एक्स्प्लोर

Operation Tiger UBT Shivsena: पत्रकार परिषदेत संजय राऊतांच्या बाजूला बसलेला खासदारही फुटणार? ऑपरेशन टायगरमध्ये नाट्यमय वळण, नक्की काय घडणार?

Operation Tiger UBT Shivsena: ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करुन शिंदे गटात विलीन होण्याची तयारी सुरु केली आहे. लोकसभा अध्यक्षांची स्वतंत्र गटाला मंजुरी

Operation Tiger UBT Shivsena: गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेले ऑपरेशन टायगरची चर्चा आता प्रत्यक्षात आली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाचे सहा खासदार फोडण्यात यश मिळवले आहे. या सहा खासदारांना घेऊन एकनाथ शिंदे हे बुधवारी सकाळी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या दिल्लीतील कार्यालयात गेले होते. याठिकाणी ठाकरे गटाच्या 6 बंडखोर खासदारांनी आपण स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र लोकसभा अध्यक्षांना देत शिंदे गटाला पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केले. यानंतर लोकसभा अध्यक्षांनी सहा बंडखोर खासदारांच्या या स्वतंत्र गटाला मंजुरी दिली. पक्षांतरबंदी कायद्यानुसार लागणारे दोन तृतीयांश खासदार फुटल्यामुळे या गटातील खासदारांवर कोणतीही कारवाई होऊ शकत नाही. त्यामुळे आता सहा खासदारांचा हा गट लवकरच शिवसेनेत विलीन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, या गटात आणखी एका खासदाराची भर पडणार असल्याची धक्कादायक माहिती आहे. विशेष म्हणजे हा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत इतर खासदारांच्या मांडीला मांडी लावून बसला होता. त्यामुळे आता हा सातवा खासदार कोण, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Maharashtra Politics news)

संजय राऊत यांनी सहा खासदार फुटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बुधवारी खासदार राजाभाऊ वाजे, अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांच्यासोबत एक पत्रकार परिषद घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, जे चार खासदार या पत्रकार परिषदेस बसले होते त्यापैकी एक खासदार बंडखोर खासदारांसोबत येण्यास तयार होता. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत तो खासदार शिवसेना शिंदे गटात येण्यास तयार झाला होता. मात्र, ऐनवेळी अडचण असल्याने त्यावेळी ऑपरेशन टायगरची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. आता जेव्हा या घडामोडी झाल्या त्यावेळी मात्र त्या खासदाराने शिंदे गटासोबत येण्यास नकार दिला. हा खासदार हा आज संजय राऊत यांच्यासोबतच्या बैठकीला हजरही होता. मात्र, येत्या दोन महिन्यांत हा खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून बाहेर पडेल, अशी माहिती शिंदे गटातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. सुरुवातीला हा सातवा खासदार म्हणजे राजाभाऊ वाजे असू शकतात, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, हा सातवा खासदार राजाभाऊ वाजे नाहीत. त्यामुळे आता अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांच्यापैकी कोणता खासदार फुटणार, याची चर्चा सुरु झाली आहे. अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांच्यापैकी कोणताही नेता शिंदे गटात घेतल्यास वैयक्तिक पातळीवर तो उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का ठरु शकतो.

Shivsena news:  ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे

1. अनिल देसाई

2. अरविंद सावंत

3. संजय दिना पाटील

4. राजाभाऊ वाजे

5. संजय जाधव

6. संजय देशमुख

7. नागेश पाटील आष्टीकर

8. ओमराजे निंबाळकर

9. भाऊसाहेब वाकचौरे

Shivsena MPs: कोणते खासदार शिंदे गटात गेले?

1. संजय जाधव

2. संजय देशमुख

3. नागेश पाटील आष्टीकर

4. ओमराजे निंबाळकर

5. भाऊसाहेब वाकचौरे

6. संजय दिना पाटील

आणखी वाचा

उद्धव ठाकरेंनी तुमच्यावर भावासारखं प्रेम केलं, पण हे भोसxxx यांच्या अंगात गद्दारी भिनलीय; संजय राऊतांची फुटीर खासदारांवर आगपाखड

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
Rajya Sabha Election : भाजपमध्ये प्रवेश करताच तृणमूल सोडलेल्या तिघांना राज्यसभेची उमेदवारी, एनडीए दोन तृतियांश बहुमताजवळ पोहोचणार
भाजपमध्ये प्रवेश करताच तृणमूल सोडलेल्या तिघांना राज्यसभेची उमेदवारी, एनडीए दोन तृतियांश बहुमताजवळ पोहोचणार
निष्ठा कोणाला सांगताय? राज ठाकरेंनी तुम्हाला पक्षात घेतलं नाही, विधिमंडळात भास्कर जाधवांचा थेट अतुल भातखळकरांवर हल्लाबोल 
निष्ठा कोणाला सांगताय? राज ठाकरेंनी तुम्हाला पक्षात घेतलं नाही, विधिमंडळात भास्कर जाधवांचा थेट अतुल भातखळकरांवर हल्लाबोल 
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Maharashtra Live blog updates: डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात नगरसेवकाकडून झालेल्या मारहाणीनंतर दोन्ही डॉक्टरांकडून राजीनामे
Maharashtra Live blog updates: डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात नगरसेवकाकडून झालेल्या मारहाणीनंतर दोन्ही डॉक्टरांकडून राजीनामे
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Embed widget