मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळीपासूनच मराठी महापौर पदावरून वाद (Marathi Mayor controversy) चांगलाच पेटला असल्याचं दिसून आलं. सर्वत्र एकच चर्चा सुरू होती “मुंबईचा महापौर कोण होणार, स्थानिक मराठी की इतर भाषा-प्रांतातून आलेला?” यावरून मोठा वाद (Mumbai Mayor ontroversy) पेटला होता, त्यानंतर आज महापौर पदाचा सस्पेन्स संपला आहे. आज मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने आपल्या युतीकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठीच्या नावाची घोषणा केली आहे. मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे यांची निवड करण्यात आली आहे, तर उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय घाडींची वर्णी लागली आहे. घाडी हे सव्वा वर्षांसाठी उपमहापौर असाणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक नावे चर्चेत होती, मात्र रितू तावडेंच्या नावावरती आज शिक्कामोर्तब झाले आहे.(Ritu Tawade Profile) यानंतर आता भाजप नेते नितेश राणे यांनी सोशल मिडीयावरती पोस्ट केली आहे.
नितेश राणेंची सोशल मिडीया पोस्ट
नितेश राणेंनी सोशल मिडीया पोस्ट करत म्हटलंय की, बोललो होतो.. मुंबई चा महापौर..हिंदू होणार... मराठी होणार.. महायुती चाच होणार ! जय श्री राम ! मुंबई ❤️ महादेव, असंही त्यांनी म्हटलं आहे.
आम्ही मुंबईकरांना दिलेला शब्द पाळला - आशिष शेलार
मुंबईचा महापौर हिंदू मराठी असेल, हा आम्ही मुंबईकरांना दिलेला शब्द पाळला. ज्यांना मराठी मुस्लिम महापौर करायचा होता त्यांचा डाव मुंबईकरांनीच हाणून पाडला.त्यामुळे भाजपा-शिवसेना रिपाई महायुतीच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या तमाम मुंबईकरांचे आभार !!महापौर पदाच्या उमेदवार रितू तावडे यांना शुभेच्छा !!मुंबईच्या विकासाचे नवे पर्व सुरु... आम्ही मुंबई विकासाबाबत सदैव लक्ष ठेवून राहूच.पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांचे आभार !!
महापौर, उपमहापौर पदाच्या नावाची घोषणा
भाजपच्या रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे, तर उपमहापौरपदी संजय शंकर घाडी यांच्या नावाची सव्वा वर्षांसाठी घोषणा झाली आहे. पुढील सव्वा वर्षांसाठी घाडी हे उपमहापौर असणार आहेत.
वादाचा विषय काय?
मुंबई महापौर निवडीभोवतीची चर्चा रस्ते, पाणीपुरवठा किंवा विकासकामांपुरती मर्यादित न राहता, “महापौर मराठी असावा का?” या प्रश्नाभोवती केंद्रित झाली होती. डिसेंबर २०२५ मध्ये या वादाला सुरुवात झाली आणि काही आठवड्यांतच हा विषय राजकीय व्यासपीठांपासून ते सोशल मीडियावरील चर्चांपर्यंत पोहोचला. मराठी अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी आल्याने हा वाद अधिक तीव्र झाल्याचे चित्र दिसून आले.
एका बाजूने मराठी मतदारांचा विश्वास मिळवण्यासाठी हिंदू-मराठी महापौर असावा, अशी ठाम मागणी पुढे येत आहे. तर दुसऱ्या बाजूला, मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहरात महापौरपदाला भाषिक ओळखीच्या चौकटीत बांधणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला जात होता.
