एक्स्प्लोर

Jayant Patil : आमच्या पक्षाकडे शरद पवारांचं नेतृत्त्व, स्वतंत्र अस्तित्त्व पण कधीही वेळ पडल्यास सुनेत्रा पवारांच्या मदतील जाऊ: जयंत पाटील

Jayant Patil : जयंत पाटील यांनी कधीही वेळ पडल्यास सुनेत्रा पवारांच्या मदतील जाऊ असं वक्तव्य केलं आहे.

NCP Merger talks: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडल्या. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या (NCP Merger) चर्चांना उधाण आलं होतं. अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली होती. अजित पवार (Ajit Pawar) त्यासाठी आग्रही होते, असा दावा वारंवार शरद पवार गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. मात्र, अजित पवार गटाच्या प्रफुल पटेल (Praful Patel) आणि सुनील तटकरे यांनी अशी कोणतीही चर्चा झाली नव्हती, असे सांगत हा दावा फेटाळून लावला होता. त्यानंतर आता या चर्चां आता थंड होताना दिसत आहेत. अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी कधीही वेळ पडल्यास सुनेत्रा पवारांच्या मदतील जाऊ असं वक्तव्य केलं आहे.

आम्ही कधीही तुमच्या मदतीला येऊ

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात जयंत पाटील यांनीही आता भाष्य करणं टाळलेलं आहे. विलिनीकरणावरती मला भाष्य करावसं वाटत नाही, असं जयंत पाटील म्हणालेत. शरद पवारांच्या नेतृत्वात आमचा पक्ष आहे. आमच्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व आहे. आमचा पक्ष त्या दृष्टीने वाटचाल करेल, असं जयंत पाटील म्हणालेत. तर आम्ही कधीही तुमच्या मदतीला येऊ असं सुनेत्रा पवारांना त्यांनी सांगितल्याचंही ते म्हणालेत. सोबतच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांसमोर अडथळे किंवा प्रश्न निर्माण करण्याची इच्छा नाही असं वक्तव्यही जयंत पाटील यांनी केलेलं आहे. राजकारणामध्ये उद्या काय होईल ते आज सांगता येत नाही अशी अवस्था दादांच्या निधनानंतर अकस्मित जे एक्सीडेंट झाला त्यानंतर हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे की, आजचा दिवस, उद्या आहे का, हे नियतीला मान्य आहे का, असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे पुढं काय करायचं आमचा पक्ष आहे, पक्षाच अस्तित्व आहे, पवार साहेबांच्या सारखं मोठं व्यक्तिमत्व आहे, महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या समोर अमेरिका भारत कराराच्यातन काही नवीन आव्हान निर्माण होणार आहेत, देशाच्या आर्थिक परिस्थितीचे विषय आहेत, आणखीन बरेच प्रश्न आहेत, त्यामुळे आमचा पक्ष त्या दृष्टीने विचार करेल, पण प्रश्न विलिनीकरणाचा राहिला तर त्यावर मला आज भाष्य करायचा अधिकारी नाही, आणि भाष्य करावं असंही मला वाटत नाही.

सुनेत्रा वहिनींना आम्ही काही चार पाच जण त्या बारामतीत असताना घरी जाऊन भेटलो

सुनील तटकरे यांचं जे काही म्हणणं आहे, ते खोडून काढलं की अशी काही विलनीकरणाची चर्चा झालेलीच नव्हती, असं सुनील तटकरे म्हणतात. त्यावरती पाटील म्हणाले, ठीक आहे. आता ज्या माणसाशी, नेत्याशी आमची चर्चा झालेली, तेच नसल्यामुळे अशा विधानाला उत्तर देणही मला आवश्यक वाटत नाही, आता सुनेत्रा वहिनींना आम्ही काही चार पाच जण त्या बारामतीत असताना घरी जाऊन भेटलो आणि आम्ही त्यांना सांगितलं, काही अडचण असेल काही प्रश्न असतील तर आम्हाला सांगा. आम्ही कधी तुमच्या मदतीला येऊ, काहीच अडचण मनात किंतु बाळगू नका, विलिनीकरणाच्या आधी देखील एकदा दोनदा माझ्या त्यांच्या भेटी झालेल्या होत्या, त्यामुळे सुनेत्रा वहिनींचा जो मुद्दा असेल किंवा पार्थ पवारांचा असेल आमची त्यांना पूर्ण पाठिंबा म्हणजे सपोर्ट आहे, त्यांच्यासाठी काही अडथळे आणि प्रश्न तयार करण्याची आमची इच्छा नाही, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shawarma Girl meets Raj Thackeray: डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
Rajya Sabha Election 2026: राज्यसभेत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मेगा प्लॅन; राज्यसभेसाठी 2 उमेदवार देणार, नेमकं काय घडतंय?
राज्यसभेत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मेगा प्लॅन; राज्यसभेसाठी 2 उमेदवार देणार, नेमकं काय घडतंय?
Maharashtra Farmer Loan Waiver मोठी बातमी: फडणवीस, शिंदे, पवार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती
मोठी बातमी: फडणवीस, शिंदे, पवार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती
Rajya Sabha Election 2026 Shivsena Shinde Group Candidate: शेवाळे, निरुपम, अडसूळ, किर्तीकर...राज्यसभेची जागा 1, इच्छुक 8; एकनाथ शिंदे नेत्यांच्या गराड्यात अडकले!
शेवाळे, निरुपम, अडसूळ, किर्तीकर...राज्यसभेची जागा 1, इच्छुक 8; एकनाथ शिंदे नेत्यांच्या गराड्यात अडकले!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump War with Iran: ट्रम्पचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर; महत्वाच्या टप्प्यावर लगाम घालण्यात अपयश; युद्ध किती काळ चालणार अन् आता पुढे काय घडणार?
ट्रम्पचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर; महत्वाच्या टप्प्यावर लगाम घालण्यात अपयश; युद्ध किती काळ चालणार अन् आता पुढे काय घडणार?
Shawarma Girl meets Raj Thackeray: डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
युद्ध गुन्हेगारी सुरुच? 7 ते 12 वयातील 165 निष्पाप चिमुरड्या मुली मारल्यानंतर आता भारतात लष्करी सरावातून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ अमेरिकेचा हल्ला; 87 मृत्यूमुखी, 32 जणांचा जीव वाचला
युद्ध गुन्हेगारी सुरुच? 7 ते 12 वयातील 165 निष्पाप चिमुरड्या मुली मारल्यानंतर आता भारतात लष्करी सरावातून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ अमेरिकेचा हल्ला; 87 मृत्यूमुखी, 32 जणांचा जीव वाचला
Bollywood Actress on Khamenei Death: इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
Maharashtra Farmer Loan Waiver मोठी बातमी: फडणवीस, शिंदे, पवार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती
मोठी बातमी: फडणवीस, शिंदे, पवार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती
Maharashtra Breaking LIVE Updates: मुंबईतील रेल्वेच्या गर्दीमुळे उद्भवणाऱ्या प्रश्नांवर आज विधानसभेत लक्षवेधी
Maharashtra Breaking LIVE Updates: मुंबईतील रेल्वेच्या गर्दीमुळे उद्भवणाऱ्या प्रश्नांवर आज विधानसभेत लक्षवेधी
Nagpur Crime News: चिमुकल्याने अंगावर रंग उडवला, आजी संतापली, नातवाच्या अंगावर कडकडीत गरम पाण्याची बादली उपडी केली, नागपूरमधील धक्कादायक घटना
चिमुकल्याने अंगावर रंग उडवला, आजी संतापली, नातवाच्या अंगावर कडकडीत गरम पाण्याची बादली उपडी केली, नागपूरमधील धक्कादायक घटना
Crime News Sagar Moholkar: निलेश घायवळच्या कानशिलात लगावणाऱ्या कुख्यात गुंड सागर मोहोळकरवर फायरिंग; प्रकृती गंभीर, उपचारांसाठी पुण्याला हलवलं
निलेश घायवळच्या कानशिलात लगावणाऱ्या कुख्यात गुंड सागर मोहोळकरवर फायरिंग; प्रकृती गंभीर, उपचारांसाठी पुण्याला हलवलं
Embed widget