एक्स्प्लोर

Prithviraj Chavan : गोकुळमध्ये कायदा बदलणं हे हुकुमशाहीचं लक्षण, लोकांना जेनझीप्रमाणं रस्त्यावर उतरावं लागेल अन्यथा सरकार आंदोलनं दडपून टाकेल : पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan : गोकुळचा प्रश्न असेल, ऊस दराचं आंदोलन असेल लोकांना जेनझीप्रमाणं रस्त्यावर येत तीव्र आंदोलन करावं लागेल, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.

कोल्हापूर/ सातारा : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गोकुळमध्ये संचालक वाढीचा निर्णय, ऊस दर आंदोलन यासंदर्भात भाष्य केलं आहे.  गोकुळमध्ये कायदा बदलणं हे हुकुमशाहीचं लक्षण असल्याचा हल्लाबोल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. 

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
पृथ्वीराज चव्हाण यांनी गोकुळबाबतचा निर्णय सरळसरळ हुकुमशाहीचा,दादागिरीचा असल्याचं म्हटलं. निवडून आलेल्या लोकांचे अधिकार काढून घेऊन आपल्या विचारांची माणसं तिथं बसवणं, आर्थिकदृष्ट्या उत्कृष्ठपणे चाललेल्या संस्थेवर आपण जबरदस्ती कब्जा करणं हे सगळं चाललेलं आहे.लोक याला सहन करतील का नाही हे माहिती नाही. कोर्ट कचेरी होईल, पण शेवटी सरकार आहे, असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलं. 

ही हुकुमशाहीची लक्षणं...

सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काय झालं ते आपण पाहिलं. भाजपच्या लोकांनी युती सरकारच्या मंत्र्यांना मारहाण केली गेली. येनकेन प्रकारे सत्ता हातात ठेवणं, ज्ञानेश कुमारला वापरुन निवडणूक याद्यात 13 कोटी लोकांना वगळणं असेल,ईव्हीएम मशीन असेल, गोकुळमध्ये कायदा बदलण्याची प्रक्रिया असेल ही सगळी हुकुमशाहीची लक्षणं आहेत, असा प्रहार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.  

जेनझीनं ज्या प्रकारे विरोध केला, सरकारला नमवलं, शिक्षणमंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. त्याप्रकारे लोकांनी शेवटी रस्त्यावर उतरुन विरोध नाही केला तोपर्यंत गोकुळ सारख्या सहकारी संस्था काय, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन काय सरकार त्याला दडपून टाकेल. त्यामुळं लोकांना इथं रस्त्यावर उतरावं लागेल, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.  

