पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये (Election) आता सत्तेत एकत्र असलेले पक्षही आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात, पुणे आणि पिपंरीचिंचवड महानगरपालिका निवडणुकांवरुन भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सध्या जोरदार कलगीतुरा रंगला आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे (Pune) महापालिकेत अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगतोय. त्यामुळे आरोपांना चांगलीच धार आली आहे. अजित पवारांनी भाजपचा भ्रष्टाचारी असा उल्लेख केल्यानं संतापलेल्या भाजपनं अजित पवारांवर तोफ डागली. अजितदादा, दमानं घेऊ नका आणि हलक्यात घेऊ नका. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमच्याकडे आहे हे विसरू नका असा थेट इशारा भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी दिला होता. आता, पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली.
देवाभाऊतुमआगेबढोहमतुम्हारे साथ है, असे म्हणत भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली. पुण्यातील महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आयोजित प्रचारसभेत बोलताना पाटील यांनी अजित पवारांच्या कार्यकाळात पुण्यात आणि पिंपरीचिंचवडमध्ये काय विकास झाला, असा सवाल उपस्थित केला. तसेच, पुणे मेट्रो आणि उड्डाण पूल हे आमच्या काळात झाले. नगरपालिका निवडणुकीत आपण विजय मिळवला, आता 15 तारखेला मतदान करुनपुण्यात भाजपचा महापौर होणार आहे, असेही पाटील यांनी म्हटले.
अजितदादा म्हणालेकी,पिंपरीआणि पुण्यामध्ये विकास झाला नाही, मग अजित दादा अगोदर सत्ता तुमची होती, तेव्हा विकास का केला नाही. आता, महाविकास आघाडी विकास करायला पुढे आली आहे, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. अजित पवार अनेक वर्ष सत्तेत असताना आम्हाला प्रश्न विचारतात, पाच वर्षात तुम्ही काय केले? त्यांना अनेक कामांच्यायादी सांगता येतील, अजित दादा जनता खुळी नाही. उड्डाणपूल आणि मेट्रो करायला अजित दादा उशीर का झाला? मेट्रो आम्ही आणली,तुमची नुसती कागदावर राहिली. पुण्याततुम्ही 2001 पासून 2017 पर्यंत मेट्रो करू शकला नाहीत. तुम्ही आम्हाला विचारता काय केलं? मात्र आता जनता तुम्हाला विचारणार आहे, तुम्ही काय केलं? असा सवाल उपस्थित करत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं.
मुख्यमंत्री फडणवीसांची पुण्याच्या 'विकास की बात'
पुण्यात पर्यटक वाढतील, पुणे शहर सेंटर झाले आहे. पुणेकर दोन महापालिकेचं पाणी एकटे वापरतात असे बोलले जायचे. कारण, पाणी वाटण्यात विषमता होती. पण, आता महापालिकेचा निर्णय झाला असून24बाय7 पाणी योजना सुरू केली आहे, लवकरच ती पूर्ण झाल्यावर समान पाणीपुरवठा होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी म्हटले.
पुण्यात तीन हजार कोटी रुपयांची काम 24बाय7तासांमधून सुरू आहेत, जायका प्रकल्प सुरू आहे 2 हजार कोटी रुपयांचे. काय केलं सांगणार नाही, तर काय करणार हे सांगणार आहे. देशातील पहिले व्हायब्रंट शहर पुण्याला करणार आहे, मेट्रो शहर करणार आहे. 2030 पुण्याचा कॅपिटलप्लॅन तयार केला आहे, 44 हजार कोटी रुपये खर्च करणार असून वाहतूक आणि इतर व्यवस्थेसाठी हा पैसा खर्च केला जाईल. तो प्लॅन लवकर आपल्यासमोर मांडू, असे पुणेकरांना उद्देशूनदेवेंद्रफडणवीस यांनी म्हटले.
पुणे ग्रोथ हब तयार करू, पुण्याची ग्रोथ चार पटीने वाढली पाहिजे असा आमचा मानस आहे. येथे रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाणार आहे. येथील वाहतूक कासवगतीने पुढे जात आहे, सर्वात कमी रस्ते आहेत, 9 टक्के रस्ते आहेत, शहरात रस्ते वाढले पाहिजे. रस्ते नियोजन कोणी केले, ज्यांनी नियोजन केले त्यात मी जात नाही, राजकारणात मी जात नाही, 32 टक्के वाहतूक आहे, जास्त वाहतूक आहे. राज्यात सर्वात कमी गतीने वाहतूक पुण्यात चालते, असेही फडणवीसांनीसांगितले.
मेट्रो जाळं, इलेक्ट्रिक बसेस, 32 रस्ते केले जाणार आहेत,एआयचा वापर करून आपण वाहतूक व्यवस्थित सुधार करणार आहोत, 13 उड्डाणपूल केले जाणार आहेत. पुण्याचा प्रोब्लेम आहे तो म्हणजे उत्तर-दक्षिण पुणे कमी आहे. आता, पुण्याला नव्याने जागा नाही घेऊ शकत. पुणे वाहतूक व्यवस्थित करण्यासाठी पाताळात जाण्याचा निर्णय घेतला आहे, 54 किलोमीटर टनेल करणार आहोत, पहिला मार्ग कात्रजपासून सुरू करणार आहोत, असेही फडणवीसांनीसांगितले. मी हवेत बोलत नाही, माझ्याकडेसगळे प्लॅन तयार आहेत, रिंगचं रोड काम सुरू केलं आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
