Pragati Patil on Sunetra Pawar : सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) कणखर असून त्यांच्यात नेतृत्वगुण ही आहेत. लवकरच महाराष्ट्राला त्यांच्या नेतृत्व क्षमतेची ओळख होईल. सुनेत्रा पवार त्यांच्या नेतृत्व क्षणतेद्वारे कुटुंबाला आणि पक्षाला संकट काळातून सहज बाहेर काढतील, असंमत सुनेत्रा पवार यांच्यासोबत महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या आणि सारख्याच वसतिगृहात राहणाऱ्या सुनेत्रा पवार यांच्या भाची प्रगती पाटील यांनीव्यक्तकेलंआहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनीया भावना व्यक्तकेल्याआहेत. (Pragati Patil on Sunetra Pawar DCM Oath)
Pragati Patil : सुनेत्रा पवार लवकरच सध्याच्या कठीण प्रसंगातून स्वतःला, कुटुंबाला आणि पक्षाला बाहेर काढतील
सुनेत्रा पवार यांच्यात नेतृत्व गुण विद्यार्थी दशेपासूनच आहे. छत्रपती संभाजीनगरच्या महाविद्यालयात त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या 17 तरुणींचा समूह फक्त इतर तरुणींची मदतच करत नव्हतं, तर संपूर्ण महाविद्यालयातील तरुणींचं नेतृत्वही करत होत्या, अशी माहिती सुनेत्रा पवार यांच्या भाची प्रगती पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. प्रगती पाटील त्यांच्या मावशी असलेल्या सुनेत्रा पवार यांच्यासोबत छत्रपती संभाजीनगरच्या त्याच महाविद्यालयात शिकत होत्या, त्याच वसतिगृहात राहत होत्या. सुनेत्रा पवार स्वभावाने कणखर आहेत आणि सध्याच्या कठीण प्रसंगातून त्या स्वतःला, त्यांच्या कुटुंबाला आणि पक्षाला बाहेर काढतील, असा विश्वासही प्रगती पाटील यांनी व्यक्त केला आहे.
Pragati Patil on Sunetra Pawar : येणाऱ्या दिवसात त्यांच्या नेतृत्वगुणाची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला होईल
विद्यार्थीदशेनंतर बारामतीत सुनेत्रा पवार यांनी मोठ्या प्रमाणावर सामाजिक उपक्रम राबवले. आणि जेव्हा कौटुंबिक वेळ आली तेव्हा त्यांनी राजकारणात उतरत आपलं कर्तव्य पार पाडलं. येणाऱ्या दिवसात त्यांच्या नेतृत्वगुणाची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला होईल, असा विश्वास प्रगती पाटील यांनी व्यक्त केला आहे.
पवार कुटुंबात नाराजी, सुनेत्रा पवार आणि शरद पवारांची भेट नाही- (Ajit Pawar NCP And Sharad Pawar NCP)
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर सुनिल तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ या नेत्यांनी शरद पवारांच्या पक्षासोबत या शपथविधी सोहळ्याबद्दल कोणतीही चर्चा केलेली नाही. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षात आणि एकुणच पवार कुटुंबात नाराजी असल्याचं बोलल्याच दिसून येतंय. काल बारामतीत अजित पवारांच्या रक्षा विसर्जनाचा विधी पार पडला. या विधीसाठी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र होत्या. त्यानंतर दोघी वेगवेगळ्या दिशेने गेल्या. त्यानंतर राजकीय घडामोडींना मुंबईत वेग आला आणि सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री बनणार यावर शिक्कामोर्तब झाले. यादरम्यान सुनेत्रा पवार यांची शरद पवारांसोबत भेट झालेली नाही. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी संवाद न साधल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चाला खोडा लागल्याचं बोललं जात आहे.
