Pratap Sarnaik On Marathi Compulsory Auto Taxi: मी प्रताप सरनाईक या निर्णयापासून मागे फिरणार नाही. अनेक संघटनांच्या उपस्थितीत सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्रात टॅक्सी, रिक्षा चालवायची असेल तर मराठी बोलणं आवश्यक आहे. अनेक संघटनांनी मुदत मागितली आहे. मात्र अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही, असं प्रताप सरनाईक म्हणाले. रिक्षा आणि टॅक्सी (Taxi-Auto) चालकांसाठी व्यावहारिक मराठी अनिवार्य (Marathi Language) करण्याचा निर्णय लागू करण्यापूर्वी राज्य सरकारने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत कामगार नेते शशांक राव व संजय निरुपम यांच्यासह विविध रिक्षा व टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद विविध माहिती दिली. (Marathi Language Compulsory Taxi-Auto )
अनेक संघटनांच्या उपस्थितीत सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्रात टॅक्सी, रिक्षा चालवायची असेल तर मराठी बोलणं आवश्यक आहे. हे सगळ्यानी मान्य केलं. सगळ्या संघटनांच्या लोकांनी सांगितलं की, आम्ही जमेल तशा मराठी शिकवण्या घेऊ...त्यासाठी सगळ्यांनी मुदत मागितली. 3 महिने, 6 महिने, तर काही जणांनी वर्षभराची मुदत मागितली. यावेळी मुदतवाढी संदर्भात मी त्यांना कुठलाही शब्द दिलेला नाही. उद्या आरटीओची सकाळी 10.30 वाजता बैठक बोलवली आहे. त्यांच्यासोबत चर्चा करू...मुदत हवी असेल तर मुदत देण्याचा आम्ही विचार करू...मात्र त्यांची मुजोरी चालणार नाही. मुदतवाढ देण्याची आमची तयारी आहे. मात्र अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही, असं प्रताप सरनाईक म्हणाले. (Marathi Language Taxi-Auto Mumbai)
मुदत देऊ, पण मुजोरी चालणार नाही- प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik On Taxi-Auto Marathi Language)
कुणाच्या रोजी-रोटीवर पाय येता कामा नये. सरकारला कोणाच्याही पोटावर पाय आणायचा नाही. परंतु आम्ही महाराष्ट्रात व्यवसाय करू, मात्र हिंदीतच बोलू, अशी त्यांची भूमिका असेल तर हे चालणार नाही, असं प्रताप सरनाईक म्हणाले. साहित्य परिषदेनेही त्यांच्या ऑफिसेसमध्ये मराठीचे वर्ग घेण्याची तयारी दाखवली. त्यांचे आभार आहेत, असंही प्रताप सरनाईकांनी सांगितले. विविध संघटनांनी मुदतवाढ मागितली आहे. त्यावर चर्चा करून मुदत द्यायची की नाही ते ठरवू, मुदत देऊ, पण मुजोरी चालणार नाही, असं प्रताप सरनाईकांनी सांगितले.
नेमकं प्रकरण काय? (Marathi Language Taxi-Auto Mumbai)
आगामी 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य (Marathi Language) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता व वाचता येते का, याची पडताळणी केली जाणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला होता. त्यानंतर मुंबईतील अनेक चालक-मालक संघटनांनी आक्षेप घेत 4 मे रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला होता.
