Vinayak Raut on Pune Graduate Constituency Election : पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीवरुन (Pune Graduate Constituency Election ) महाविकास आघाडीत (Mahavikas aghadi) वाद असल्याचे समोर आले आहे. ठाकरेंचे फोटो वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला दिला आहे. पुणे पदवीधर निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे फोटो वापरण्यावरुन वाद निर्माण झाला आहे.
ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्हाचा वापर करणे तातडीने थांबवा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार साहित्यावर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो वापरण्यावर शिवसेना ठाकरे गटाचा आक्षेप आहे. ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्हाचा वापर करणे तातडीने थांबवा; अन्यथा कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा विनायक राऊतांनी दिला. पुणे पदवीधरसाठी महाविकास आघाडीत बिघडी झालेली पाहायला मिळत आहे. ठाकरेंकडून सुनील मोदी तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून हर्षदा देशमुख जाधव या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad) 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली आहे. 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार असून 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी (Counting of Votes) होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) या निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक (Election Schedule) प्रसिद्ध केले आहे. दरम्यान, सध्या पुणे पदवीधर निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु आहे. कारण यामध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र पाहायलामिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून हर्षदा देशमुख जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर ठाकरेंच्या सिवसेनेकडून सुनील मोदी यांना उमेदवारी दिली आहे.
Election Schedule: निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख (Nomination Last Date): 6 ऑक्टोबर 2026
अर्जांची छाननी (Scrutiny): 7 ऑक्टोबर 2026
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख (Withdrawal Last Date): 9 ऑक्टोबर 2026
मतदानाची तारीख व वेळ (Poll Date & Time): 23 ऑक्टोबर 2026 (सकाळी 8 ते दुपारी 4)
मतमोजणी व निकाल (Counting Date): 27 ऑक्टोबर 2026
रिक्त झालेल्या जागा
1. औरंगाबाद पदवीधर: सतीश भानुदास चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवारांची राष्ट्रवादी / मविआ)
2. पुणे पदवीधर: अरुण गणपती लाड (राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवारांची राष्ट्रवादी / मविआ)
3. नागपूर पदवीधर: अभिजीत गोविंदराव वंजारी (काँग्रेस)
4. अमरावती शिक्षक: किरण रामराव सरनाईक (शिवसेना - शिंदे गट)
5 पुणे शिक्षक: जयंत दिनकर आसगावकर (काँग्रेस)
