Prithviraj Chavan : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर (Devendra Fadnavis At Davos) टीका करणे योग्य नाही. जर खरोखर 30 लाख कोटींचे एमओयू (MoU) झाले असतील, तर आंनदाची बाब आहे. राज्याच्या प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक (Investment) येणे आवश्यक आहे. पण मोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही. कारण सत्य शेवटी बाहेर येतेच. असं म्हणत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मुख्यमंत्र्यांच्या दावोस(Davos) दोऱ्यावरभाष्यकेलं आहे. सोबतच दावोसमध्ये अदानी (Adani Group) आणि लोढा (Lodha) यांच्या सारख्या स्थानिक कंपन्याबरोबर दावोसमध्ये करार करणे हा एक क्रूर विनोद आहे. अशीबोचरीटीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनीकेलीआहे. (Devendra Fadnavis At Davos)
Prithviraj Chavan : स्थानिक कंपन्याबरोबर दावोसमध्ये करार करणे हा एक क्रूर विनोद
दरम्यान, मागील दावोस दौऱ्यातील MoU पैकी महाराष्ट्रात किती उद्योग सुरू झाले? किती गुंतवणूक झाली? प्रत्यक्षात किती रोजगार निर्माण झाले? मोठे आकडे नव्हे, तर प्रत्यक्ष गुंतवणूक व त्यातून होणारी रोजगारनिर्मिती महत्त्वाची आहे. आपल्याच राज्यातील कंपन्यावरोबर दाव्होस मध्ये MoU करण्याबद्दल कर्नाटक सरकारच्या उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांचे निरीक्षण महत्वाचे आहे. ते म्हणतात कि आम्ही दावोससारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर कर्नाटक किंवा भारतीय कंपन्यांशी MoU करत नाही, तर फक्त परकीय गुंतवणुकदारांशी करार करतो. म्हणूनच कर्नाटकात परकीय उद्योग येतात आणि कर्नाटकाचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. अडाणी आणी लोढा यांच्या सारख्या स्थानिक कंपन्याबरोबर दावोसमध्ये करार करणे हा एक क्रूर विनोद आहे. अशीबोचरीटीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनीकेलीआहे.
Prithviraj Chavan on Devendra Fadnavis : महाराष्ट्रात किती मोठे परकीय उद्योग सुरू झाले? मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढतील का?
महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांना इव्हेंट नकोत, तर पारदर्शकता, उत्तरदायित्व व प्रत्यक्ष रोजगार हवे आहेत. आत्तापर्यंतच्या दावोसमध्ये घोषणा केलेल्या MoU वर आणि त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात किती मोठे परकीय उद्योग सुरू झाले? यावर मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढतील का? असासवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाआहे.
ही बातमी वाचा:
