Manoj Jarange Patil on Prasad Lad: राज्यातपुन्हाएकदामराठा आरक्षणाचामुद्दाचर्चेतआलाआहे. मराठासमाजाच्याप्रलंबितमागण्यासाठीमनोजजरांगेयांनीपुन्हाउपोषणाचाइशारादेतसरकारलानिर्वाणीचाइशारादिलाआहे. अशातचआज(22 मे) भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) हे अंतरवली येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मनोज जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी प्रसाद लाड यांना अंतरवलीत येण्याचं आवाहन केलं होतं. दरम्यान, 30 मेपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र या भेटीपूर्वी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये प्रसाद लाड थांबले असताना दोघांनी हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. याआधी प्रसाद लाड यांच्या पीएला धमकीचा फोनही आल्याचीमाहितीआहे. या प्रकरणी योगेश शितोळे पाटील आणि गणेश उगले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकंदरीतयाघडलेल्याप्रकारावरमनोजजरांगेआणि प्रसाद लाड यादोघांचीप्रतिक्रियाआलीअसून प्रसाद लाड आणि मनोज जरांगे यांच्या चर्चेतील 10 मोठे मुद्दे जाणूनघेऊया.

Continues below advertisement

Prasad Lad : प्रसाद लाड नेमकंकायम्हणाले?

1) 70 वर्षात कोणत्याच मराठा समाजाच्या नेत्याने केलं नाही ते फडणवीसांनी केलं1

Continues below advertisement

आमच्यात अनेकदा वाद झाले. ज्या पद्धतीने मराठा समाजाचा लढा 1981 पासून सुरू झालात्यालानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुढेनेत लढा दिला. त्यामुळे माझ्या समाजाला आरक्षण मिळाले. त्या बद्दल मी मनोज दादा यांचे धन्यवाद मानतो. पण मी त्यांना विनंती केली की देवेंद्र फडणवीस यांना देखील कधीतरी समजून घेतले पाहिजे. गेल्या 70 वर्षात कोणत्याच मराठा समाजाच्या नेत्याने केलं नाही ते फडणवीसांनी केलं.

2) मी भाऊ म्हणून विनंती करायला आलोय, जातीसाठी माती खायला मी तयार

मनोजजरांगेयांनामीउपोषणसंदर्भांतविनंतीकेलीकि, 30 मे चुकीची तारीख आहे. उन्हाचे दिवसास आहेत. तुमच्या मनात असलेला द्वेष दूर करायचा होता. आंदोलन करताना काही निर्णयांची ग्वाही दिली जाते. ते विषय सभागृहात नेतृत्व करत असताना माझ्या माध्यमातून कसा मार्ग निघेल ते पाहू. मी तुमचा लहान भाऊ म्हणून आलोय. मला दादांबरोबर खाजगीत देखील चर्चा करेल. मी भाऊ म्हणून विनंती करायला आलोय. मला काही काळ द्यावा लागेल. जातीसाठी माती खायला मी तयार आहे. आमच्या आपआपसात भांडणे लावायचे काम करत आहेत

3) मी राजकारणावर धंदा करत नाही, लक्ष्मण हाके यांना पोटशूळ होण्याचे काम नाही

मी जरांगे यांचे विषय सरकार दरबारी मांडणार आहे. मी वेळोवेळी भेटत राहील. मी सरपंचाच्या शेतात ड्रॅगन फ्रुट खायला येईल. एका मराठा समाजाचा मुलगा ज्याचे वडील कामगार होते. मी व्यावसायिक आहे, याचा मला अभिमान. मी राजकारणावर धंदा करत नाही, मात्रलक्ष्मण हाके यांना पोटशूळ होण्याचे काम नाही. त्यांचा गैरसमज देखील मी दूर करेल. दादांचे अनेक वेळा मुख्यमंत्र्यांशी संवाद झालेत. ते आता सुद्धा थेट फोनवर मुख्यमंत्र्यांशी बोलू शकतात.

4) मला धमकीचे अनेक फोन, आई वरून शिव्या दिल्या; सांगा कुठे येऊ मला मारा

मला धमकीचे अनेक फोन येतात. कालही काही लोकांनी मी राहत असलेल्या हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माझ्या आई वरून शिव्या दिल्या. माझ्या डोळ्यात पाणी आलं. शिव्या देणे सोपे असते. मात्र हृदयाला ठेच लागते. मला सांगा कुठे येऊ मला मारा. मला खात्री आहे माजी काम करण्याची शैली आहे. त्यातून विषय तडीस जाण्याचा प्रयत्न करेल. आम्ही दोघे भाऊ, तुम्ही चिंता करू नका, आमच्यात भांडणे लाऊ नका.

5. हा प्रसाद लाड तुमचा लहान भाऊ असून दूत म्हणून काम करेन

मी व्यक्तिगत समाजाचा कार्यकता म्हणून आलो. कोकणातील मराठा जरा कमी समजला जातो. शिवरायांचा रायगड कोकणात आहे. आम्ही शिवरायांना मानणारे आहोत. मला लहान भावाला संधी द्या, आंदोलन मागे घ्या. हा प्रसाद लाड तुमचा लहान भाऊ असून दूत म्हणून काम करेन

Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटील नेमकंकायम्हणाले?

1) तुमची आई ती आमची आई, पण आमच्या आईला मारले त्या वेळी आम्ही का बोलू नये?

