Prasad Lad Meet Manoj Jarange: भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची अंतरवलीमध्ये जाऊन भेट घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी भाजप नेते प्रसाद लाड यांना मराठा आरक्षणबाबत चर्चा करण्यासाठी आंतरवलीमध्ये येण्याचं आवाहन केलं होतं. मनोज जरांगेंची ही विनंती मान्य करत प्रसाद लाड हे आज मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. मात्र या भेटीआधी धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पुन्हा एकदा रणशिंग फुंकले आहे. 30 मे पासून मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. मात्र मनोज जरांगेंनी उपोषणाला बसू नये, असं आवाहन भाजपचे नेते प्रसाद लाड यांच्याकडून करण्यात आले होते. यानंतर मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांना अंतरवालीमध्ये येण्याचं आवाहन केलं होतं.
मनोज जरांगेंच्या भेट घेण्याआधी काय घडलं? (Prasad Lad Meet Manoj Jarange)
मनोज जरांगे यांची भेट घेण्याआधी प्रसाद लाड छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये थांबले होते. यावेळी प्रसाद लाड थांबलेल्या हॉटेलमध्ये दोघांनी शिरण्याच्या प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे याआधी प्रसाद लाड यांना धमकीचा फोनही आला होता. प्रसाद लाड यांच्या पीएला धमकीचा फोन आला होता. योगेश शितोळे पाटील, गणेश उगले यांनी प्रसाद लाड यांना धमकी दिली होती. यानंतर प्रसाद लाड यांना धमकी देणाऱ्या या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नेमकं काय घडलं?, प्रसाद लाड यांनी सगळं सांगितलं- (Prasad Lad Meet Manoj Jarange)
दोन जण ताब्यात आहे. एक जण फरार आहे. दोघेही हॉटेलच्या आसपास आले होते. पोलिसांनी हटकलं, त्यावेळेस त्यांनी निवेदन द्यायला आल्याचे सांगितलं. मात्र ते दोघं हल्ल्याच्या प्रयत्नात होते. त्यांना पोलिसांनी हॉटेलच्या परिसरातून ताब्यात घेण्यात आलं आहे, अशी माहिती प्रसाद लाड यांनी दिली.
प्रसाद लाड आणि मनोज जरांगेंच्या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष- (Manoj Jarange And Prasad Lad)
मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांच्या शब्दावर विश्वास ठेवून गावागावातील बैठका थांबवल्या आहेत. 23 मे च्या आत सरकारने किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी चर्चेला यावं, अन्यथा 30 मे पासून अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरूच राहील, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला होता. त्यामुळे आजच्या प्रसाद लाड आणि मनोज जरांगेंच्या भेटीदरम्यान काय चर्चा होते याकडे लक्ष लागलं आहे.
मनोज जरांगे काय म्हणाले? (Manoj Jarange On Prasad Lad)
प्रसाद लाड यांच्यात आम्हाला समाजाविषयी तळमळ दिसली, म्हणून आम्ही त्यांना सांगितल आहे की, आमच्या मागण्या मान्य करा आम्हाला आंदोलन करायची गरज नाही. प्रसाद लाड आम्ही शंभर टक्के तुमच्याकडे अपेक्षेने बघायला लागलो. अंतरवालीत मराठा समाज तुमची वाट बघत आहोत, असं मनोज जरांगे म्हणाले. प्रसाद लाड यांनी सांगितलं की, मी मराठा आहे, मला राजकारण करायचं नाही मला द्वेषपणे पुढे जायचं नाही. मुख्यमंत्री चर्चेतून मार्ग काढतील असं प्रसाद लाड यांनी सांगितले.
