Sindhudurg ZP Elections : वेंगुर्ले तालुक्यातील परुळे पंचायत समिती महायुतीत शिंदे शिवसेनेला जागा मिळाली. मात्र भाजप मधून बंडखोरी केलेल्या उमेदवाराने संभ्रम निर्माण केला. त्यामुळे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) स्वतः मतदारसंघात जात कॉर्नर सभा घेतली. या सभेत नितेश राणेंनी अपक्ष उमेदवाराला धमकी वजा इशारा दिला आहे. ज्या निवडणुकीचे नेतृत्व नारायण राणे (Narayan Rane) करतात, तिथे संभ्रम केव्हाच नसतो. राणेंनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी अंतिम असतो. इथे वळवळ, हिंमत दाखवण्याचा कार्यक्रम सुरू आहे, तो योग्य वेळी बंद झाला नाही, तर 9 फेब्रुवारीनंतर 10 फेब्रुवारी उजाडेल, हे काही लोकांनी लक्षात ठेवाव.
राणेंचा शब्द न मानणारा कोणी असेल त्या कोणालाही अशी हिंमत करायला देणार नाही. बंडखोरी केलेल्या निलेश सामंत यांना बोलवून ही जागा शिवसेनेला सोडली असून तिथे कुठलीही मस्ती करू नका. आमच्याकडे परत परत समजविण्याचे प्रकार होत नाहीत. आम्हीच बॉस, त्यामुळे बॉस इज ऑलवेज राईट हे समजून काम करा, अशाशब्दात मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी धमकी वजा इशारा दिला आहे.
Nitesh Rane : तुम्ही ज्या शाळेचे विद्यार्थी त्यांचे प्रिन्सिपल आमचे वडील, राणेंचा शब्द तोडणाऱ्याना....
सुक्या धमक्या आम्हाला देऊ नये. तुम्ही ज्या शाळेचे विद्यार्थी आहात त्यांचे प्रिन्सिपल आमचे वडील आहेत, हे लक्षात ठेवा. वळवळ करून गालबोट लावण्याचे काम करू नये. संभ्रम दूर करण्यासाठी पुन्हा संधी नाही. नारायण राणेंचा शब्द तोडणाऱ्याना आणि अपमान करणाऱ्याला सोडणार नाही. नारायण राणेंचा कार्यकर्ता आहे म्हणून ओळख मिळाली हे कोणी विसरू नये. 90 च्या दशकातील काळ लोकांनी आठवलं तर कळेल काय परिस्थिती व्हायची. आता केसरकर साहेब आहेत म्हणून जास्त दहशदवादा बद्दल बोलणार नाही, नाहीतर त्रास होईल. नंतर केसरकर संयम ठेवला सांगतील. असेही मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले.
Nitesh Rane: बंडखोर उमेदवार सभा घेत असेल तर सांगा पहिल्या रांगेत येऊन बसतो
नारायण राणेंचा शब्द पाडणाऱ्या लोकांना सोडणार नाही. महायुतीच्या उमेदवारां विरोधात कोणी फिरत असले, तर अवेळी येऊन उभा राहून पाहणार. आता विनंती पूर्वक सांगतो मला वातावरण खराब करायचे नाही. आता तर चर्चा होते. पहिले मुंबईमधून फॅक्स यायचा आणि उमेदवारी जाहीर व्हायची. चर्चा करणे, नामधारनी करणे ही फाजील लोकशाही आता सुरू झाली. नारायण राणेंच्या विरोधात जो कोणी जाईल त्याला शासन होईल. बंडखोर उमेदवार सभा घेत असेल तर सांगा पहिल्या रांगेत येऊन बसतो. असेही मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले.
Nitesh Rane: आपल्याकडे ठरलेलं आहे, भाजप आणि धनुष्यबाण दिसला तरच मी निधी देतो
पालकमंत्री मी आहे, मी दिलदार नाही. निधीसाठी माझ्याकडे याव लागेल, कुठे जाणार अमेरिकेला, गोव्याला, बेळगावला. आपल्याकडे ठरलेलं आहे, समोर भाजप आणि धनुष्यबाण दिसला तरच मी निधी देतो. नाहीतर गेट आउट. कोणाला उभं करत नाही. आपण उगाच दान धर्म करत नाही. 10 तारीखनंतर कारभार आमचाच आहे, कुठे जाणार. सुक्या धमक्या 9 तारीखपर्यंत 10 तारीख नंतर माझ्या व्हॉट्सॲप कॉल येईल. मग काय करणार, कुठे जाणार. सगळ्या चाव्या आमच्याकडे आणि हे मस्ती करतात समजत नाही. आम्हीच बॉस आहोत त्यामुळे बॉस इज ऑलवेज राईट हे समजून काम करा, असा इशारा नितेश राणे यांनी बंडखोरी केलेल्या उमेदवाराला दिला आहे. मुंबई ते चीपी विमानसेवा सुरू होणार तसेच चीपी विमानसेवा 24 तास सुरु होणार. लवकरच रोरो सेवा सुरू होणार. मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवा सुरु होणार. त्यानंतर पुढे वेंगुर्ले पर्यंत ही रोरो सेवा सुरू होणार. असेहीत्यांनीयावेळीसांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या
