एक्स्प्लोर

Prakash Mahajan On Raj Thackeray: मी राज ठाकरेंना घाबरत नाही; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी जाण्याआधी प्रकाश महाजनांचं विधान, वैभव खेडेकरही सोबत

Prakash Mahajan On Raj Thackeray: वैभव खेडेकर आणि मनसेचे माजी ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी बंगल्यावर पोहोचले.

Prakash Mahajan On Raj Thackeray: नागपुरात सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session Nagpur 2025) सुरु आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस असून नागपुरात एक मोठी घडामोड घडली. मनसेतून नुकतेच भाजपामध्ये प्रवेश केलेले वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) आणि मनसेचे माजी ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या रामगिरी बंगल्यावर पोहोचले. यावेळी माध्यमांशी बोलताना प्रकाश महाजन यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश करण्यावरुन सूचक वक्तव्य केलं. 

प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीबाबत विचारण्यात आले. यावर माझं वैयक्तिक काम आहे. मुख्यमंत्र्यांसोबत पारिवारिक संबंध आहे, असं प्रकाश महाजन म्हणाले. यावेळी प्रकाश महाजन यांनी वैभव खेडेकर यांचंही कौतुक केलं. भाजपामध्ये वैभव खेडेकर खूप आनंदी आहे. माझ्या पाल्याचा आनंद पाहायला आलो आहे. वैभव खेडेकर कमळाकडे गेला. त्यामुळे मी खूश आहे, असं प्रकाश महाजन म्हणाले. तसेच भाजपाचा पराभव झाल्यावर आम्हाला वाईट वाटतं, नातं जुनं आहे, असं सांगत मी कधीच भाजपाविरोधात काम केलेलं नाही. आता भाजपाने ठरवायचं आहे, असं सूचक विधानही प्रकाश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना केलं. त्यामुळे प्रकाश महाजन भाजपामध्ये प्रवेश करणार की काय?, अशा चर्चांना उधाण आले आहे. 

मी राज ठाकरेंना घाबरत नाही- प्रकाश महाजन (Prakash Mahajan On Raj Thackeray)

मनसे हिंदुत्वापासून दूर जाते आहे. त्यांनी हिंदूत्वाच्या प्रश्नावर माघार घेतली. मनसेतून बाहेर पडण्यामागे हेच कारण आहे, असंही प्रकाश महाजनांनी सांगितले. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे. आम्ही कधी ते लपवलं नाही. मी राज ठाकरेंना घाबरत नाही. संघ विचारांचा मी माणूस आहे, शाखेत देखील जातो, असं प्रकाश महाजन यांनी सांगितले. दरम्यान, पुण्यातील अभिनेता रमेश परदेशी (पिट्या भाई)ने आपल्या सोशल मीडियावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातला एक फोटो पोस्ट केलेला. यावरुन राज ठाकरेंनी पिट्या भाईचा पुण्यातील एका बैठकीत पाणउतारा केला होता. यावरुनही प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंवर टीका केली. 

प्रकाश महाजन काय काय म्हणाले?, VIDEO:

संबंधित बातमी:

Sharad Pawar-Ajit Pawar Meet Delhi: गौतम अदानी, अजित पवार, राहुल-प्रियांका गांधींपासून श्रीकांत शिंदे जया बच्चनपर्यंत...; शरद पवारांना दिल्लीत कोण कोण भेटले?, संपूर्ण यादी समोर

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

  अहिल्यानगर विधानपरिषदेच्या जागेचा तिढा अखेर सुटला, भाजपचे प्राजक्त तनपुरे बिनविरोध आमदार
  अहिल्यानगर विधानपरिषदेच्या जागेचा तिढा अखेर सुटला, भाजपचे प्राजक्त तनपुरे बिनविरोध आमदार
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Delimitation Bill : सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा संसदेत आणण्याच्या तयारीत, TMC आणि DMK सोबत चर्चा
सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा संसदेत आणण्याच्या तयारीत, TMC आणि DMK सोबत चर्चा
Anantrao Thopte Passes Away :  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं निधन, वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
Anantrao Thopte Passes Away :  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं निधन, वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

व्हिडीओ

MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...
Bal Mane Konkan Vidhan Parishad Election 2026: ठाकरेंनी विश्वास दाखवला, राणेंनी उमेदवार फोडला
WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
BJP : भाजपची राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर! सतीश पुनिया, तरुण चुग यांच्यासह 'या' बड्या नेत्यांना मिळाली संधी
भाजपची राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर! सतीश पुनिया, तरुण चुग यांच्यासह 'या' बड्या नेत्यांना मिळाली संधी
Embed widget