नवी दिल्ली : ठाकरेंच्या सेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी व्हीप जारी करत खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला ऑपरेशन टायगरमधील संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांनी दांडी मारली आहे. या बैठकीनंतर खासदार अरविंद सावंत ठाकरेंच्या शिवसेनेची पुढील रणनीती काय असेल ते सांगितलं आहे.  ते म्हणाले की आम्ही पक्षादेश जारी केला होता, 11 वाजताच्या बैठकीला आम्ही बसलो होतो. मी, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय राऊत जे संसदीय पक्षाचे नेते उपस्थित होते. ही मंडळी बैठकीला आली नाहीत म्हणून त्यांना कारणे दाखवा नोटीस देणार आहोत. येत्या 7 दिवसात त्यांनी उत्तर दिलं नाही तर पक्षद्रोहाची कारवाई त्यांच्यावर करणार आहे, असं अरविंद सावंत म्हणाले. 

Continues below advertisement

व्हीप लागू होत नाही असं म्हणनं हा अडाणीपणाचा कळस आहे. पक्षाला व्हीप जारी करता येतो, तो मतदान इकडे करा यासाठी मर्यादित नसतो. पक्षादेश लागू होणार आणि पक्षद्रोह केल्याची त्यांच्यावर कारवाई होणार असं अरविंद सावंत यांनी म्हटलं. शेण खात आहेत खाऊ द्या, आता महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं.हा जो बाजार मांडला गेला आहे, त्यामुळं लोकशाही धोक्यात आहे. 

फुटणाऱ्यावंर टीका करताना अरविंद सावंत म्हणाले की तुमची ओळख काय? तुम्हाला ओळख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात सुरु आहे. त्या शिवसेनेनं तुम्हाला उमेदवारी दिली. 2014 नंतर तुम्हाला कोणी मोठं केलं, तुम्हाला दोनदा उमेदवारी कोणी दिली ? आमचं पक्षचिन्ह घेऊन उभं राहिलात, मशाल घेऊन निवडून आलात, जनतेनं मशालीवर मतदान केलं. मतदारांनी आम्हा सगळ्यांना, भाजपच्या, मिंध्यांच्या विरोधात 9 जणं निवडून आलो. तुमच्यात धाडस असेल तर राजीनामा द्या आणि निवडणूक लढवा,असं आव्हान अरविंद सावंत यांनी म्हटलं. 

Continues below advertisement

आमचं निवदेन सुद्धा सार्वजनिक केलं आहे, व्हीप सार्वजनिक केला आहे.बैठकीनंतर तुमच्याशी सार्वजनिकपणे बोलतोय. काल एक जण आलो नाही असं म्हटलं. एकानं काल बैठकीला येतो म्हणून सांगितलं तो आलेला नाही, असं अरविंद सावंत म्हणाले. जो सगळा बाजार सुरु आहे, त्याची प्रतिक्रिया जनमाणसात निश्चितपणे उमटेल, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं. गैरहजर खासदारांना उत्तर देण्यासाठी 7 दिवसांचा वेळ दिल्याची माहिती देखील अरविंद सावंत यांनी दिली. 

 ठाकरेंचे कोणते खासदार फुटण्याच्या मार्गावर? 

1. संजय जाधव

2. संजय देशमुख

3. नागेश पाटील आष्टीकर

4. ओमराजे निंबाळकर

5. भाऊसाहेब वाकचौरे

6. संजय दिना पाटील

उद्धव ठाकरेंसोबत कोणते खासदार?

1. अरविंद सावंत

2. अनिल देसाई

3. राजाभाऊ वाजे