एक्स्प्लोर

Operation Tiger: नाशिकमध्ये 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा, 5 कोटींच्या आमिषाचा पर्दाफाश करत ठाकरेंचे नगरसेवक एकत्र जमले; गटनेत्यांचा थेट 'ऑपरेशन तुडवा'चा इशारा, नेमकं काय घडलं?

Operation Tiger: नाशिक महापालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या 10 ते 12 नगरसेवकांना शिंदेंच्या शिवसेनेकडून गळाला लावले जात असल्याच्या चर्चेने नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती.

Operation Tiger: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या 'ऑपरेशन टायगर' (Operation Tiger) च्या चर्चेचे पडसाद आता नाशिकमध्ये उमटू लागले आहेत. नाशिक महापालिकेतील (Nashik Municipal Corporation) ठाकरेंच्या शिवसेनेच्या (Shiv Sena UBT) 10 ते 12 नगरसेवकांना शिंदेंच्या शिवसेनेकडून गळाला लावले जात असल्याच्या चर्चेने नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. प्रभागनिहाय 5 कोटी रुपयांच्या विशेष निधीचे आमिष दाखवून अनेक नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत गुप्त बैठका झाल्याची माहिती समोर येत होती. या सर्व पार्श्वभूमीवर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी आज पक्षाच्या गटनेते कार्यालयात एकत्र जमून आपली एकजूट दाखवून दिली आहे.

Operation Tiger: 'ऑपरेशन तुडवा'चा इशारा

शिंदेंच्या शिवसेनेकडून संघटन विस्तारासाठी हालचाली वेगात असतानाच, ठाकरेंच्या नगरसेवकांनी गटनेते केशव पोरजे यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सर्व अफवांना पूर्णविराम दिला. गटनेते केशव पोरजे यांनी अत्यंत गंभीर आरोप करत सांगितले, "आमचा कोणताही नगरसेवक फुटणार नाही, आम्ही सर्वजण एकत्र आहोत. नाशिकमध्ये केवळ संशयाचे वातावरण तयार केले जात आहे. उपमहापौर पदाचा सौदा केला जात असून, ज्यांना उपमहापौर बनायचे आहे ते एजंट पाठवून आमच्या नगरसेवकांना 5 कोटींच्या प्रभाग निधीचे आमिष दाखवत आहेत. आतापर्यंत 5 ते 6 नगरसेवकांशी असा संपर्क साधण्यात आला आहे."

पोरजे पुढे म्हणाले की, "एक वकील असलेला एजंट, ज्याला स्वतःला स्वीकृत नगरसेवक व्हायचे आहे आणि जो सध्या पक्ष संघटनेतही नाही, तो आमच्या नगरसेवकांशी संपर्क साधत आहे. आमची विकासकामांसाठी अडवणूक केली जात असून आम्ही मनपा आयुक्तांना निधी देण्यासाठी निवेदन दिले आहे. ज्याप्रमाणे खासदार फुटले तेव्हा 'ऑपरेशन तुडवा' राबवण्यात आले, तसेच आता 'ऑपरेशन तुडवा' राबविणार," असा सज्जड दम त्यांनी दिला.

Operation Tiger: दोन नगरसेवक घरगुती कारणामुळे गैरहजर; पण पाठिंबा कायम

नाशिक महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचे एकूण 15 नगरसेवक निवडून आले आहेत. यातील 13 नगरसेवक प्रत्यक्ष हजर होते. तर, नगरसेविका मंगला आढाव यांच्या सासूचे निधन आणि मुरलीधर भामरे यांच्या चुलत्यांचे निधन झाल्यामुळे हे दोघे उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, मुरलीधर भामरे यांच्या वतीने त्यांचे पुत्र तेजस भामरे पत्रकार परिषदेला उपस्थित होते, ज्यातून सर्व 15 नगरसेवक एकत्र असल्याचा संदेश देण्यात आला.

Shiv Sena UBT: ठाकरे गटाच्या नाशिकमधील 15 नगरसेवकांची यादी 

1 केशव सिताराम पोरजे (गटनेते)

2 प्रथमेश वसंत गिते

3 सीमा विशाल पवार

4 मंगला प्रकाश आढाव 

5 शैलेंद्र आत्माराम ढगे

6 रुचिरा संतोष साळवे

7 योगेश वामन भोर

8 भारती आंबादास ताजनपुरे

9 वैशाली प्रमोद दाणी

10 योगेश लक्ष्मण गाडेकर

11 संजीवनी संजय हांडोरे

12 मुरलीधर (तात्या) सखाराम भामरे

13 माधुरी मदन डेमसे

14 वैशाली विनोद दळवी (पाटील)

15 प्रमिला कैलास मैद

आणखी वाचा 

Operation Tiger 3: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? 'ऑपरेशन टायगर 3'च्या वेगवान हालचाली ; ठाकरेंचे 10 आमदार अन् शरद पवारांचे खासदार एकनाथ शिंदेंच्या रडारवर

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Shiv Sena Symbol Case : राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget