Pune Election 2026: अजित पवार आणि भाजप यांच्यातील तीव्र संघर्षामुळे कमालीच्या रंगतदार झालेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या (PMC Election 2026) मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मतदानापूर्वी मतदारांना पैसे वाटण्याचे प्रकार सर्रास घडतात. हे प्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस डोळ्यात तेल घालून लक्ष देत आहेत. मात्र, एवढा चोख बंदोबस्त असतानाही पुण्यात मतदारांना चांदीच्या वाट्या वाटण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी हा आरोप केला आहे. वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 40 ड मधून निवडणुकीच्या रिंगणात आहे. (Pune Mahangarpalika Election 2026)

Continues below advertisement

पुण्यातील कात्रज परिसरातील प्रभाग क्रमांक 40 मध्ये मतदारांना चांदीच्या वाट्या वाटल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार वसंत मोरे आणि त्यांच्या मुलाने केला आहे. बुधवारी संध्याकाळी एका गाडीतून मोठ्या प्रमाणात चांदीच्या वाट्या प्रभागात नेल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित गाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश कदम यांच्या प्रचाराच्या पत्रिका तसेच मतदारांची यादी आढळून आल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे. त्यामुळे सदर गाडी ही प्रचारासाठीच प्रभागात आली होती, असा त्यांचा दावा आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत वसंत मोरे यांनी पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. (Pune News)

Pimpri Chinchwad Election 2026: पिंपरी-चिंचवडमध्ये भरारी पथकाने वॉशिंग मशीनने भरलेला ट्रक पकडला

Continues below advertisement

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणराज कॉलनी येथे भरारी पथकाने वॉशिंग मशीनचा ट्रक पकडला होता.  ड क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आलेल्या कारवाईत भरारी पथकाने रहाटणी येथील गणराज कॉलनी येथे 19 वॉशिंग मशीन जप्त केल्या होत्या. 12 जानेवारी रोजी रात्री 10.23 वाजता आचारसंहिता कक्षाला रहाटणी येथील गणराज कॉलनी येथे मतदारांना वॉशिंग मशीन वाटप केले जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर तातडीने राहुल निकम यांच्या नेतृत्वाखालील एफ.एस.टी. भरारी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तेथे एका गाडीमध्ये (क्र. एमएच 14 केए 6330) जवळपास 19 वॉशिंग मशीन असल्याचे आढळून आले होते. (Pimpri Chinchwad Mahangarpalika Election 2026)

आणखी वाचा

Pune Mahangarpalika Election 2026: हेलिकॉप्टर राईड, थायलंड टूर अन् एक गुंठा जमीन; पुण्यात उमेदवारांकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स