पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (शनिवार, १ ऑगस्ट रोजी) पुणे दौऱ्यावरती आहेत. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ते सारसबाग येथील अण्णा भाऊ साठे स्मारकाला (Pune Congress News) अभिवादन करणार आहेत. त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठात लोकमान्य टिळक पुरस्काराचे वितरण ते करणार आहे. शाह यांच्या भेटीत (Pune Congress News) विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन केले जाणार आहे. त्याला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा भाजपने दिला आहे. यामुळे दोन्ही पक्ष आमने-सामने येण्याची शक्यता आहे. काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दीप्ती चौधरी आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली (Pune Congress News) आंदोलन करण्यात येणार आहे. तर गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांना (Pune Congress News) पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले आहे. अक्षय जैन, गौरव बाळंदे, सद्दाम शेख, राजू ठोंबरे अशी त्यांची नावं असून त्यांना डेक्कन पोलीस स्टेशनला आणले आहे.(Pune Congress News)

Continues below advertisement

पोलिसांनी पोलिस स्टेशनला आणल्यानंतर काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांनी व्हिडीओ शेअर केल आहे, या व्हिडीओमध्ये कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे की,  "नमस्कार, रात्रीचे ११:४५ झालेत. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी रात्री १२ वाजता घरातून डिटेन केलं आहे. त्याचं कारण काय? तर उद्या अमित शाह, देशाचे गृहमंत्री पुण्यात येत आहेत आणि त्यासंदर्भात आम्हाला रीतसर पुणे पोलिसांनी परवानगी देऊन सुद्धा सकाळी साडेदहा वाजता प्रत्यक्ष आमचं आंदोलन होणार होतं. परंतु युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी कसलीही नोटीस न देता ताब्यात घेतलेलं आहे. आता याच्यात पोलिसांची काहीच चूक नाही. परंतु सरकारचा दबाव इतका आहे की पोलिसांवर सुद्धा त्यांच्यावर दबाव आहे. त्यांनी रात्री १२ वाजता स्वतःही त्यांना झोपू देत नाही आणि आम्हालाही झोपू देत नाही आणि घरातून उचलून इथं आणलेलं आहे. आम्ही सरकारचा निषेध करतो... धिक्कार करतो...आणि आता उद्यापर्यंत आम्हा सर्वांना डिटेन करतील, काय करतील... कारण आमचं आंदोलन उद्या सकाळी...हे सगळे... एकेकाच्या घरातून आम्हाला डिटेन करण्यात आलेलं आहे. धन्यवाद."(Pune Congress News)

Pune Congress News:  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मध्यरात्री शहरात दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं काल (शुक्रवारी, ता ३१) मध्यरात्री विशेष विमानाने शहरात आगमन झाले. यावेळी विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (लोकमान्य टिळक स्वराज्य संघ) वतीने देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना आज (शनिवारी दि. १) लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार शाह यांच्या हस्ते मुकुंद नगर येथील कटारिया हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.

Continues below advertisement

शाह यांच्या भेटीत विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन केले जाणार आहे. त्याला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा भाजपने दिला आहे. यामुळे दोन्ही पक्ष आमने-सामने येण्याची शक्यता आहे. काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दीप्ती चौधरी आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे.