Parbhani ZP Election Result 2026 : परभणीकरांचा घराणेशाहीला घरचा रस्ता; भाजपचे माजी मंत्री सुरेश वरपुडकरांना मोठा धक्का, कुटुंबातील 5 पैकी चौघांचा पराभव
Parbhani ZP Election Result 2026 : भाजपचे माजी मंत्री सुरेश वरपूडकर (Suresh Warpudkar) यांना परभणीकरांनी (Parbhani ZP Election) दुसरा मोठा धक्का दिलाय.

Parbhani ZP Election Result 2026 : भाजपचे माजी मंत्री सुरेश वरपूडकर (Suresh Warpudkar) यांना परभणीकरांनी (Parbhani ZP Election) दुसरा मोठा धक्का दिलाय. मुलीनंतर मुलगा समशेर वरपूडकरही शिंगणापूर जिल्हा परिषद गटातून पराभूत झाल्याची माहिती समोर आली आहे. माजी मंत्री सुरेश वरपुडकरांच्या कुटुंबातून पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी केवळ एका जागी विजय मिळवण्यात वरपुडकरांना यश आले आहे. तर मुलगा , मुलगी, सून, आणि एका पुतण्याला या निवडणुकीत पराभवाला समोर जावं लागलं आहे. समशेर वरपूडकर यांचा पराभव करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackera) यांच्या शिवसेनेचे (Shivsena UBT) उमेदवार पांडुरंग खिल्लारे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर पांडुरंग खिल्लारे यांना आश्रु अनावर झाले असून त्यांनी यावेळी बोलताना परभणीकरांचे आभार मानले आहेत. तर दुसरीकडे परभणीकरांनीही घराणेशाहीला घरचा रस्ता दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. (Parbhani ZP Election 2026)
Parbhani ZP Election : सुरेश वरपूडकर यांना धक्का, कुटुंबातील पाच उमेदवारांपैकी एका जागी विजय
परभणीचे भाजपचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातील पाच जण या निवडणुकीमध्ये उभे होते. यातील मुलगी सोनल देशमुख या झरी जिल्हा परिषद गटातून मशालच्या चिन्हावर उभ्या होत्या, त्यांचा पराभव भाजपचे उमेदवार दिलीप देशमुख यांनी केलाय. दुसरीकडे त्यांचे चिरंजीव समशेर वरपूडकर हे शिंगणापूर जिल्हा परिषद गटातून उभे होते. त्या ठिकाणी मशाल या चिन्हावर उभे असलेले पांडुरंग खिल्लारे यांनी समशेर वरपूडकर यांचा पराभव केला आहे. दुसरीकडे त्यांच्या सुनबाई प्रेरणा वरपूडकर या दैठणा जिल्हा परिषद गटातून उभे होत्या, त्या ठिकाणीही काँग्रेसच्या ज्योत्स्ना गणेश घाडगे यांनी त्यांचा पराभव केलाय. त्यामुळे वरपूडकर यांच्या घरातील तीनही उमेदवार पराभूत झालेत.
Parbhani ZP Election 2026 : परभणीकरांचा सामान्य उमेदवारांना साथ, घराणेशाहीला घरचा रस्ता
दुसरीकडे लोहगाव जिल्हा परिषद गटात दोन पुतणे उभे होते, ज्यातील काँग्रेसच्या चिन्हावर उभे असलेले अजित वरपूडकर यांनी भाजपकडून उभे असलेल्या ऐश्वर्य वरपुडकर यांचा पराभव केलाय. त्यामुळे पाच पैकी केवळ एक पुतण्याला या निवडणुकीत विजयी संपादन करता आला आहे. दरम्यान या निकालानंतर परभणीकरांनी नेत्यांच्या कुटुंबातील मोठ्या उमेदवारांना नाकारत सामान्य उमेदवारांना या ठिकाणी विजय करून घराणेशाहीला घरचा रस्ता दाखवला, अशी चर्चा रंगू लागली आहे.
Parbhani Election Result : तालुकानिहाय मतदान
परभणी तालुका 80.27 टक्क्यांसह अव्वल ठरला. त्याखालोखाल पाथरी 75.59, पूर्णा 75.25, पालम 74.74, मानवत 74.07, जिंतूर 73.53, सेलू 73.42 व गंगाखेड 72.86 अशी टक्केवारी नोंदली गेली. सोनपेठ तालुक्यात सर्वात कमी 68.60 टक्के मतदान झाले.
परभणी:- 80.27 %
पूर्णा:- 75.25%
पालम:-74.74%
गंगाखेड:-72.86 %
सोनपेठ:-68.60%
मानवत:-74.07%
पाथरी:-75.59 %
जिंतूर:-73.53%
सेलू:-73.42 %
इतर महत्वाच्या बातम्या
