राज्यातील 80 हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबली आहे. तुम्ही विखे साहेबांना फोन लाऊन सांगा. मागील काही दिवसात आम्ही काय सांगितले. हामंडळाचे परतावे नाहीत. मुख्यमंत्रीफडणवीस तुम्ही उगाच कागद आणले, तुमचा विषय मुख्यमंत्र्यांवर बोलतात म्हणून होता. तुमची आई आमची आई आहे. ज्या दिवशी आमच्या आईला मारले त्या वेळी आम्ही का बोलू नये तुमच्या आईला? गृहमंत्री फडणवीस आहेत. त्यांनी छातीवर पाय देऊन बंदुकीच्या दस्त्याने मारले आणि मुख्यमंत्री म्हणतात की माझ्या पोलिसांना मारले गेले. म्हणून ते माझ्याकडून बोलले गेले.

2) कोणालाही वाटत नव्हतं 75 वर्षात बलाढ्य काँग्रेस संपेल, तुम्ही त्या गर्वात जाऊ नका

आम्ही कोणाला दगड मारले? अगोदर कोणी कोणाला दगड मारले? मी काहीपण धिंगाणा केला असता. पत्र्यातून गोळ्या वर गेल्या होत्या. मी कोणाचा एक रुपया घेतला हे सांगा, मी उद्या फाशी घेतो. मी 24 तास समाजासाठी देतो. तुम्ही मालक आहेत, काय झाले बोलले म्हणून? कोणालाही वाटत नव्हतं 75 वर्षात बलाढ्य काँग्रेस संपेल. तुम्ही त्या गर्वात जाऊ नका. मुख्यमंत्री आपल्या जातीचा नाही, तरी त्यांनी आरक्षण दिले. हे कोणी नाकारले? या आठ महिन्यात फडणवीस साहेबांना बोलले दाखवा.

3) मंडळ आयोगाने कोणता सर्वे केला, आम्हाला दाखवा?

मुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीसहे आमच्या जातीचे नाहीत. तरी त्यांनी आरक्षण दिले. ते आमच्या जातीचे नसताना त्यांना मराठ्यांनी निवडून दिले. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाहीत, असे समजून आमच्या मागण्या मांडतो. असेहीमनोजजरांगेम्हणाले. 83 क्रमांकावर मराठा कुणबी एकच आहे. ज्याला लागतय ते घेतील. मी ज्यांना 96 कुळी रहायचंय ते राहतील. मंडळ आयोगाने कोणता सर्वे केला, हे आम्हाला दाखवा. मंड जनगणना केली नाही. मागास सिद्ध नसताना अहवाल बनवला आणि व्हिपी सिंग समोर ठेवला, मिळाले आरक्षण?

4) नारायणराणेयांना मी दादा मानतो, पण त्यांच्या पोट्ट्यांना सोडत नाही

गेल्या 4 वर्षात ओबीसींची छगन भुजबळ यांची संख्या 60 टक्के कशी झाली? मोठे राणेसाहेब त्यांना मी दादा मानतो. पण त्यांच्या पोट्ट्यांना मी सोडत नाही. त्यांनी 16 टक्के आरक्षण दिले. ओबीसींना 1994 ला कशाच्या आधारावर आरक्षण दिले? छत्रपती संभाजीनगर जालना मिळून 2 लाख 56 हजार कुणबी होते ते कुठे गेले? हैदराबाद GR काढला प्रमाणपत्र वाटायचे का बंद केले? मी सरकारवर प्रेम करत नाही या गैरसमजातून बाहेर या. ज्यांनी दिले नाही त्यांना म्हणूनच पाडले आहे.

5) फडणवीस साहेब, गोरगरिबांची मने जिंका तुमच्या 50 पिढ्या आल्या तरी मी मराठ्यांना धक्का लावू देणार नाही

मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दोष देत नाही. तुम्ही हैदराबादचा GR काढला पण तुम्ही प्रमाणपत्र का रोखले? फडणवीस तुम्हाला मंत्री मराठ्यांनीच केलंय. अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत, त्याला फडणवीस साहेबच जबाबदार आहेत. फडणवीस साहेबांनी विधानसभेत एक भाषण केलं होतं. मंत्र्यांना किंमत नाही, मुख्यमंत्रीय सर्वेसर्वा आहे. याचा अर्थ तुम्हीच प्रमाणपत्र रोखले आहे. फडणवीस साहेब, या गोरगरिबांची मने जिंका. तुमच्या 50 पिढ्या आल्या तरी मी मराठ्यांना धक्का लावू देणार नाही. फडणवीसांनी मराठवाड्यातील मराठ्यांना प्रमाणपत्रासाठी रोखू नये. आंदोलनाच्या तारखेच्या आता प्रमाणपत्र द्या, असं मनोज जरांगे म्हणाले.

Manoj Jarange Patil Demands: मनोज जरांगे यांच्या मागण्या काय?

1) मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मे च्या आता कुणबी प्रमाणपत्र द्या.

2) सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थांचा GR काढा. 1994 च्या धर्तीवरच GR काढा.

3) महाराष्ट्रातील सर्व सरसकट गुन्हे मागे घ्या. 

4) आंदोलनात बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा. 

5) सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा.

6) महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप केले पाहिजे. 

7) कुणबी प्रमाणपत्र दिलेले त्याची व्हॉलिडिटी द्या. 

8) मराठा उपसमिती काही कामाची नाही, अध्यक्षाला काम नाही. उपसमिती बरखास्त करा. 

9) स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा. 

10) शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला लावा.