Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व राज्य सरकारांना बाईक टॅक्सींना (Bike Taxi Permission) परवानगी देण्याचे आवाहन केले आहे. या क्षेत्रात आठ कोटी लोकांना रोजगार मिळू शकतो, असे ते म्हणाले. त्यांनी सुधारित मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी एका नवीन 'निगेटिव्ह-पॉइंट' प्रणालीची घोषणा केली, ज्यामुळे वारंवार गुन्हा करणाऱ्यांचे परवाने निलंबित किंवा रद्द केले जातील. रस्ते सुरक्षा संदर्भातील 'सुरक्षा' उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते दिल्लीत आयोजित कार्यक्रमात बोलत होते. (Nitin Gadkari On Bike Taxi Permission)
'आम्ही याला परवानगी दिली आहे, पण काही राज्ये याला परवानगी देत नाहीत. वाहतूक हा राज्याचा विषय आहे. यामुळे अनेकांना उपजीविकेचे साधन मिळेल, यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. परिणामी स्कूटर आणि मोटरसायकलसारख्या खासगी दुचाकी चालकांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी द्या, असंम्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांना आवाहन केलंआहे.
Nitin Gadkari : बाईक टॅक्सीला परवानगी दिल्यास आठ कोटी रोजगार उपलब्ध होतील
आम्ही घेतलेल्या खासगी बाईक टॅक्सीमुळे आतापर्यंत चार कोटी रोजगार उपलब्ध झालेत. रपिडो बाईक टॅक्सीमुळे सुमारे दोन कोटी रोजगार उपलब्ध झालेत. विविध राज्य सरकारने बाईक टॅक्सीला परवानगी दिल्यास आठ कोटी रोजगार उपलब्ध होतील असेही गडकरी म्हणाले.
दरम्यान, 10 लाख महामार्ग आणि खाण कामगारांना मोफत जागेवरच वैद्यकीय निदान आणि समुपदेशन देणाऱ्या 'सुरक्षा' या प्रायोगिक प्रकल्पाच्या शुभारंभावेळी बुधवारी बोलताना, गडकरी यांनी मान्य केले की वाहतूक हा राज्याचा विषय आहे आणि केंद्र सरकार नियमांचे पालन करण्यास सक्ती करू शकत नाही. परंतु, त्यांनी राज्यांना कारवाई करण्याचे आवाहन केले. बाईक टॅक्सी हे ग्रामीण आणि निमशहरी भारतातील उपजीविकेचे साधन असल्याचे त्यांनी म्हटले, विशेषतः अशा ठिकाणी जिथे एक अतिरिक्त मोटारसायकल अनेकदा कुटुंबाचे एकमेव उत्पन्न मिळवून देणारे साधन असते.
Nagpur News : 10 लाख चालकांची आरोग्य तपासणी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 'सुरक्षा' (Suraksha) या प्रायोगिक उपक्रमाचा शुभारंभ केला. याअंतर्गत, महामार्ग, खाणकाम आणि बांधकाम यांसारख्या उच्च-जोखीम असलेल्या क्षेत्रांतील सुमारे 10 लाख चालक आणि कामगारांची मोफत आरोग्य तपासणी व समुपदेशन केले. पहिल्या टप्प्यात, नागपूर आणि कामठी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग-४४ (NH-44) वर आणि चंद्रपूरमधील खाणकाम क्षेत्रांमध्ये सुमारे 10,000 लोकांच्या तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
India Accident : दुचाकी अपघातांमुळे सर्वाधिक मृत्यू
गडकरी यांच्या माहितीनुसार, भारतात दुचाकी अपघातांमध्ये 81,780 लोकांचा मृत्यू झाला आहे, जी जगातील सर्वाधिक संख्या आहे. सीट बेल्ट न लावणे, 'हिट-अँड-रन' घटना, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे, मद्यपान आणि मोबाईल फोनचा वापर ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. सीट बेल्ट न लावल्यामुळे एकूण 14,466 मृत्यू झाले, तर 'हिट-अँड-रन' प्रकरणांमध्ये 34,030 मृत्यू झाले. ही आकडेवारी चालकांचे प्रशिक्षण, आरोग्य तपासणी आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज अधोरेखित करते.असेहीत्यांनीसांगितलं.
