एक्स्प्लोर

Omraje Nimbalkar: पवनराजे निंबाळकर खटला, निकालाची तारीख पुन्हा पुढे ढकलली; खासदार ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया

Omraje Nimbalkar: आमच्या दोन्ही कुटुंबानी 20 वर्षे 13 दिवस संघर्ष केला आहे, त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल एवढीच अपेक्षा आहे. सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो

धाराशिव : जिल्ह्यातील (Dharashiv) राजकीय वादाचे रुपांतर हत्याप्रकरणात होऊन घडलेल्या घटनेला 20 वर्षे उलटून गेली असून फिर्यादी न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. 3 जून 2006 रोजी मुंबईवरून उस्मानाबादला जात असताना नवी मुंबईच्या कळंबोलीत राजकीय वादातून पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सुरू असलेला न्यायालयीन (Court) खटला अंतिम टप्प्यात असून आज 16 जून रोजी निकालाची तारीख देण्यात आली होती. मात्र, आणखी काही कमतरता दूर करण्यासाठी आता 20 जून ही नवी तारीख देण्यात आली आहे. आज निकालाची तारीख असल्याने दिवंगत पवनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव ओमराजे निंबाळकर (Om rajenimbalkar) हेही आज न्यायालयात उपस्थित होते. कोर्टाने पुढील तारीख दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. 

आमच्या दोन्ही कुटुंबानी 20 वर्षे 13 दिवस संघर्ष केला आहे, त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल एवढीच अपेक्षा आहे. सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो, अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी दिली. माझी क्षमता होती म्हणून हायकोर्टात रिट दाखल करु शकलो, नंतर सीबीआयचा तपास झाला आणि आरोपी समोर आले. आरोपी समोर आल्यानंतर 20 वर्षे खटल्याची सुनावणी सुरू आहे, आरोपी असणारी लोकं डिले टॅक्टिस करत आहेत, असा आरोप ओमराजे निंबाळकरांनी केला आहे. माझा राजकारणातील जन्म त्यामुळेच आहे, कशामुळे राजेसाहेबांना संपवलं? तर याचं कारण पॉलिटिकल आहे. सन 2004 च्या निवडणुकीत माझ्या वडिलांचा पराभव फक्त 484 मतांनी झाला होता, पद्मसिंह पाटील यांना पाठिंबा दिला अशा आशयाचे खोटे पत्र वर्तमानपत्रातात छापलं होतं. आपल्याला राजकीय विरोधक नको, या भावनेतून पवनराजे साहेब आणि त्यांच्या चालकाची हत्या करण्यात आली होती. शांत डोक्याने केलेली ही पूर्वनियोजित हत्या आहे, असेही ओमराजे यांनी म्हटलं. 

हत्या केल्याने विरोधक संपत नसतो

न्याय मिळावा, हीच अपेक्षा आहे. अशा पद्धतीने एका माणसाचा खून केल्यावर तुमचा राजकीय विरोधक संपत नसतो, तो विरोधक तयार होत असतो, याच जिद्दीने मला इथवर आणलं, माझा राजकीय जन्मच त्यातून झाला. धाराशिव मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी उभी राहिली आहे. ज्यासाठी आमचा परिवार जगतो, पवनराजे निंबाळकर आणि समद काझी यांना न्याय मिळावा.  त्यामुळे, सध्या डोक्यात एकच आहे, पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणाचा निकाल लवकर लागावा, असेही ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले. 

नेमकं प्रकरण काय? (What is Pawanraje Nimbalkar Case) 

दरम्यान, 3 जून 2006 रोजी मुंबईवरून उस्मानाबादला जात असताना नवी मुंबईच्या कळंबोलीत राजकीय वादातून पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गोळीबारात पवनराजेंचा चालक समद काझी याचा देखील मृत्यू झाला होता. दोन अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून त्यांच्यावर गोळीबार केला होता. या हत्येप्रकरणी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासहित 9 आरोपी आहेत. माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचे प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप आहे. सप्टेंबर 2009 पासून याप्रकरणी पद्मसिंह पाटील जामीनावर बाहेर आहेत. याप्रकरणी शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटू पांडे यांच्यासह माजी नगरसेवक मोहन शुक्ला, उत्तर प्रदेशमधील बसपा नेता कैलास यादव, तसेच शशीकांत कुलकर्णी, लातूर येथील सतीश मंदाडे, पारसमल जैन हे संशयित आरोपी आहेत. राजकीय वैरातून 25 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा सीबीआयचा आरोप आहे. 14 मे रोजी वैद्यकीय कारणास्तव दोन आरोपी सुनावणीला हजर न राहिल्यामुळे सुनावणी लांबणीवर गेली. आरोपी मोहन शुक्ला आणि पद्मसिंह पाटील यांनी वैद्यकीय कारणास्तव पुढची तारीख मागितली होती. आता आज या येणाऱ्या निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलं आहे.

हेही वाचा

मोठी बातमी : पवनराजे हत्याप्रकरणाचा निकाल पुढे ढकलला, आता 20 जूनला निकाल, पद्मसिंह पाटील व्हीलचेअरवरुन कोर्टात!

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
Koel Mallick: तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
Maharashtra Live News Updates: उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल व्यक्त केली चिंता; सरकारला दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे निर्देश
Maharashtra Live News Updates: उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल व्यक्त केली चिंता; सरकारला दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे निर्देश
सचिन अहिरांना 'रायगड' बंगला नाकारला, फ्लॅट दिला; मंत्री नसलेले रविंद्र चव्हाण दीड वर्षांपासून बंगल्यात
सचिन अहिरांना 'रायगड' बंगला नाकारला, फ्लॅट दिला; मंत्री नसलेले रविंद्र चव्हाण दीड वर्षांपासून बंगल्यात
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
100 ISRO Scientists Quit Their Jobs: अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
कंपनीवर आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, दोन दिवसांनी सापडला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या
कंपनीवर आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, दोन दिवसांनी सापडला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या
Koel Mallick: तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
पुण्यातील कॅम्पातून चक्क 800 कोंबड्यांची चोरी, चिकन सेंटरचा मॅनेजर हैराण; पोलिसांत गुन्हा दाखल
पुण्यातील कॅम्पातून चक्क 800 कोंबड्यांची चोरी, चिकन सेंटरचा मॅनेजर हैराण; पोलिसांत गुन्हा दाखल
मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?
मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?
Gold Rate : गुड न्यूज, सोने आणि चांदीच्या दरात घसरण कायम, 22 कॅरेट सोन्याचे दर 1 लाख 30 हजारांच्या खाली आले, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने आणि चांदीच्या दरात घसरण कायम, 22 कॅरेट सोन्याचे दर 1 लाख 30 हजारांच्या खाली आले, जाणून घ्या लेटेस्ट दर
पतीकडून मारहाण, लेक माहेरला आली; मुलीला मारहाण करणाऱ्या जावयालाच सासऱ्याने संपवलं; कुऱ्हाडीने मारलं
पतीकडून मारहाण, लेक माहेरला आली; मुलीला मारहाण करणाऱ्या जावयाला सासऱ्याने संपवलं; कुऱ्हाडीने मारलं
Solapur News : आमदार असो वा खासदार-मंत्री, प्रोटोकॉलनुसारच पांडुरंगाचे दर्शन मिळणार; व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हा दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
आमदार असो वा खासदार-मंत्री, प्रोटोकॉलनुसारच पांडुरंगाचे दर्शन मिळणार; व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हा दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Embed widget