Devendra Fadnavis and Pratap Sarnaik: अलीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात पैशांचा प्रचंड वापर होत असल्याचा आरोप सर्रास केला जातो. या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या  दहिसर ते काशीगाव मेट्रो (Dahisar Kashigaon Metro) प्रकल्पाचे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले. यावेळी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, भाजप आमदार नरेंद्र मेहता (MLA Narendra Mehta) या सर्व नेत्यांनी या मेट्रो ट्रेनमधून (Metro Train) प्रवास केला. त्यांच्यासोबत प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि कॅमेरे होते. यावेळी घडलेला एक प्रसंग सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना बोलताना प्रसारमाध्यमांचे कॅमेरे आपल्या आजुबाजूला आहेत याचे भान राहिले नाही. त्यांनी गप्पांच्या ओघात मजेत बोलताना भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या मिरा-भाईंदरमधील जमिनींचा उल्लेख केला. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आपल्या आजुबाजूला कॅमेरे आहेत, असे सांगत त्यांना सावध केले. (Maharashtra Politics news)

Continues below advertisement

दहिसर ते काशीगाव या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनावेळी राजकीय वातावरणात हलकाफुलका रंग भरला गेला. मेट्रो प्रवासादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्यात रंगलेला मिश्किल संवाद चर्चेचा विषय ठरला.

दहिसरहून काशीगावकडे मेट्रोने प्रवास करत असताना प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी बोलताना हसतच एका विषयाला हात घातला. “मिरा-भाईंदरमध्ये 30 टक्के जागा नरेंद्र मेहता यांची आहे. त्यापैकी 10 टक्के जागा ते मला द्यायला तयार आहेत", असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले. यावर उपस्थित सर्व नेत्यांमध्ये एकच हशा पिकला. प्रताप सरनाईक बोलत असताना मागून नरेंद्र मेहता त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, थट्टामस्करीच्या मूडमध्ये असलेले प्रताप सरनाईक हे बोलतच राहिले. 

Continues below advertisement

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थट्टामस्करी सुरु असतानाच प्रताप सरनाईक यांना सावधपणे बोलण्याचा सल्ला दिला. , “आपण चकाला चकाला करु, आणि  येथे हे सगळं आपलं रेकॉर्ड करतील,” असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी वातावरण आणखी रंगतदार केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये पुन्हा एकदा हशा पिकला.

दरम्यान, दहिसर–काशीगाव मेट्रो मार्गाच आज  उद्घाटन झाले. तसेच काशीगाव मेट्रो स्थानकाचं आमदार नरेंद्र मेहता यांची जागा आल्याने जिन्याचे काम रखडले आहे. मेहता यांची कंपनी अधिक मोबदला मागत असल्याचे म्हटले जात आहे. हाच धागा पकडत प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच हा मिश्किलपणे टोमणा मारत नरेंद्र मेहता यांचा गेम केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आणखी वाचा

Maharashtra Cabinet Meeting Decision: मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 धडाकेबाज निर्णय, महावितरणची आर्थिक पुनर्रचना होणार; AI, डीजिटल गव्हर्नन्सच्या प्रक्रियेला वेग येणार