काल आम्ही जो सत्याग्रह केला, मी त्यामध्ये सहभागी झालो. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्यामुळं त्यांना यश मिळालं. लोकांमध्ये प्रचंड मोठी चीड आहे. दुष्काळी स्थिती आहे, 2018 पासून उसाची एमएसपी वाढवलेली नाही.महागाई वाढत चालली आहे. उत्पादन खर्च फार वाढलेला आहे. परंतु शेतकऱ्यांना उचित मोबदला मिळत नाही त्याविरोधात आंदोलन सुरु होतं. गोकुळ असेल अथवा इतर आंदोलन असेल, लोकांनी आपल्या हक्कांसाठी तीव्र आंदोलन नाही केलं तर सरकार काही कोणाला दाद देणार नाही. हुकुमशाही आणखी कडक होत जाईल आणि आपल्या गळ्याभोवतीचा फास आवळत जाईल, अशी भीती पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Patil on Sunil Tatkare: सुनील तटकरे यांनी केलेलं वक्तव्य आम्हाला संभ्रमात पाडण्यासारखं, विलीनीकरण संदर्भात पक्षात कुठलीही चर्चा नाही; आमदार अनिल पाटील स्पष्टच बोलले
सुनील तटकरे यांनी केलेलं वक्तव्य आम्हाला संभ्रमात पाडण्यासारखं, विलीनीकरण संदर्भात आमदार अनिल पाटील स्पष्टच बोलले, म्हणाले...
तटकरे खोटा आणि कपटी माणूस! त्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थखातं हवं होतं, पण सुनेत्रा पवारांच्या खेळीनं त्यांचा डाव उलटला, महेंद्र थोरवेंचा मोठा गौप्यस्फोट 
तटकरे खोटा आणि कपटी माणूस! त्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थखातं हवं होतं, पण सुनेत्रा पवारांच्या खेळीनं त्यांचा डाव उलटला, महेंद्र थोरवेंचा मोठा गौप्यस्फोट 
Latur :  बँकेतील आमचा कारभार रामायणासारखा स्पष्ट, निलंगेकरांच्या आरोपांना धीरज देशमुखांचे प्रत्युत्तर
Latur :  बँकेतील आमचा कारभार रामायणासारखा स्पष्ट, निलंगेकरांच्या आरोपांना धीरज देशमुखांचे प्रत्युत्तर
Chandrashekhar Bawankule: सयाजी शिंदे यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेऊ, झाडे लावायला हवी तितकी जमीन देऊ, पण प्रकल्प परत जाणे योग्य नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
हायड्रो प्रकल्प वरदान, सयाजी शिंदे यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेऊ, झाडे लावायला हवी तितकी जमीन देऊ, पण प्रकल्प परत जाणे योग्य नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: गुरुजी, लग्न जुळवायचंय, ज्योतिषी मंदार रानडेंना बोलवलं, डोळ्यांत मिरची पूड फेकली, विळ्याने गळा कापला, ऊसाच्या शेतात संपवलं अन्...; कारणही आलं समोर
गुरुजी, लग्न जुळवायचंय, ज्योतिषी मंदार रानडेंना बोलवलं, डोळ्यांत मिरची पूड फेकली, विळ्याने गळा कापला, ऊसाच्या शेतात संपवलं अन्...; कारणही आलं समोर
Vikhroli Railway Station Accident: विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
बँकेत 30 लाख ठेवीदारांचे पैसे अडकले, पॅराग्वेत थेट सत्तापालट,राष्ट्रपतींवर महाभियोग चालवत नजरकैदेत ठेवलं
बँकेत 30 लाख ठेवीदारांचे पैसे अडकले, पॅराग्वेत थेट सत्तापालट,राष्ट्रपतींवर महाभियोग चालवला
Maharashtra Board Exam 2027 Dates Announced: मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
Crime News: पत्नीसह सात जणांना संपवलं; प्लॅन रचला, फोन बंद केला अन् बायको सहलीला गेल्याचं सांगितलं, जावयाने संपूर्ण परिवाला संपवलं, भयानक कांड कसं आलं समोर?
पत्नीसह सात जणांना संपवलं; प्लॅन रचला, फोन बंद केला अन् बायको सहलीला गेल्याचं सांगितलं, जावयाने संपूर्ण परिवाला संपवलं, भयानक कांड कसं आलं समोर?
Pune Crime News: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले पुरुषाचे पिशवीत तोडून टाकलेले दोन पाय, सीम कार्डचा कव्हर अन् पोलिस पोहोचले ठेककेदारापर्यंत, शेवटी गूढ उकलले!
कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले पुरुषाचे पिशवीत तोडून टाकलेले दोन पाय, सीम कार्डचा कव्हर अन् पोलिस पोहोचले ठेककेदारापर्यंत, शेवटी गूढ उकलले!
Chhatrapati Sambhajinagar Crime News : मोठी बातमी : पाणी मागितल्यावर तोंडात लघवी, चौकात नेऊन जीवघेणी मारहाण, वैजापुरात भयंकर हsss कांड
मोठी बातमी : पाणी मागितल्यावर तोंडात लघवी, चौकात नेऊन जीवघेणी मारहाण, वैजापुरात भयंकर हsss कांड
Embed widget