Bacchu Kadu : शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्यावरुन प्रहारचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या सुविधा महत्त्वाच्या नाहीत. एका शक्तीपीठातून किती पैसा वेगळ्या मार्गाने राज्यकर्त्यांकडे येईल हे फार महत्त्वाच आहे. कर्जमाफी करत नाहीत मात्र शक्तिपिठासाठी घाई करत असल्याचे कडू म्हणाले. शक्तीपीठ महामार्ग तयार करताना कोणाचं पीठ कोण दळून खाणार? हे फार महत्त्वाच आहे. सत्ताधाऱ्यांचं पिठाकडे लक्ष आहे शक्तीकडे नाही अशी टीकाही त्यांनी केली.
कर्जमाफी झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही
आम्ही कर्जमाफीच्या बाजूने आहोत, कर्जमाफी झाली पाहिजे अशी मानसिकता आहे असं माणिकराव कोकाटे म्हणत आहेत मग घोड अडलं कुठे? असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे. तुम्ही घोषणा केल्यामुळे लोकांनी कर्ज भरलं नाही, त्यामुळे व्याज माफ झालं नाही. त्यामुळे आता नवीन कर्ज शेतकऱ्यांना भेटत नाही. शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. तुम्ही घोषणा केली नसती तर त्यांनी कर्ज भरलं असतं तुम्ही घोषणा केल्यामुळे ते आता कर्ज भरत नाहीत असे कडू म्हणाले. आम्ही कर्जमाफी झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही काही झालं तरी बहेत्तर असा इशाराही त्यांनी दिला.
नितेश राणे राष्ट्रवादीचे मंत्री व अजित पवार यांना हिंदुत्वावरून टोला
भाजपने हिंदुत्वाचा विचार एकदा पक्का केला पाहिजे. काँग्रेसने ईदच्या निमित्ताने भेट दिली असती तर तुम्ही बोंबाटा केला असता काँग्रेसचा धर्म बदलला असता. तुमच्या हिंदुत्वामध्ये मुसलमानाला काय स्थान आहे, बुद्धांना काय स्थान आहे असे म्हणत बच्चू कडू यांनी भाजपला टोला लगावला.
मुलांनी काय शिकावं हे राज ठाकरे कसं काय ठरवणार?
आमदार-खासदार अधिकाऱ्यांची पोर दहा दहा भाषा शिकतात गरीबाच्या पोराला शिकण्यासाठी काय अडचण आहे. तो त्यांचा विषय आहे. पालकांनी त्यांना शिकवायचे की नाही. भाषा शिकल्याने मराठी अस्मिता जाते असं काही नाही. आम्ही नेहमी मराठी भाषा वापरली पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही. पाट्या मराठीत लावल्या पाहिजेत, त्याच्याहीबद्दल दुमत नाही. पण काय शिकावं हे राज ठाकरे कसं काय ठरवणार? असा सवाल बच्चू कडू यांनी केला. शाळेत जर्मनी भाषा शिकली म्हणून त्याची वाह वाह होते, पण हिंदी शिकवते म्हणून त्याच्यावर तुम्ही प्रश्न निर्माण करत असाल तर हे चुकीच आहे असे कडू म्हणाले. हिंदीला राष्ट्रीय भाषा म्हणून घोषित केले पाहिजे, आम्ही जेव्हा महाराष्ट्रात आहे तेव्हा मराठी आहोत. देशाला एक नाव नाही भारत वेगळा इंडिया वेगळा हिंदुस्तान वेगळा काय प्रकार लावलाय असे कडू म्हणाले.
बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी किती पैसे?
बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी वाहन चालकासाठी मजुरासाठी किती पैसे ठेवलेत? असा सवाल कडू यांनी केला. इथे भ्रष्टाचार हा शिष्टाचार केव्हा होतो, तो आपला असेल तर शिष्टाचार, तो अधिकारी जर भाजपचा एखादा जवळचा निघाला तर त्याच्यावर काही कारवाई होऊ शकते का? असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे. मुंडे साहेबांचा राजीनामा घ्यायला रस्त्यावर किती उतराव लागलं. तुम्हाला किती डाव टाकावे लागले इतके डाव तर मला वाटतं देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा दाखवले नसतील असे कडू म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
सरकारचे 100 दिवस पूर्ण तरी कर्जमाफी नाही, बच्चू कडू आक्रमक, कृषीमंत्र्यांच्या दारातच पेटवणार मशाल