मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल पटेल (Praful Patel) यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची थेट माहिती केंद्रीय मंत्री पियूष गोयल (piyush Goyal) यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे काल (शनिवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत टीका करत विरोध केला होता. याबाबत माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यानंतर आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे, त्यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्ट करत याबाबतच्या निवडीला नकार देत हे वृत्त फेटाळले आहे.

 प्रफुल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्यानंतर पटेलांनी म्हटलंय की, माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबाबत काही बातम्या प्रसारित होत असल्याची माझ्या निदर्शनास आली आहे. या सर्व बातम्या पूर्णपणे निराधार असून त्यात कोणतेही तथ्य नाही, हे मी अत्यंत स्पष्टपणे सांगू इच्छितो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही एक लोकशाही संस्था आहे. इतक्या महत्त्वाच्या निर्णयाबाबत ज्येष्ठ नेते, आमदार यांच्याशी सल्लामसलत करून, पक्षाच्या समर्पित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तसेच सर्व कार्यकर्त्यांच्या भावना आणि सामूहिक इच्छेचा आदर राखूनच निर्णय घेतला जातो. राष्ट्रीय पक्ष म्हणून अशा निर्णयांसाठी आम्ही ठरलेली आणि पारदर्शक प्रक्रिया पाळतो, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.(Praful Patel) 

पोस्टमध्ये प्रफुल पटेलांनी काय म्हटलयं?

माध्यमांमध्ये माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबाबत काही बातम्या प्रसारित होत असल्याची माझ्या निदर्शनास आली आहे. या सर्व बातम्या पूर्णपणे निराधार असून त्यात कोणतेही तथ्य नाही, हे मी अत्यंत स्पष्टपणे सांगू इच्छितो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही एक लोकशाही संस्था आहे. इतक्या महत्त्वाच्या निर्णयाबाबत ज्येष्ठ नेते, आमदार यांच्याशी सल्लामसलत करून, पक्षाच्या समर्पित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तसेच सर्व कार्यकर्त्यांच्या भावना आणि सामूहिक इच्छेचा आदर राखूनच निर्णय घेतला जातो. राष्ट्रीय पक्ष म्हणून अशा निर्णयांसाठी आम्ही ठरलेली आणि पारदर्शक प्रक्रिया पाळतो.

पियूष गोयल यांनी पीटीआयशी बोलताना केला दावा

पियुष गोयल म्हणाले की, महायुतीमध्ये आमची राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सोबत युती आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर NCPच्या आमदारांनी एकत्र येऊन सुनेत्रा पवार यांची पक्षनेते म्हणून निवड केली, आणि त्यामुळे त्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाल्या. आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो आणि त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा देतो. ते पुढे म्हणाले की, सुनेत्रा पवार या खूप संवेदनशील आणि लोकांसाठी काम करणाऱ्या नेत्या आहेत. त्यांनी त्यांचं काम राज्यसभेत आणि बारामती मतदारसंघात पाहिलं आहे, जिथे त्या लोकांची खूप चांगल्या पद्धतीने सेवा करत आहेत. अजित पवार यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, अजित दादा हे उत्तम प्रशासक, लोकनेते आणि महाराष्ट्रातील जनतेचे लाडके नेते होते. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी पवार कुटुंबीयांना श्रद्धांजली अर्पण केली आणि सुनेत्रा पवार (वहिनी) यांना त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.