Prakash Abitkar on Eknath Shinde: "मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी 'नायक' चित्रपटातील अनिल कपूरप्रमाणे काम केले आहे. म्हणूनच महाराष्ट्रात सत्ता आली," अशा शब्दांत राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत गौरवौद्गार काढले. धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

Continues below advertisement

प्रकाश आबिटकर म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी जे काम केले ते काम म्हणजे नायक चित्रपटातील अनिल कपूर ने जसे काम केले तसेच त्यांनी काम केले. महाराष्ट्रात जी सत्ता आली त्यात एकनाथ शिंदे यांचे मोठे योगदान आहे. मुख्यमंत्री पदापेक्षा एकनाथ शिंदे हे नाव देशात फार मोठे आहे. त्यांची प्रचंड मेहनत आणि काम या जोरावर सगळी पदे त्यांच्याकडे चालत येतील, असे कौतुक त्यांनी यावेळी केले. तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद न मिळाल्याची सल शिवसेनेमध्ये कायम असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले. 

Prakash Abitkar: मंत्रिमंडळात फेरबदल होण्याच्या चर्चेला दुजोरा

उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याचे शिवसेनेच्या सूत्रांची माहिती आहे. जे काम करतील तेच पदावर राहतील, जे पदावर असून काम करत नाही त्यांना डच्चू देणार, असे स्पष्ट आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आता मंत्रिमंडळात फेरबदल होण्याच्या चर्चेला प्रकाश आबिटकर यांनी दुजोरा दिला आहे. "काम करेल त्याला संधी मिळणार, भाकरी फिरवली जाणार, यालाच एकनाथ शिंदे म्हणतात, असे त्यांनी म्हटले आहे. 

Continues below advertisement

Prakash Abitkar on Operation Tiger: शिवसेनेत बरेच लोक येणार 

तर शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरवरही भाष्य प्रकाश आबिटकर यांनी भाष्य केलंय. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार का? याबाबत विचारले असता शिवसेनेत एक नाही तर बरेच लोक येणार आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच मतदार यादी अचूक व्हाव्यात, यासाठी शिवसेनेकडून मोहीम हाती घेण्यात आली असून पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचा असावा हे लक्ष ठेवण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Eknath Shinde Shivsena: मोठी बातमी : ठाकरेंच्या 9 पैकी 8 खासदारांसोबत एकनाथ शिंदेंची गुप्त बैठक झाल्याची चर्चा, ठाण्यातील बैठकीच्या वृत्ताबाबत ठाकरेंचे खासदार म्हणतात...

Nashik Crime News: महिला पोलीस आयटी कर्मचाऱ्यांच्या वेशात गेल्या अन् वासनेचा बाजार उघड केला; नाशिकमधील नामांकित कंपनीतील काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड कसा झाला?