Uddhav Thackeray-Priyanka Chaturvedi Meeting: माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईत खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यसभेवरुन प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) चांगल्याचं भडकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांच्या बैठकीत नेमकं काय घडलं, याची माहितीही समोर आली आहे. (Shivsena UBT)
खासदारांच्या बैठकीची सुरुवात उद्धव ठाकरेंनी केली. माझा तुमच्यावर विश्वास आहे. मला भाजप, राष्ट्रवादीचे लोक सांगतात. तुमचे खासदार फुटणार आहेत. पण माझा तुमच्यावर विश्वास आहे. ही सर्व लढाई मी तुमच्या भरवश्यावर लढत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यसभेच्या जागेसाठी (Rajyasabha Election 2026) मल्लीकार्जून खर्गे, के. सी वेणुगोपाल आणि रमेश चन्नीथला यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. यावेळी काँग्रेसच्या म्हणण्यानूसार विरोधी पक्षाच्यापदाच्या संख्येसाठी ही जागा काँग्रेसला द्या, अशी मागणी करण्यात आली. यावर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसशी बोला, आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय होणार? असं सांगत आपण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य वाद कसा टाळला यांची माहिती उद्धव ठाकरे देत असताना अचानक प्रियंका चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरेंना सवाल केला.
उद्धव ठाकरे बैठकीत बोलत असताना प्रियंका चतुर्वेदी भडकल्या, काय म्हणाल्या? (Uddhav Thackeray-Priyanka Chaturvedi)
उद्धव ठाकरे बैठकीत बोलत असताना राज्यसभेवरून प्रियंका चतुर्वेदी भडकल्या. प्रियंका चतुर्वेदी यांनी I want to protest. Why Sanjay Raut was giving a statement about Sharad Pawar?, संजय राऊत यांनी शरद पवार यांचं नाव का घेतलं?, असा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी केला. यावर ते (संजय राऊत) बोलले म्हणून काय झालं? पक्षप्रमुख मी आहे. ते बोलले म्हणून काय झालं शेवटी निर्णय मीच घेईल, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची बाजू घेतली, अशी सूत्रांनी माहिती दिली.
प्रियंका चतुर्वेदी यांना 6 वर्षे संधी देऊन देखील काय उपयोग झाला? (Uddhav Thackeray-Priyanka Chaturvedi)
विशेष बाब म्हणजे बैठक संपल्यानंतर एका खासदाऱ्याने प्रियंका चतुर्वेदी यांना 6 वर्षे संधी देऊन देखील काय उपयोग झाला?, असा सवाल देखील मराठवाड्यातील एका खासदाराने उद्धव ठाकरे यांना केला. विशेष बाब म्हणजे आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या काही मर्यादा आहेत, पण आदित्य ठाकरेंनी फिरलं पाहिजे, अशी तक्रार खासदारांनी केली होती. त्यानंतर बैठकीत उपस्थित असलेल्या आदित्य ठाकरे यांनी खासदारांशी कुठलाही संवाद साधला नाही. ते जरा नाराज होते, असं देखील खासदारांचं म्हणणं आहे.
