Pimpri Chinchwad Municipal Scam : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी प्रवीण जैन (Praveen Jain) यांच्या अडचणीत आणखी वाढ झालीये. पालिकेच्या 2800 कोटींच्या ठेवीतील व्याजात ही जैन यांनी घोटाळा (PCMC Scam) केल्याचं आणि सात कोटींचा डल्ला मारल्याचं समोर आलंय. आधीच्या साठ कोटींच्या घोटाळ्यात सुरु असलेल्या चौकशीत हे उघड झालंय. पालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालाने जैन (Praveen Jain) यांचा नवा कारनामा समोर आलाय.

Continues below advertisement

दरम्यान, तत्कालीन आयुक्त आणि प्रशासक शेखर सिंह यांचा यात हात आहे का? याचं संशोधन करण्याची गरज आहे. असं म्हणत स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणेंनी शंका उपस्थित केलेली आहे. कारण त्यांच्या काळातील 2024 साली 1810 कोटींच्या तर 2025 साली सुमारे 1 हजार कोटींच्या ठेवी ठेवताना, बँकांशी तडजोड करुन जैन यांनी व्याजातून सात कोटी लाटले. हे चौकशी अहवालातून स्पष्टपणे दिसत असल्याचा आरोप बारणेंनी केलाय. सध्या हा अहवाल अर्धवट आहे, आम्ही सुधारित अहवालाची मागणी करतोय. त्यानंतर घोटाळ्याचा आकडा आणखी वाढणार आहे. असा दावा बारणेंनी केला. अशातच, आता पालिकेच्या तिजोरीला बसलेला भुर्दंड जैन यांच्याकडून वसुल करावा, अशी मागणी ही बारणेंनी केलीये.

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील 52 कोटींचं भ्रष्टाचार प्रकरण! शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादीचे खळबळजनक आरोप

Continues below advertisement

पिंपरी चिंचवडमधील 52 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणात आता शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादीनं उडी घेतली आहे. ठेकेदारांना ज्या उपसुचनांच्या आधारे बिलं अदा करण्यात आली, त्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीतील एकही नगरसेवकांची सही नाही, असा दावा पत्रकार परिषद घेऊन करण्यात आला आहे.

स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणेंनी मुख्य लेखाधिकारी प्रवीण जैन यांच्यावर केले भ्रष्टाचाराचे आरोप

स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणेंनी मुख्य लेखाधिकारी प्रवीण जैन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना, सर्व पक्षीय नगरसेवकांच्या सह्यांनी बिलं अदा झाल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपवर पलटवार केला. या भ्रष्टाचारात भाजपचा हात आहे का? अशी शंका उपस्थित करण्यात आली. ज्या ठेकेदारांना बिलं अदा केली, ते भाजपचे आमदार महेश लांडगे आणि शंकर जगतापांचे निकटवर्तीय असणारे आहेत. असा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला. हे पाहता केवळ प्रवीण जैन यांची नव्हे तर ठेकेदार, सह्या करणारे नगरसेवक आणि त्यांना ज्यांनी सह्या करायला लावल्या त्या सर्वांची चौकशी करावी. अशी मागणी शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने केलीये.