Pune Mahanagarapalika Election 2026 candidate Suicide: पुणे महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार ऐन भरात असताना एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) हडपसरमधील  उमेदवार फारुख शेख (Farooq Shaikh) यांच्या त्रासाला आणि टॉर्चरला कंटाळून सादिक उर्फ बाबू कपूर (Sadik aka Babu Kapur) यांनी (Suicide news) केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपासाला सुरुवात झाली आहे. मात्र, पुणे महानगरपालिका निवडणुकीचा (PMC Election 2026) प्रचार सुरु असताना घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सादिक उर्फ बाबू शेख यांनी वैयक्तिक वादातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मात्र, यावरुन पुण्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.  (Pune crime news)

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सादिक उर्फ बाबू कपूर (वय 56) याने त्याच्या कार्यालयात आत्महत्या केली. सादिकने मरण्यापूर्वी आपल्या हाताच्या पंजावर काहीतरी मजकूर लिहला होता. तसेच त्याने एकूण 30 पानांची सुसाईड नोट लिहली असून त्यामध्ये आपण आत्महत्या का केली, याचे सविस्तर कारण नमूद केले आहे. या सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 41 मधील उमेदवार फारुख शेख यांच्या नावाचाही उल्लेख आहे. पुण्यातील सय्यद नगर भागात पाच गुंठे जमीन होती. यावरुन फारुख शेख आणि सादिक उर्फ बाबू कपूर यांच्यात वाद सुरु होता. त्याच वादातून फारुख शेख यांच्याकडून सादिक यांना त्रास दिला जात होता. त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. मात्र, मरण्यापूर्वी सादिक यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये अनेक व्यक्तींची नावं आहेत.  त्यामुळे आता याप्रकरणात पुणे पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दरम्यान, आत्महत्या केलेला सादिक उर्फ बाबू कपूर याची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्याच्यावर मकोका कायद्यातंर्गत कारवाई झाली होती. त्यामुळे आता याप्रकरणाच्या तपासातून काय समोर येणार, हे पाहावे लागेल. परंतु, पुणे महानगरपालिका निवडणुकीत हे प्रकरण गाजण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा

खोपोलीतील मंगेश काळोखेंची 'कॉन्ट्रॅक्ट किलर'नेच केली हत्या; फरार आरोपीला पुण्यातुन अटक; गुन्ह्याची कबुली देत सुपारीचा आकडाही सांगितला

डोळ्यात चटणी टाकून धारदार शस्त्राने सपासप वार, अमित ठाकरेंचा राईट हँड बाळासाहेब सरवदेंना सोलापूरमध्ये संपवलं, भाजपवर गंभीर आरोप