Chhatrapati Sambhajinagar News : भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडें (Pankaja Munde) यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक (Helicopter) बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरहुन उड्डाण घेण्यापूर्वीच बिघाड झाल्याचे निष्पन्न झालंय. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंडे (Pankaja Munde) लातूर दौऱ्यावर जाणार होत्या मात्र टेकऑफपूर्वीच हेलिकॉप्टरच्या पायलटला तांत्रिक बिघाड असल्याचे निष्पन्न झालं. परिणामी पंकजा मुंडेंनी आपला प्रवास आणि सभांच्या वेळा पुढे ढकलल्या असल्याची माहिती आहे. हेलिकॉप्टरमधील बिघाडामुळे आता दुसऱ्या हेलिकॉप्टरने पंकजा मुंडें या लातूर (Latur) येथील सभांना हजेरी लावणार असल्याची माहिती आहे.
Pankaja Munde : मी हेलिकॉप्टरने फिरते म्हणून माझी आई देव पाण्यात ठेवते
आगामी जिल्हापरिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी मंत्री पंकजा मुंडें आज (3 फेब्रुवारी) लातूरसह सोलापुरला जाणार आहे. सोलापुरातील मंद्रूप आणि कुंभारी अशा दोन ठिकाणी संध्याकाळी 6 आणि 8 वाजता पंकजा मुंडेंच्या सभा होणार आहेत. दरम्यान, काल (2 फेब्रुवारी) पंकजा मुंडें या छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेसाठी वाळूज परिसरात सभा घेतली होती. यावेळी प्रचार सभेत बोलताना त्या म्हणाल्या होत्या कि, 'जिल्हा परिषदेच्या प्रचारादरम्यान मी हेलिकॉप्टरने फिरते म्हणून माझी आई देव पाण्यात ठेवते', असे वक्तव्य त्यांनी केलं होतं. अशातच आज सकाळी त्यांच्या हेलिकॉप्टर उड्डाण घेण्यापूर्वीच बिघाड झाल्याचे निष्पन्न झालंय.
Pankaja Munde Helicopter : लातूर दौरा रखडला, सभांच्या वेळा पुढे ढकलल्या
दरम्यान, मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लातूर दौरा रखडला आहे. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पुढील प्रवास लांबला आहे. परिणामी, दुसरे हेलिकॉप्टर आल्यावर मंत्री पंकजा मुंडें निर्धारित प्रवासाला निघणार असल्याची माहिती आहे. एकाकडे राज्यात नुकताच झालेल्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. या अपघातानं अवघ्या महाराष्ट्रासह देशात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे या विमान अपघाताबाबत अनेकांनी या अपघातांवर संशय व्यक्त करत अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. अशातच मंत्री पंकजा मुंडें यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
आणखी वाचा