Omraje Nimbalkar on Shrikant Shinde: देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या नीट परीक्षा गोंधळावरून (NEET Exam) दिल्लीत मोठे आंदोलन (Delhi CJP Protest) झाले आणि याचे थेट पडसाद संसदेतही (Parliament) पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर नीट परीक्षा गोंधळात कसलीही भूमिका न घेतल्याने खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली जात होती. मात्र, या टीकेला उत्तर देत ओमराजे निंबाळकर यांनी संसदेत नक्की काय घडले यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. नीट परीक्षेतील गोंधळाविरोधातलं आंदोलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या पोटातली आग होती, श्रीकांत शिंदे यांनी संसदेत त्याला वाट मोकळी करून दिली, असे सांगत ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या भूमिकेचे भरभरून कौतुक केले आहे.
ओमराजे निंबाळकर म्हणाले की, "जेव्हा दिल्लीमध्ये तरुण युवकांचे आंदोलन होत होते, त्या आंदोलनाच्या वेळी आमच्या पक्षातील लोकसभेचे गटनेते श्रीकांत शिंदे यांनी भूमिका मांडताना तरुणांच्या भावना लोकसभेत मांडण्याचे काम केले. दुसरा वक्ता मी होतो, पण दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी लोकसभेचे कामकाज चालू शकले नाही. त्यामुळे माझी भूमिका मला लोकसभेत मांडता आली नाही. पण निश्चितपणे त्या तरुणांच्या पोटातली ती आग होती.
Omraje Nimbalkar on Shrikant Shinde: श्रीकांत शिंदेंचं भरभरुन कौतूक
नीट परीक्षा वर्षातून एकदाच असते. एमबीबीएस (MBBS) प्रवेशासाठी ती अत्यंत महत्त्वाची असते. आयुष्याला दिशा देणारी ती परीक्षा आहे. अशा परीक्षेत पेपर फुटला म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे कष्ट घेतले, ज्यांना पेपर चांगला गेला, पण केवळ पेपरफुटीमुळे त्यांना पुन्हा परीक्षेला सामोरे जावे लागले, त्या विद्यार्थ्यांची भावना प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे होते. ती भावना लोकसभेत मांडण्याचे काम श्रीकांत शिंदे यांनी केले. वेळ मिळाला असता तर मी देखील ती भूमिका लोकसभेत मांडली असती," असे त्यांनी म्हटले.
Omraje Nimbalkar: माझ्या संवेदना विद्यार्थ्यांसोबत
ओमराजे निंबाळकर पुढे म्हणाले की, "आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. पाच वर्षांनी निवडणुकीला सामोरे जातो. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रचार झाला आणि अचानक निवडणुकीतील गैरप्रकारामुळे निवडणूक रद्द झाली तर त्या लोकप्रतिनिधीची मानसिक अवस्था काय होईल? याचा विचार करावा. निवडणूक पाच वर्षांनी येते. पण, नीटची परीक्षा संपूर्ण आयुष्य ठरवणारी असते. त्यामुळे निश्चितपणे माझ्या संवेदना विद्यार्थ्यांसोबत आहेत. केंद्र सरकारने देखील विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला. त्यांच्या भावना मान्य केल्या. आम्ही भले सत्ताधारी पक्षात आहोत. पण, याचा अर्थ लोकांचे मुद्दे मांडायचे नाहीत असा होत नाही. उलट सत्तेचा वापर करून लोकांचे प्रश्न मांडणे आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, हीच आमची जबाबदारी आहे. सत्ताधारी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहीन," असे देखील त्यांनी म्हटले.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
