मुंबई : दिशा सालियन (Disha saliyan) प्रकरणावरुन पोलिसांनी एकप्रकारे आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) क्लीनचीटचं दिल्याचं पाहायला मिळत आहे.  दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात कोणतीही संशयास्पद माहिती नाही. हे आत्महत्येचे प्रकरण असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. त्यानंतर, भाजप नेते आणि विद्यमान मंत्री नितेश राणे यांच्याकडून सातत्याने होणार्‍या आरोपासंदर्भाने प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच, शिवसेना खासदार संजय यांनी नितेश राणेंवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, नितेश राणेंनी (Nitesh Rane) नाक घासून माफी मागावी, असेही म्हटले होते. आता, नितेश राणेंनी याबाबत भूमिका व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे नितेश राणेंनी याबाबत माहिती दिल्यानंतर आदित्य ठाकरे आणि नितेश राणे सभागृहाबाहेर आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. तर, नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची मिमिक्रीही केली. 

दिशा सालियन प्रकरणावर एसआयटीचा अहवाल 17 जूनला आलेला आहे, कोर्टात काल गेलेल्या अहवालाबाबतची माहिती घ्यावी. कारण, हा विषय नितेश राणेंपुरता नाही. दिशा सालियानच्या वडिलांनीही अॅफिडेविट केलं आहे, हा राजकीय आरोप नाही. दिशा सालियानचे वडिल जे आरोप करत आहेत, ते आरोप राजकीय करत आहेत का? असा सवालही दिशा सालियनने विचारला. तसेच, पिच्चर अभी बाकी आहे, न्यायालयाने 16 तारीख दिलेली आहे तेव्हा काय होतं ते बघू. आताचे सरकार जो काय अहवाल देतं ते बघू. यातला एक अधिकारी या जो यात आहे, याबाबतही मी पत्र दिलेलं आहे, असेही नितेश राणेंनी म्हटलं आहे. 

आदित्य ठाकरेंनी खोटी माहिती दिली - राणे

दरम्यान, कोर्टात आदित्य ठाकरेंनी खोटी माहिती दिली, मी आमदार आहे हे लपवून त्यांनी आपण व्यवसाय करत असल्याचं दाखवलं. दिशा सालियानला नक्की न्याय दिला जाणार हे सर्व आरोपी तुरुंगात जाणार, असेही नितेश राणेंनी म्हटलं आहे.  

नितेश राणेंकडून आदित्य ठाकरेंची मिमिक्री

पावसाळी अधिवेशनादरम्यान नितेश राणेंनी सभागृहाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर, तिथून ते निघत असाताना नेमकं आमदार आदित्य ठाकरेही समोर आले होते. त्यामुळे, राणे-ठाकरे आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी, नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची मिमिक्री करण्याचा प्रयत्न केला. लहान आवाजात.. ये चला.. चला... असं म्हणत नितेश राणेंनी मिमिक्री केली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

हेही वाचा

माऊलींच्या पालखीत चोपदाराचा उद्धटपणा, वारकरी महिलेला जोरात ढकलून दिलं; VIDEO व्हायरल, नेटीझन्स संतप्त