशा प्रकारच्या बैठका व्हायच्या. मला रमेश परदेशीं बाबत काही बोलायचं नाही. भाजपमध्ये गेले तर ते काय करतील याबद्दल देखील मला बोलायचं नाही. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. असेही अमेय खोपकर म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या 

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती; प्रत्यक्षात एका खासदाराशीच झालं बोलणं
उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती; प्रत्यक्षात एका खासदाराशीच झालं बोलणं
EVM मधील गडबड सुप्रीम कोर्टात पोहोचताचं भाजपनं मशिन्स जाळल्या, नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप
EVM मधील गडबड सुप्रीम कोर्टात पोहोचताचं भाजपनं मशिन्स जाळल्या, नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप
रोहित पवारांचं आंदोलन मनोज जरांगे स्टाईल अन् नौटंकी; भाजप आमदाराची टीका, अन्नत्याग उपोषणाची उडवली खिल्ली
रोहित पवारांचं आंदोलन मनोज जरांगे स्टाईल अन् नौटंकी; भाजप आमदाराची टीका, अन्नत्याग उपोषणाची उडवली खिल्ली
BJP : सांगली सातारा विधानपरिषदेत दगाफटका टाळण्यासाठी भाजपचा प्लॅन, सांगली महापालिकेचे नगरसेवक अज्ञातस्थळी, एसी बसमधून सहलीला रवाना
सांगली सातारा विधानपरिषदेत दगाफटका टाळण्यासाठी भाजपचा प्लॅन, सांगली महापालिकेचे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना

व्हिडीओ

Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप
Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Iran War Live Update: भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
Solapur Accident: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
Video: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
Morena Train Accident: इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
Malshiras Pickup Accident : माळशिरसमध्ये पिकअप विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, रस्ता सुरक्षा उपाय योजना नाहीत, बैठका होतात पण कंत्राटदारांवर कारवाई होत नाही, धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य
माळशिरसमध्ये भीषण अपघात, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, चार चार वर्ष कामं अपूर्ण, पत्रव्यवहार केला तरी दखल घेत नाहीत...
Solapur Accident: दिंडोरीतील विहिरीत वाहन पडून 9 जण, माळशिरसमध्ये 8 मृत्युमुखी; अपघात 'हॉटस्पॉट'वर सरकार लक्ष देणार का?
दिंडोरीतील विहिरीत वाहन पडून 9 जण, माळशिरसमध्ये 8 मृत्युमुखी; अपघात 'हॉटस्पॉट'वर सरकार लक्ष देणार का?
Embed widget