एक्स्प्लोर

लक्ष्मण हाकेंच्या पत्नीचा तीव्र संताप, फोनवरुन महिलेला शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

फेसबुकवर लक्ष्मण हाके विरोधात पोस्ट करणाऱ्या हनुमंत धायगुडेच्या बायकोला लक्ष्मण हाके यांच्या पत्नीने फोन करून शिवीगाळ करत धमकावल्याचं दिसून येत आहे.

मुंबई : ओबीसी समाजाचे नेते आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर सातत्याने टीका करणारे आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman hake) यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. अजित पवार यांनी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याचे सांगत गंभीर आरोपही केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या पदाधिकारी व आमदारांनी लक्ष्मण हाकेंवर पलटवार केला. आमदार अमोल मिटकरी यांनी काही शब्दप्रयोग करत हाकेंना लक्ष्य केलं. त्यामुळे, हाके विरुद्ध मिटकरी असा सामना पाहायला मिळाला. एकीकडे वादग्रस्त टीका टिपण्णीमुळे लक्ष्मण हाके चर्चेत असताना आता त्यांच्या पत्नीची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये, लक्ष्मण हाकेंविरुद्ध फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीला विजया हाके यांनी फोन केला असून शिवीगाळ केल्याचं ऐकायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर ही ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे. 

लक्ष्मण हाके यांच्या बायकोकडून तीव्र शब्दात संताप व्यक्त करण्यात आला आहे. फेसबुकवर लक्ष्मण हाके विरोधात पोस्ट करणाऱ्या हनुमंत धायगुडेच्या बायकोला लक्ष्मण हाके यांच्या पत्नीने फोन करून शिवीगाळ करत धमकावल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी हनुमंत धायगुडे यांनी लक्ष्मण हाके विरोधात फेसबुकवर पोस्ट लिहित टीका केली होती. लक्ष्मण हाके हा राखी सावंत आहे, पैसे आणि टीआरपीसाठी काही करायला तयार असतो अशी पोस्ट हनुमंत धायगुडे यांनी केली होती. त्यानंतर लक्ष्मण हाकेंचा एक व्हिडिओ व्हायरल करत हा कसा केवळ 50 रुपयांसाठी चाळे करतो, अशा प्रकारचा आशय लिहिला होता. 

एकीकडे लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर टीका केल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी, समर्थक त्यांच्यावर तुटून पडले होते. तर दुसरीकडे आता त्यांच्याच सोबत त्यांचा कार्यकर्ता म्हणून काही काळ काम केलेल्या हनुमंत धायगुडे या कार्यकर्त्याने लक्ष्मण हाकेंवर सडकून टीका केली आहे. हाकेंची साथ सोडत त्यांच्या विरोधात पोस्ट करायला सुरुवात केली होती. हनुमंत धायगुडे यांच्याकडून सातत्याने होणाऱ्या टीकेवर, फेसबुक पोस्टवर हाके यांच्या पत्नी विजया हाके यांनी फोनवरुन संताप व्यक्त केल्याचं ऐकायला मिळत आहे. हनुमंत धायगुडे यांच्या बायकोला फोन लावून शिवीगाळ करत धमकी दिल्याचं कथित ऑडिओ क्लिपमधून दिसत आहे.

फोनमधील संभाषण काय?

मी जॉबला जाते, मला वेळ नसते. मी माझ्या स्वत:च्या कष्टाने काही घेत असेल तर त्या कुत्र्याला काय अडचण आहे. तो कुत्राच आहे. मी त्याला कुत्राच बोलणार. मी त्याला का नीट बोलू. मी त्याला चहा दिला, जेवण दिलं. त्याच्या पावण्यारावळ्यांना कपडे केले, प्रत्येकाला साड्या घेतल्या असा आवाज कथित ऑडिओ क्लिपमधून ऐकायला मिळत आहे. तसेच, माझी जीभ काळी आहे. तो असाच मरेल, असे शिव्याशाप देत एका महिलेनं दुसऱ्या महिलेसमोर फोनवरुन संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा

सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय; नितेश राणेंचा शिवसेनेलाच इशारा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime Budhwar Peth: पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री 12 वाजता पोलिसांचा प्रचंड फौजफाटा पोहोचला, कुंटणखान्यातील खोल्यांची झडती, नेमकं काय घडलं?
पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री 12 वाजता पोलिसांचा प्रचंड फौजफाटा पोहोचला, कुंटणखान्यातील खोल्यांची झडती, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut: चंद्रपूरला सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आणूनही सत्ता आणता आली नाही काँग्रेसला लाज वाटली पाहिजे; संजय राऊतांचा हल्लाबोल
चंद्रपूरला सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आणूनही सत्ता आणता आली नाही काँग्रेसला लाज वाटली पाहिजे; संजय राऊतांचा हल्लाबोल
Mumbai News: पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार; जन्मठेपेची शिक्षा अन्..., गांधीजींचा अभ्यासामुळं तुरुंगवासात कोर्टानेच केली कपात… नेमकं प्रकरण काय ?
पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार; जन्मठेपेची शिक्षा अन्..., गांधीजींचा अभ्यासामुळं तुरुंगवासात कोर्टानेच केली कपात… नेमकं प्रकरण काय ?
BMC Mumbai standing Committee: मुंबई महानगरपालिकेत प्रशासक राजवटीत महत्त्वाचा नियम बदलण्याच्या हालचाली; नगरसेवक, स्थायी समितीच्या अधिकारांवर गदा?
मुंबई महानगरपालिकेत प्रशासक राजवटीत महत्त्वाचा नियम बदलण्याच्या हालचाली; नगरसेवक, स्थायी समितीच्या अधिकारांवर गदा?

व्हिडीओ

Ravindra Chavhan Nanded : भाजप प्रवेशाच्या अफवेवरून काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण संतापले..
Adnan Sami VS Congress And Sanjay Raut : संजय राऊतांचा वार, अदनानचा पलटवार Special Report
Govinda Politics : राजकारण पुरे झालं असं गोविंदा का म्हणाला? Special Report
Revati Sule : सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळेंचं लग्न ठरलं? Special Report
Rahul Gandhi at Loksabha : संसदेत तिसऱ्या दिवशी तरी वादाची कोंडी फुटली की नाही? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime Budhwar Peth: पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री 12 वाजता पोलिसांचा प्रचंड फौजफाटा पोहोचला, कुंटणखान्यातील खोल्यांची झडती, नेमकं काय घडलं?
पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री 12 वाजता पोलिसांचा प्रचंड फौजफाटा पोहोचला, कुंटणखान्यातील खोल्यांची झडती, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut: चंद्रपूरला सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आणूनही सत्ता आणता आली नाही काँग्रेसला लाज वाटली पाहिजे; संजय राऊतांचा हल्लाबोल
चंद्रपूरला सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आणूनही सत्ता आणता आली नाही काँग्रेसला लाज वाटली पाहिजे; संजय राऊतांचा हल्लाबोल
Mumbai News: पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार; जन्मठेपेची शिक्षा अन्..., गांधीजींचा अभ्यासामुळं तुरुंगवासात कोर्टानेच केली कपात… नेमकं प्रकरण काय ?
पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार; जन्मठेपेची शिक्षा अन्..., गांधीजींचा अभ्यासामुळं तुरुंगवासात कोर्टानेच केली कपात… नेमकं प्रकरण काय ?
BMC Mumbai standing Committee: मुंबई महानगरपालिकेत प्रशासक राजवटीत महत्त्वाचा नियम बदलण्याच्या हालचाली; नगरसेवक, स्थायी समितीच्या अधिकारांवर गदा?
मुंबई महानगरपालिकेत प्रशासक राजवटीत महत्त्वाचा नियम बदलण्याच्या हालचाली; नगरसेवक, स्थायी समितीच्या अधिकारांवर गदा?
कट रचून माझं गर्भाशय काढलं अन्…; बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध गायकाच्या पहिल्या पत्नीचे खळबळजनक आरोप
कट रचून माझं गर्भाशय काढलं अन्…; बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध गायकाच्या पहिल्या पत्नीचे खळबळजनक आरोप
Nagpur Crime : घरात कुणी नसताना भेटायला बोलावलं, दोन अल्पवयीन मित्रासह ओळखीच्या तरुणांचं नको ते कृत्य; घटनेनं नागपूर हादरलं!
घरात कुणी नसताना भेटायला बोलावलं, दोन अल्पवयीन मित्रासह ओळखीच्या तरुणाचं नको ते कृत्य; घटनेनं नागपूर हादरलं!
Relatinship Tips : 'व्हॅलेंटाईन डे' ला वाढवा तुमच्या नात्यातील गोडवा! नातं सुधारण्यासाठी करा 'हे' ज्योतिषीय उपाय
'व्हॅलेंटाईन डे' ला वाढवा तुमच्या नात्यातील गोडवा! नातं सुधारण्यासाठी करा 'हे' ज्योतिषीय उपाय
Chanakya Niti: चुकूनही तुमच्या आयुष्यातील 5 गोष्टी कोणासोबत शेअर करू नका, अन्यथा होईल पश्चात्ताप! चाणक्यनीती म्हणते...
चुकूनही तुमच्या आयुष्यातील 5 गोष्टी कोणासोबत शेअर करू नका, अन्यथा होईल पश्चात्ताप! चाणक्यनीती म्हणते...
Embed widget