Nitin Nabin BJP: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अखेर नितीन नवीन (Nitin Nabin) यांची निवड करण्यात आली आहे. भाजपकडून (BJP) 16 जानेवारीपासून राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी कार्यक्रम सुरू झाला होता, त्यानुसार आज अर्ज नामांकनप्राप्त आणि पाठिंब्याच्या जोरावर नितीन नवीन (Nitin Nabin) 37 सेटसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नितीन नवीन यांनी पहिले महत्वाचे निर्णय घेतले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर नितीन नवीन यांनी पहिल्याच निर्णयात विनोद तावडे, आशिष शेलार यांना दोन जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी विनोद तावडेंची (Vinod Tawade) प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नितीन नवीन यांनी केरळसाठी विनोद तावडे यांच्यासह शोभा करंदलाजे सहप्रभारी म्हणून निवड केली आहे. तसेच चंदीगड महापौर निवडणुकीसाठी विनोद तावडे यांना प्रभारी म्हणून नियुक्त केले आहेत. तर बंगळूर महापौर पदाच्या निवडणुकीची जबाबदारी राम माधव , सतीश पुनिया आणि संजय उपाध्याय यांच्यावर असणार आहे. तसेच मंत्री आणि मुंबईतील भाजपचे नेते आशिष शेलार यांची तेलंगणाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होताच नितीन नवीन यांचे पहिले निर्णय- (Nitin Nabin BJP)

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी विनोद तावडेंची प्रभारी म्हणून नियुक्ती

केरळसाठी विनोद तावडे यांच्यासह शोभा करंदलाजे सहप्रभारी 

चंदीगड महापौर निवडणुकीसाठी विनोद तावडे प्रभारी 

बंगळूर महापौर पदाच्या निवडणुकीची जबाबदारी राम माधव , सतीश पुनिया आणि संजय उपाध्याय यांच्यावर

आशिष शेलार यांची तेलंगणाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती

कोण आहे नितीन नवीन? (Who Is Nitin Nabin)

  1. 23 मे 1980 रोजी नितीन नवीन यांचा जन्म
  2. झारखंडची राजधानी रांचीचे रहिवासी 
  3. वडील नवीन किशोर प्रसाद सिन्हा हेही होते भाजप आमदार
  4. 2006 मध्ये वडिलांच्या निधनानंतर राजकारणात सक्रीय
  5. 2006 मध्ये पोटनिवडणुकीद्वारे प्रथमच बिहार विधानसभेवर 
  6. 2010,2015,2020,2025 अशा चार वेळा बांकीपूरचे आमदार 
  7. रस्ते वाहतूक,नगरविकास,गृहनिर्माण, विधी व न्याय खात्याचे मंत्री राहिले
  8. भाजयुमोचे राष्ट्रीय सरचिटणीस, सिक्कीमचे प्रभारी, छत्तीसगडचे सहप्रभारी होते
  9. डिसेंबर 2025 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी निवड
  10. 20 जानेवारी 2026 पासून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा औपचारिक पदभार

2021 मध्ये नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये प्रथमच मंत्रिपद- (Nitin Nabin Marathi News)

सध्या बिहार सरकारमध्ये मंत्री असलेले नितीन नवीन यांच्याकडे पथ निर्माण विभाग तसेच नगर विकास आणि आवास विभाग ही महत्त्वाची खाती आहेत. बांकीपूर विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार असून, 2010 पासून सलग निवडणुकीत तेथून जनतेचा विश्वास मिळवत आले आहेत. याआधी त्यांनी भाजपचे छत्तीसगड प्रभारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. राजकीय प्रवासाकडे पाहता, 2006 मध्ये त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. पटना पश्चिम मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांनी बांकीपूर मतदारसंघात आपली पकड मजबूत केली. 2021 मध्ये नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये त्यांना प्रथमच मंत्रिपद देण्यात आले. याशिवाय 2016 ते 2019 या काळात त्यांनी भाजप युवा मोर्चाचे बिहार प्रदेशाध्यक्ष म्हणून संघटनात्मक कामाचा ठसा उमटवला.

संबंधित बातमी:

Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?