एक्स्प्लोर

Pratap Sarnaik On Manikrao Kokate: कृषीमंत्री कोकाटे विधिमंडळात रमी खेळताना दिसले; प्रताप सरनाईक म्हणाले, आमिर-शाहरुख खानही खेळतात!

Pratap Sarnaik On Manikrao Kokate: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी समर्थन केलं आहे.

Pratap Sarnaik On Manikrao Kokate: महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी खेळताना दिसून येत आहे. माणिकराव कोकाटेंच्या या व्हिडीओनंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर मंत्री आणि शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी माणिकराव कोकाटेंचं एकप्रकारे समर्थनचं केलं आहे. 

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी समर्थन केलं आहे. अभिनेता आमिर खान, सलमान खान सध्या सगळेच रमी खेळतात. टीव्हीवर दाखवलं जातं, असं प्रताप सरनाईक म्हणाले. विधिमंडळात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळत असल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केला होता. यावर प्रतिक्रिया देताना प्रताप सरनाईक यांनी माणिकराव कोकाटे यांचा समर्थन केल्याची चर्चा आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज ही आर्त हाक ऐकू येईल का?, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. 

अमित शाह यांनी चार मंत्र्यांना डच्चू देण्याचं सुचवलं- संजय राऊत

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, माझ्या माहितीप्रमाणे अमित शाह यांनी चार मंत्र्यांना डच्चू देण्याचं सुचवलं आहे. त्यात त्यांचे देखील नाव आहे. अमित शाह यांनी चार ते पाच मंत्र्यांना वगळण्याच्या संदर्भातल्या सूचना मुख्यमंत्र्यांना केलेल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनाही त्यांच्या मंत्र्यांसंदर्भात केलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची जी काही नावं आहेत, त्यात संबंधित कृषीमंत्र्यांचे नाव असल्याची माझी पक्की माहिती आहे, असा दावा त्यांनी केला आहे. 

माणिकराव कोकाटे रमी खेळताना दिसले, VIDEO:

संबंधित बातमी:

Sanjay Raut : अमित शाहांनी महाराष्ट्रातील चार मंत्र्यांना डच्चू देण्याचं ठरवलंय, त्यात माणिकराव कोकाटेंचंही नाव; संजय राऊतांचा मोठा दावा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

व्हिडीओ

Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
Kolhapur : बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
Maharashtra Goverment Cabinet Decision: राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
Embed widget