एक्स्प्लोर

Prajakt Tanpure: तत्त्वांशी एकनिष्ठ राहणाऱ्यांचं राजकारण संपतंय, प्राजक्त तनपुरेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया

Prajakt Tanpure NCP: पोटनिवडणुकीत माघार, भाजपमध्ये जाण्याची चर्चा. प्राजक्त तनपुरेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या. शशिकांत शिंदे यांनी तनपुरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Prajakt Tanpure NCP: राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ऐनवेळी भाजपच्या विनंतीनंतर माघार घेणारे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांचे नाव प्रचंड चर्चेत आहे. खरंतर तनपुरे भाजपमध्ये (BJP) जातील, सत्तेत सहभागी होतील, अशी जोरदार राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, आता प्राजक्त तनपुरे यांच्या एका सूचक वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या तत्त्व सांभाळणाऱ्यांचे राजकारण संपत चालले आहे, असे वक्तव्य तनपुरे यांनी केले. ते शुक्रवारी 'एबीपी माझा'शी बोलत होते. (Maharashtra Politics news)

प्राजक्त तनपुरे यांनी यापूर्वी अनेकदा संधी असतानाही सत्तेत न जाता पक्षनिष्ठा सांभाळली. परंतु, निष्ठा, तत्व सांभाळतांना राजकीय नुकसान झाल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. माझ्यासोबत पक्षात असणारे तिघेजण राष्ट्रवादी अजित पवार पक्षात गेले , तिकडे त्यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाले. मात्र, दुसरीकडे आमच्यासारखे निष्ठा ठेवणाऱ्या राजकारण्यांचे राजकारण संपत चालले आहे याचे दुःख होते, अशी भावना प्राजक्त तनपुरे यांनी बोलून दाखवली. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव आला होता. पण मला निष्ठा,  तत्व याच्याशी प्रामाणिक राहावं असे वाटले. पण सध्याचे राजकारण म्हणजे जो तत्वाशी जोडला  राहिल त्याचे राजकारण संपत आहे, याउलट जे तत्त्वांशी तडजोड करतात ते सत्तेत मोठ्या पदावरती जातात अशी स्थिती आहे, अशी खंत प्राजक्त तनपुरे यांनी बोलून दाखवली. त्यांच्या या वक्तव्यानंतर प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये जाण्याच्या पर्यायाचा गांभीर्याने विचार करत आहेत अथवा त्यांनी त्यांचा निर्णय घेतला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

NCP Shashikant Shinde: तनपुरेंच्या वक्तव्यावर शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ABP माझाशी बोलताना निष्ठा, तत्व सांभाळतांना राजकीय नुकसान झाल्याची खंत बोलून दाखवली. सध्याचे राजकारण म्हणजे जे तत्त्वांशी तडजोड करतात ते सत्तेत मोठ्या पदावरती जातात अशी स्थिती आहे, असंही तनपुरे म्हणाले होते. यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सध्याचे राजकारण असं आहे की, विरोधी पक्ष किंवा विरोधी नेता शिल्लकच राहू नये. अशाप्रकारची प्रथा देशात आणि राज्यात सुरू आहे. वेगवेगळे गुन्हा दाखल करून दबाव आणण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. याला लोकशाही म्हणत नाही, असे शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा

फडणवीसांचा केरळमधून एक फोन, शिवाजीराव कर्डिलेंच्या लेकासमोरील सर्वात मोठा धोका दूर, प्राजक्त तनपुरेंची राहुरी पोटनिवडणुकीतून माघार!

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
Satej Patil: गोकुळची मतमोजणी पूर्ण होत नव्हती, शरद पवारसाहेबांचा फोन आला आणि त्यांनी एक सल्ला दिला...,सतेज पाटील म्हणाले... 
गोकुळच्या मतमोजणीवेळी शरद पवारांचा फोन, सतेज पाटील यांना कोणता सल्ला दिलेला?

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
Hardik Pandya : हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगच्या ट्रेडमध्ये सर्वाधिक फायदा कोणाचा? मुंबई नव्हे पंजाबच फायद्यात, मोहम्मद कैफ म्हणाला...
हार्दिक आणि अर्शदीपच्या ट्रेडमध्ये फायदा कोणाचा? पंजाबचं नाव घेत मोहम्मद कैफ म्हणाला...
Embed widget