एक्स्प्लोर

Nitesh Rane on Nilesh Rane : निलेश राणेंचा बळीचा बकरा केला जातोय; दुसरे कोणी रविंद्र चव्हाणांवरती का बोलत नाही? नितेश राणेंनी केली भावाची पाठराखण

Nitesh Rane on Nilesh Rane :उदय सामंत येऊन रवींद्र चव्हाणांवरती का टीका करत नाहीत, निलेश राणे यांच्या समर्थनार्थ त्यांच्यातील एकही नेता का उतरत नाही? असा सवालही निलेश राणेंनी उपस्थित केला आहे.

सिंधुदुर्ग: भाजप नेते नारायण राणे यांना संपवण्याचा कट सुरु आहे. राणे साहेब तुम्हाला प्रचारात कुठे दिसतात का?. नारायण राणे यांना युती हवी होती. पण त्यांचा शब्द मानला नाही" असा दावा दीपक केसरकर यांनी केला. यावर पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. नारायण राणे यांची इच्छा होती, जिल्ह्यामध्ये युती व्हावी, रत्नागिरीमध्ये युती झाली पण सिंधुदुर्गमध्ये युती होऊ शकली नाही, विरोधक असेही म्हणत आहेत नारायण राणे यांचा शब्द मानला गेला नाही, यावर उत्तर देताना नितेश राणे यांनी म्हटलं की, नारायण राणे यांची इच्छा होती की शहर विकास आघाडी होऊ नये, कणकवलीत शहर विकास आघाडी होऊ नये, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ नये, हे विधान देखील नारायण राणे यांचं होतं, शेवटी नारायण राणे हे एक प्रगल्भ नेते आहेत, त्यांना युती आघाड्या सर्व समजतं, ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांना राज्य कसं चालवायचं, कशा युती, आघाडी होतात, हे सर्व आयुष्यभर अतिशय बारकाईने त्यांनी पाहिलेलं आहे, म्हणून प्रस्ताव आले गेले, टेबलावर नेमकं काय झालं? याची माहिती त्यांना असते, असं नितेश राणे (Nitesh Rane) म्हणालेत. 

Nitesh Rane  : विकासावर बोलण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नाही

तर अतिशय उत्तम संवाद नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये आहे, अतिशय उत्तम संवाद नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये देखील आहे, म्हणून त्या लोकांना माहिती आहे, काय विषय आहे तो, त्यामुळे त्यांना युतीबाबत सर्व परिस्थिती माहिती आहे, युती कशी होते वगैरे, काय मागण्या केल्या सर्व माहिती टेबलावर मिळालेली आहे. आता आपल्याला फक्त एक चुकीचं चित्र दिलं जातं, आम्ही सगळेच द्यायला तयार होतं, ते नगरअध्यक्ष पद मागत होते, भाजपाकडून त्यांच्या हक्काचं नगराध्यक्ष पद मागत होते, आम्ही त्याबद्दल काही बोललो नाही, गप्प होतो, इतका वेळ, कारण आम्हाला माहिती आहे की विकासावर बोलण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नाही, असंही नितेश राणे म्हणालेत. 

Nitesh Rane  : , निलेश राणे यांच्या समर्थनार्थ त्यांच्यातील एकही नेता का उतरत नाही?

2019 पासून मल्टी स्पेशालिस्टची जागा जी क्लियर झालेली, तरीपण केसरकारांना का जमलं नाही जागा भरून देणं, आरोग्यवस्थेबद्दल सावंतवाडी आणि वेंगुर्लेचे लोक आजही बोंब का मारत आहेत? दीपक केसरकर आमदार आहेत ना, मंत्री झालेले आहेत, केसरकरांनी याबद्दल उत्तर दिले पाहिजे, आरोग्याची व्यवस्था का केली नाही? डॉक्टर का दिला नाही? का इथल्या लोकांना आरोग्यासाठी गोव्याला जावे लागत आहे? म्हणून माझा असं म्हणणं आहे, याच्यामध्ये उगाच कोणी राजकारण करू नये, आमच्या रवींद्र चव्हाण यांच्यावरती कोणीही आरोप करू नये, रवींद्र चव्हाण यांनी नारायण राणे यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीमध्ये काय केलं हे आम्हाला चांगलंच माहिती आहे, आमच्यासाठी विधानसभेला काय केलं हे आम्हाला चांगलं माहिती आहे, निलेश राणे यांचा देखील बळीचा बकरा केला जात आहे, त्यांना एकटं पाडलं जात आहे, का दुसरा कोणता शिवसेनेचा नेता बोलत नाही, का बोलत नाही, उदय सामंत येऊन रवींद्र चव्हाणांवरती का टीका करत नाहीत, निलेश राणे यांच्या समर्थनार्थ त्यांच्यातील एकही नेता का उतरत नाही? तिकडे ते गुलाबराव पाटील राज्यातल्या कुठल्यातरी एका जिल्ह्यातल्या कुठल्यातरी एका शहराच्या नगरपालिकेसाठी नारायण राणेंची कशी खिल्ली उडवत आहे ते दाखवू का व्हिडिओ? मग बाकी कोण का बोलत नाहीत, फक्त निलेश राणेच बोलत आहेत, ना रत्नागिरीचा, ना कोकणातला, ना महाराष्ट्रातला, त्यांना काय पाडला जात आहे, दीपक केसरकर का रवींद्र चव्हाण यांचे नाव घेत नाहीत, या बाबतीमध्ये दोन तारखेनंतर जसं निलेश राणे बोलले आहेत, फडणवीसांसोबत बसून, रवींद्र चव्हाण यांच्यासोबत बसू महायुती मधून यातून काय मार्ग निघतो ते पाहू, असंही पुढे नितेश राणे यांनी म्हटलं आहे

 

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
PM Modi Independence Day speech: उत्पादनापासून हरित अर्थव्यवस्थेपर्यंत, 'विकसित भारता'साठी पंतप्रधानांची 7-सूत्री 'सप्तधारा संकल्पना, Gen-Z साठीही मोठी घोषणा!
उत्पादनापासून हरित अर्थव्यवस्थेपर्यंत, 'विकसित भारता'साठी पंतप्रधानांची 7-सूत्री 'सप्तधारा संकल्पना, Gen-Z साठीही मोठी घोषणा!
Abhijeet Dipke: 'बटेंगे तो कटेंगे' या भानगडीत पडूच नका; स्वातंत्र्यदिनी अभिजीत दिपकेंचा सल्ला
'बटेंगे तो कटेंगे' या भानगडीत पडूच नका; स्वातंत्र्यदिनी अभिजीत दिपकेंचा सल्ला
Devendra Fadnavis : सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस
सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य खूप सहजपणे मिळाल्याने त्याचे महत्त्व नाही: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य खूप सहजपणे मिळाल्याने त्याचे महत्त्व नाही: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
Embed widget