Pune Mahangarpalika Election 2026: यंदाच्या निवडणुकीत पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये बीडकर-धंगेकर लढत पुन्हा पाहायला मिळणार आहे. 2017 मधील नगरसेवकपदाच्या निवडणुकीत रविंद्र धंगेकरांनी गणेश बिडकरांचा पराभव केला होता. यावेळी गणेश बिडकरांच्यासमोर (Ganesh Bidkar) रविंद्र धंगेकरांचा मुलगा प्रणवचे आव्हान असणार आहे. मात्र, याच प्रभागात आता अजित पवार गटाच्या उमेदवाराचीदेखील चांगली चर्चा होऊ लागली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून याठिकाणी गणेश नवथरे (Ganesh Navthare) हे उमेदवार आहेत. त्यामुळे आता या प्रभागात नेहमीप्रमाणे दुहेरी नाही तर तिरंगी लढत रंगणार आहे. याचा फटका रवींद्र धंगेकरांच्या (Ravindra Dhangekar) मुलाला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (PMC Election 2026)
भाजपकडून पुण्यातील प्रभाग क्रमांक 24 मधून गणेश बीडकर, शिवसेनेकडून रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर आणि राष्ट्रवादीकडून गणेश नवथरे हे तिघे सध्या एका प्रभागत रिंगणात आहे. या प्रभागात उमेदवारी देताना भाजप आणि शिवसेनेची युती तुटली असावी, अशा चर्चा आहे. कारण गणेश बीडकर यांची उमेदवारी फिक्स होती. सोबतच धंगेकरांनादेखील याच प्रभागातून उमेदवारी हवी असल्याने त्यांनी महायुतीतून उमेदवारी मिळवण्यासाठी मेहनत केली. मात्र ते गणित काही जुळलं नाही. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेने वेगळं लढण्याचं ठरवलं आणि युती तुटली. हे सगळं सुरु असताना अजित पवार मात्र या प्रभागात तगडा उमेदवार देण्या्चया तयारीत होते. चाचपणी सुरु केली आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर अजित पवारांनी या प्रभागातून गणेश नवथरे यांना उमेदवारी दिली.
Pune Election 2026: नवथरेंमुळे प्रणव धंगेकरांना फटका बसणार?
अजित पवारांच्या उमेदवाराचं नाव नवीन असलं तरी ग्राऊंड रिलॅलिटी बघून अजित पवारांनी गणेश नवथरे यांना उमेदवारी देण्यात आल्याचे सांगितले जाते. प्रभाग क्रमांक 24 मध्ये कसबा गणपती, कमला नेहरू हॉस्पिटल आणि K.E.M. हॉस्पिटल परिसराचा समावेश आहे. या भागात ग्राऊंड लेव्हलला गणेश नवथरे यांनी काम केले आहे, त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. महत्वाचं म्हणजे नवथरे हे धंगेकरांचे फार जवळचे व्यक्ती. धंगेकरांनी गेल्यावेळी लढवलेल्या निवडणुकांमध्ये नवथरे मोठ्याप्रमाणावर सक्रिय होते. त्यांचं सगळं काम सांभाळायचे. त्यामुळे आता धंगेकरांना भाजपच्या उमेदवाराकडून नाही तर थेट त्यांच्याच जवळच्या व्यक्तीच्या आणि अजित पवार गटाच्या गणेश नवथरे यांच्यापासून काही प्रमाणात धोका असल्याचं बोललं जात आहे. दोघांचेही कार्यकर्ते आणि बाकी यंत्रणा या उमेदवारीमुळे वाटल्या गेल्या आहेत. त्याचा फटका प्रणवच्या मतांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आणखी वाचा