Nitesh Rane on Sanjay Raut: लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार 1 ऑगस्ट रोजी पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते देण्यात आला. अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त पुण्यात सुरक्षा वाढवण्यात आली होती. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती. तुम्ही मुळचे गुंड आहात, एकतर गुंडासारखे वागा नाहीतर गृहमंत्र्यांसारखे वागा, असे त्यांनी म्हटले होते. आता राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.  

Continues below advertisement

नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओवर बोलताना नितेश राणे म्हणाले, "हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठेपणा आहे. कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी अशा पद्धतीची भूमिका घेणं म्हणजे भारतीय म्हणून आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आपल्या देशाचं नेतृत्व अशा जबाबदार आणि सुसंस्कृत माणसाकडे आहे. मोदी आणि त्यांच्या आईवर टीका केली तरी त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवलाय, हे क्वचितच असेल. पंतप्रधानांनी एक आदर्श घालून दिलाय, मला त्यांचा अभिमान वाटतो," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

Nitesh Rane on Sanjay Raut Uddhav Thackeray: संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा

संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देताना नितेश राणे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एवढी तरी भावना व्यक्त केली आणि सुसंस्कृतपणा काय असतो हे दाखवलं. संजय राऊत यांचे मालक जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा कोरोना काळात असंख्य लोकांचे जीव गेले, पत्रकार बांधवांवर खोट्या केसेस टाकल्या, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी कधीच जनतेची माफी मागितली नाही. त्यांनी जनतेसमोर नाक रगडून माफी मागायला हवी होती, पण उद्धव ठाकरेंसारख्या व्यक्तीकडून आम्हाला अपेक्षा नाही. हा संस्काराचा विषय असतो. संजय राऊत यांनी मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर जाऊन सुसंस्कृतपणाचे सल्ले द्यावेत, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. 

Continues below advertisement

Nitesh Rane on Sanjay Raut: अमित शाह यांच्यावरील टीकेवर प्रत्युत्तर 

संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेताना राणे आक्रमक झाले. ते म्हणाले, "संजय राऊत 420 आहे हे आम्हाला म्हणावं लागेल. पत्रा चाळप्रकरणी जो जेलमध्ये जाऊन आलाय तो 420 च आहे. आमच्या देशाच्या गृहमंत्र्यांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही. खिचडीमध्ये पैसे खाणाऱ्या 420 ने आमच्या देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याची हिंमत करू नये," अशी टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केलीय. 

आणखी वाचा 

Sanjay Raut on PM Narendra Modi: पीएम मोदी म्हणाले, मला मुलांना माफ करायचंय, संजय राऊतांची पंतप्रधानांवर बोचरी टीका; म्हणाले, ही अवदसा तुम्हाला आठवते तरी कशी?